Posted on

काव्यांजली “जतन साहित्य संपदेचे”

0

आजचं युग हे सोशल मिडियाचं युग …ग्लोबलाईजेशन झालं आणि जग जवळ आलं …वैचारिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सरळ आणि सोपी झाली तशी वेगवेगळ्या भाषाही एकमेकीत मिसळल्या. काळाची गरज म्हणून इंग्रजी माध्यमातून शिक्षण गरजेचं झालं. ग्लोबल नेटवर्कमुळे फायदे झालेच पण न कळत आपण दुरावलो ते आपल्या मातृभाषेला.

आजच्या पिढीला आणि येणार्याही पिढीला इंग्रजी ही व्यवहाराची भाषा यायलाच हवी पण मातृभाषेला विसरून मात्र चालणार नाही. महाराष्ट्रात प्रामुख्याने वापरल्या जाणार्या ३ प्रमुख भाषा हिंदी, उर्दू आणि मराठी. युवा पिढीला पुन्हा ह्या भाषांकडे वळवण्यासाठी अनेक ठिकाणांहून अनेक संस्था आज महाराष्ट्रात सातत्याने कार्यरत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून भाषा चळवळी उभ्या राहिल्या आहेत. आणि ह्यातलीच एक अग्रगण्य संस्था “पासबान – ए – अदब”.

पाश्चिमात्य अंधानुकरण करणाऱ्या आजच्या युगात समृद्ध भारतीय भाषा आणि परंपरा लोप पावत असल्याने, भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक आणि मानबिंदू असलेल्या ह्या भाषांशी युवा पिढीला जोडून Continue reading काव्यांजली “जतन साहित्य संपदेचे”

0
Posted on

संग्राह्य गझल विशेषांक !- संजय शिंदे

0

 

गझल अभ्यासक व समीक्षक अरुणोदय भाटकर यांनी संपादित केलेला रत्नागिरी एक्सप्रेसचा दीपावली गझल विशेषांक वाचणे ही एक मोठी पर्वणी आहे. या अंकात साधारणपणे जुन्या-नव्या/प्रस्थापित-नवोदित अशा जवळपास शंभर गझलकारांच्या एकूण तीनशे ते चारशे रचना समाविष्ट केलेल्या आहेत.

गझलांची निवड व संपादन स्वतः अरुणोदय भाटकर यांनी केल्यामुळे गझलांच्या दर्जाबद्दल अजिबात शंका नाही. शिवाय या गझला महाराष्ट्रातील विविध प्रदेशात असणाऱ्या गझलकारांच्या असल्यामुळे या सर्वच गझलांमध्ये आशय, विचार व मांडणी यानुसार असणारी वैविध्यता इथे अनुभवायला मिळते.

या संग्रहात जशा तीस-पस्तीस वर्षं गझललेखन करणाऱ्या गझलकारांच्या रचना आहेत तशाच अगदी नवोदित असणाऱ्या गझलकारांच्याही गझला आहेत. त्यामुळे या अंकाचं संग्राह्य मूल्य निश्चितच वाढलं आहे.

मालवणी गझला, अनुवादित गझला, कोकणी गझला, अमराठी कवींच्या मराठी गझला हे विभाग या अंकाचं वेगळेपण अधोरेखित करतात. तर गझलचिकित्सा या विशेष भागातील काही लेख मराठी-उर्दू गझलेविषयी सविस्तर विचारमंथन घडवून आणतात. या भागातील सर्वच लेख विशेषतः वैवकू यांचा मराठी गझलेच्या आकृतीबंधाबाबतचा लेख नवोदित गझल लिहिणाऱ्यांना मार्गदर्शन करणारा आहे.

याशिवाय संदीप गुप्ते, शिल्पा देशपांडे, जयदीप जोशी, स्वतः अरुणोदय भाटकर, चित्तरंजन भट यांचा संक्षिप्त लेख हे सर्वच लेख वाचनानंद देणारे आहेत. मला मिळालेल्या अंकात स्वप्निल शेवडे यांचा लेखच काही तांत्रिक कारणाने अगदी थोडा छापला गेलेला आहे. या विभागात गझल या विषयावरील अजून चिंतनात्मक, चर्चात्मक, तुलनात्मक, समीक्षात्मक लेख असते तर वाचकांना गझलरचनांच्या आनंदासोबतच अजून मोठी वैचारिक मेजवानी मिळाली असती.

अंकाचे मुखपृष्ठ नंदू गवांदे यांचे असून ते अंकाच्या सौंदर्यात भर घालणारे आहे. या अंकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण अंक आर्ट पेपरवर मुद्रित केल्याने अंकाचा छपाईचा दर्जा उत्तम आहे. फक्त मांडणीत व विशेषतः अक्षरजुळणीत काही त्रुटी राहिल्या आहेत. वेलांटी व उकाराच्या चुका राहिल्या आहेत. त्यामुळे अंक वाचताना रसभंग होतो. या चुका संपादनातल्या नाहीत, तांत्रिक आहेत. पण तरी त्या टाळल्या असत्या तर अंकाचा दर्जा निश्चितच अजून उंचावला असता यात शंका नाही.

मराठी साहित्यात विशेषतः काव्यक्षेत्रात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या गझल या काव्यप्रकारावर हा विशेषांक काढल्याबद्दल संपादिका नमिता कीर व अतिथी संपादक अरुणोदय भाटकर यांचे अभिनंदन करणे महत्वाचे आहे.

गझलगाथा या नावाने या सर्व गझलांचा एकत्रित असा एक नवा ग्रंथ येतो आहे असे अरुणोदय भाटकर यांनीच कळवले. तसे झाल्यास येणारा गझलगाथा हा ग्रंथ गझल रसिकांसाठी अविस्मरणीय ठरेल यात अजिबातच शंका नाही !
तूर्तास, या अंकासाठी अरुणोदय भाटकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील गझलगाथा ग्रंथासाठी शुभेच्छा !

अंकासाठी संपर्क :

Arunoday Bhatkar :
98191 54411

 

Continue reading संग्राह्य गझल विशेषांक !- संजय शिंदे

0