Posted on

‘कवितेतला वासुदेव – संतोष वाटपाडे’ रणजित पराडकर

0

‘सोशल मीडिया’ हे एक अतिशय प्रभावी माध्यम आहे आणि बदलत्या

काळाच्यासमीकरणात तर छापील माध्यमांपेक्षाही जास्त प्रभावी आहे. सोशल मीडियाचापरिणाम म्हणून मी लिहिता झालो आणि ह्याचाच परिणाम म्हणून ‘संतोषवाटपाडें’सारख्यांच्या संपर्कात येऊ शकलो व समृद्धही झालो.

रविबिंब सरकले खाली
अवनीवर संध्या आली
कुंकूम भाळावर छोटे
नववस्त्र तनावर ल्याली
रांगोळी पाण्यावरही
किरणांची अवचित झाली
क्षितिजावर लुकलुकणारी
फ़ुलवात कुणाची आहेही बाग कुणाची आहे ?

ह्या प्रश्नाचं उत्तर मला केशवसुतांच्या कवितेत सापडतं. ‘देवाचे दिधले असे जग तयेआम्हांस खेळावया!’

ही बाग कवीची आहे ! ह्या कवितेत कवी संतोष वाटपाडे प्रत्येक कडव्यात दिवसाचेविविध प्रहर रंगवत नेतात आणि सगळ्यात शेवटी –

दररोज तरी धरतीला
का ओढ तमाची आहे….ही बाग कुणाची आहे ?

– असा व्याकुळ करणारा प्रश्न करतात.

फार क्वचित असा अनुभव येतो की एखादी कविता वाचल्यावर प्रचंड अस्वस्थ वाटतं, गहिवरून आल्यासारखं वाटतं, दोन चार ठोके चुकल्यासारखं वाटतं.

पहाटेच्याही जरासं आधी अचानक जाग यावी. झोप पूर्ण झालेली असावी. घराबाहेरएकाच वेळी स्वच्छ चांदणं सांडलेलं असावं आणि पूर्वेकडे रंगांच्या पखरणीला अजूनसुरुवात झालेली नसली तरी तशी तयारी कुणी तरी करत असल्याची एकअव्यक्तापलिकडची चाहूल असावी. विविध फुलांचा एकत्र सुवास दरवळत असावाआणि सर्वदूर पसरलेली नीरव शांतता देवघरात मंदपणे तेवणाऱ्या समईच्या हसतमुखस्थितप्रज्ञतेसारखी भासावी. वेळ काही क्षण थांबली आहे, असंच वाटावं. बहुतेक तीथांबतही असावी.

Continue reading ‘कवितेतला वासुदेव – संतोष वाटपाडे’ रणजित पराडकर

0
Posted on

‘ही बाग कुणाची आहे’ प्रकाशित

0

 

 

 

 

 

 

 

 

संतोष वाटपाडे लिखित “ही बाग कुणाची आहे” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा आज संपन्न. या प्रकाशन सोहळ्यानंतर ‘गझल मुशायरा’ आयोजित करण्यात आला होता. हा मुशायरा अद्वितीय होण्याचे कारण ठरले याचे गझलकार.

सहभागी गझलकार पुढीलप्रमाणे: 
भुषण कटककर, सुप्रिया मिलिंद जाधव,
सतीश दराडे, सदानंद बेंद्रे,
विष्णू थोरे, रणजीत पराडकर,
निशब्द देव, प्रशांत केंदळे
आणि “ही बाग कुणाची आहे” ह्या काव्यसंग्रहाचे कवी संतोष वाटपाडे
प्रमुख पाहुणे मा. खलिल मोमिन आणि मा. कमलाकर आबा देसले
काव्यसंग्रह – “ही बाग कुणाची आहे”
कवी – संतोष वाटपाडे
किंमत – 125/-
मुखपृष्ठ चित्र – गोविंद नाईक
मुखपृष्ठ सुलेखन संकल्पना, मलपृष्ठ आणि कविता सुलेखन – निलेश गायधनी

0