*✍यशस्वी लेखक बनायचे आहे का ?*
*✍यशस्वी साहित्यिक म्हणुन करिअर करायचे आहे का ?*
साहित्य, लेखन आणि काव्य विषयांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या नवोदित, धडपडणाऱ्या आणि प्रस्थापित लेखकांसाठी दर्जेदार मार्गदर्शनाची सुवर्णसंधी !
मराठीमध्ये एखादा *चेतन भगत, अमिश त्रिपाठी, हरिवंशराय बच्चन , गुलज़ार अथवा अरुंधती रॉय यांच्यासारखा यशस्वी लेखक* का निर्माण होत नाही ? मराठी लेखकांना *बुकर पारितोषिक, नोबेल पारितोषिक किंवा एखादे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पारितोषिक* का मिळत नाही ?
मराठी माणसामध्ये खरंतर प्रतिभा, सृजनशक्ती आणि क्षमता यांची जराही कमतरता नाही. जगातील दहाव्या क्रमांकाची बोलली जाणारी मराठी ही भाषा आहे. पण तरीही अशी परिस्थिती का आहे ? याचा शोध घेताना अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे *मार्गदर्शनाचा अभाव* हे आहे असे लक्षात आले.
त्यातूनच एक लाख लेखक आणि एक कोटी वाचक यांना जोडणारी अभिनव साहित्य चळवळ – साहित्य सेतूचे संस्थापक प्रा. क्षितिज पाटुकले यांनी *लेखन कार्यशाळा* ही अभिनव संकल्पना मांडली. *हिऱ्याला सुद्धा पैलू पाडल्याशिवाय खरी किंमत मिळत नाही.* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी या संकल्पनेला सक्रिय पाठिंबा दिला. २०१७ साली पहिल्यांदा अशा कार्यशाळा आयोजित केल्या होत्या त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि साहित्य सेतू यांनी संयुक्तरीत्या ऑक्टोबर २०१८ ते जानेवारी २०१९ दरम्यान खालील आठ कार्यशाळा आयोजित केल्या आहेत.
१) *व्यावसायिक लेखक बना*- कॉपीराईट, ISBN ,रॉयल्टी, ई-बुक, अमॅझॉन किंडल आवृत्ती, ऑनलाईन वितरण ( १४ ऑक्टोबर २०१८ )
मार्गदर्शक : अॅड. कल्याणी पाठक, भालचंद्र कुलकर्णी, विवेक वेलणकर, प्रा. क्षितिज पाटुकले,
२) *कथालेखन कसे करावे ?* ( २८ ऑक्टोबर २०१८ )
मार्गदर्शक : भारत सासणे, मोनिका गजेंद्रगडकर, मंगला गोडबोले, प्रा. मिलिंद जोशी
३) *कादंबरीलेखन कसे करावे ?* ( १८ नोव्हेंबर २०१८ )
मार्गदर्शक : रविंद्र शोभणे, राजेन्द्र खेर, निलिमा बोरवणकर, अंजली सोमण
४) *ब्लॉगलेखन कसे करावे ?* ( २५ नोव्हेंबर २०१८ )
मार्गदर्शक : भाऊ तोरसेकर, ओंकार दाभाडकर, प्रा. क्षितिज पाटुकले, राम जगताप
५) *गझललेखन कसे करावे ?* ( ०२ डिसेंबर २०१८ )
मार्गदर्शक : म. भा. चव्हाण, रमण रणदीवे, हिमांशू कुलकर्णी, राजन लाखे
६) *संशोधन पद्धती व उपयोजन* ( ०९ डिसेंबर २०१८ )
मार्गदर्शक : डॉ. अरुणा ढेरे, डॉ. मनोहर जाधव, रेखा इनामदार–साने, विलास खोले
७) *अनुवाद कसा करावा ?* ( १६ डिसेंबर २०१८ )
मार्गदर्शक : उमा कुलकर्णी, वर्षा गजेंद्रगडकर, चंद्रकांत भोंजाळ, भारती पांडे
८) *लेखक – तंत्रज्ञान आणि सोशल मीडिया* ( ०६ जानेवारी २०१९ )
मार्गदर्शक : मंदार जोगळेकर, दिपक शिकारपूर, प्रा. क्षितीज पाटुकले
*कार्यशाळेसाठी ऑनलाईन नोंदणी करता येईल.* www.sahityasetu.org या संकेतस्थळाला भेट द्या. आपल्याला या संकेतस्थळावर *www.sahityasetu.org/karyshala* येथे ऑनलाईन नोंदणी करता येईल.
*कार्यशाळेचे ठिकाण* – एम ई एस ऑप्टिमेट्री कॉलेज, पहिला मजला, पेरूगेट भावे हायस्कूल आवार, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
कार्यशाळांची संपूर्ण माहिती आणि अर्ज *७०६६२५१२६२* या व्हॉटसअप क्रमांकावर *‘कार्यशाळा’* किंवा *‘karyashala’* असा संदेश पाठवून मागवता येईल.
अधिक माहितीसाठी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष भेट द्या. *पत्ता – ६२२, जानकी रघूनाथ, पुलाचीवाडी, झेड ब्रिज जवळ, ऑफ जंगली महाराज रोड, डेक्कन जिमखाना, पुणे-०४*. मोबाईल क्रमांक – *७५०७२०७६४५*
*कृपया हा मेसेज आपल्या सर्व व्हाट्स ग्रुप्स आणि कॉन्टॅक्टसना शेअर करा ही नम्र विनंती*