Posted on

माझं किचन- गीता देव्हारे-रायपुरे

3+

पाच खोल्यांचं प्रशस्त घर
कुठूनसा कधीतरी येतोय वारा
अन होऊन जातो वादळ
मात्र ,इथलं किचन मला आताशा
फार आवडायला लागलंय
इथल्या वस्तू
अगदी अळगडीतल्या सुद्धा
मला वाटतात हव्याहव्याशा
कारण त्या ही मला माझ्यासारख्याच
भासतात हल्ली
त्या बोलतात माझ्याशी
सांगतात आपलं दुःख
गांजलेला मुलामा
नकोसा झालाय त्यांनाही
हे सहज कळतंय आता मलाही

तो कांदा चिरतो
तसाच चराचरा कापून घ्यावे वाटतात
त्याने आवळलेले दोर
मात्र रडतात डोळे अक्षरशः
माझ्या पिलांच्या भवितव्यासाठी

तो कुकर बिचारा
किती साठवतो आत वाफ
अन तिसरी शिट्टी झाली की
घेतो मोकळा श्वास
मी ही बघतेय वाट
कुकरसारखीच रोज रोज
मोकळा श्वास घेण्याची

किचनच्या तावदानातून
येणारी किरणं
माझी व्यथा ती बघतात रोज
माझ्यासाठी दोन पावलं पुढे उचलतील
या आशेनं मी ही झेलून घेते अंगावर मनसोक्त
दिवस आपोआप आशावादी होतो
म्हणूनच
मला फार आवडायला लागलंय माझं किचन!

गीता देव्हारे-रायपुरे

3+
Posted on

‘ई-बुकमुळे वाचकांचा टक्का वाढतोय’

0

Maharashtra Times | Updated: Jan 28, 2018, 01:02AM IST

म. टा. वृत्तसेवा, ठाणे 

गेल्या काही वर्षांत वाचकांचा टक्का कमी होत असल्याची टीका होत आहे. मात्र, यात तथ्य नाही. कारण ई-बुक वाचकांची संख्या वाढत आहे. ई-बुक हे मुद्रीत पुस्तकांच्या तुलनेने स्वस्त आणि पटकन उपलब्ध होणारे असल्याने त्याचा वापर करणाऱ्या वाचकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रतिपादन ब्रोनेटो डॉट कॉमचे शैलेश खडतरे यांनी केले. शनिवारी गडकरी रंगायतन कट्टा येथे लेखक व इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांच्या ई-बुक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

‘ई-बुक’मुळे वाचनसंस्कृती सर्वदूर पोहोचण्यास मदतच होणार आहे. मुद्रित पुस्तकांच्या वितरणाला मर्यादा असतात. शिवाय पुस्तकांचा खर्चही अफाट असतो. त्यामुळे या पुस्तकांच्या किंमतीही तुलनेने अधिक असतात. त्याउलट ई-बुक स्वस्त आणि जगभर उपलब्ध असते. कुणीही पैसे मोजून ते पुस्तक डाऊनलोड करू शकतो. त्याचा वितरणाचा आणि छपाईचा खर्च नसल्याने पुस्तकाच्या किंमती थेट अर्ध्यावर येतात. त्यामुळे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकजण ई-बुक वाचतात, असे खडतरे म्हणाले. ई-बुक प्रकारातील कोणत्याही पुस्तकाची २० पाने विनामूल्य वाचता येतात. मात्र ती कॉपी करता येत नाहीत. त्यामुळे पायरसी रोखली जाते. पैसे थेट लेखकाच्या बँक खात्यात जमा होतात. याशिवाय अनेक पुस्तके विनामूल्यही मिळतात. तसेच लेखकाचे लिखाणही जगभर पोहचण्यास मदत होते, अशी माहिती खडतरे यांनी दिली.

टेटविलकर यांच्या महाराष्ट्रातील वीरगळ, ‘दुर्गलेणी : दिव, दमण आणि गोव्याची’ ही दोन पुस्तके ब्रोनॅटो डॉट कॉमने इंग्रजीत ई-बुक रूपात प्रकाशित केली. त्याचबरोबर ‘दुर्गयात्री’ हे टेटविलकरांचे मराठीतील पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोकण इतिहास परिषदेच्यावतीने गडकरी कट्टा येथे आयोजित एका समारंभात या तीन ई-बुकचे औपचारिक प्रकाशन झाले. रविंद्र लाड यांनी ई-बुक या आधुनिक माध्यमात ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनुवाद करणाऱ्या माधुरी गोखले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. टेटविलकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकात नव्या माध्यमात ऐतिहासिक लेखन उपलब्ध करून दिल्याबद्दल ब्रोनॅटो डॉट कॉमचे आभार मानले.

मूळ वृत्त येथे वाचा

0
Posted on

‘मुक्त व्यासपीठ’ आणि Bronato प्रस्तुत ‘काव्य स्पर्धा’

12+

प्रत्येक माणूस हा रसिक असतो आणि त्याच्या आत कुठे ना कुठे तरी एक कलाकार दडलेला असतो. तुमच्या आत देखील असाच एखादा कलाकार दडलेला असेल. अशा कलाकारांसाठी सुरवात झाली मुक्त व्यासपीठाची.. मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल गेले एक वर्ष साहित्यातील अनेक कलाकृती रसिकांसमोर आणायचा प्रयत्न करत आहे. ह्या मुक्त व्यासपीठाला दिनांक २८ जानेवारी २०१८ रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्ताने आम्ही, म्हणजेच ‘मुक्त व्यासपीठ’ आणि ‘bronato.com’ ह्यांच्या संयुक्त विद्यमाने एक स्पर्धा आयोजित केली आहे, जिथे तुमच्या आत दडलेल्या कवीमनाला संधी मिळेल. तुम्हाला इतकंच करायचं आहे कि तुमची एक रचना आम्हाला ईमेल करायची आहे.

तुम्ही पाठवलेल्या कवितांपैकी काही निवडक कविता आम्ही bronato.com वर ब्लॉग स्वरूपात प्रसिद्ध करू. त्या नंतर सर्व निर्णय हा रसिकांचा असेल. प्रत्येक कविते खाली रसिकांना लाईक करण्याचं ऑप्शन असेल. सर्वाधिक लाईक असलेल्या ३ कवींना संधी मिळणार आहे ‘मुक्त व्यासपिठावर’ झळकण्याची. जिंकलेल्या ३ कवी आणि त्यांच्या कवितांचे मुक्त व्यासपीठ तर्फे व्हीडीओ बनवले जातील. आणि आपल्या चॅनल वरून प्रसिद्ध केले जातील.

आम्ही तुम्हाला संधी देत आहोत जगा समोर तुमच्या कवितेला सादर करण्याची. तर वेळ दवडू नका. लवकरात लवकर आम्हाला तुमची कविता पाठवा.

 

तुमच्या कविता आम्हाला ह्या इमेल आयडी वर पाठवा

mukt.sanvad@gmail.com

स्पर्धेचे नियम व अटी:

१. तुम्ही मुक्त व्यासपीठ हे युट्युब चॅनल सबस्क्राईब केलेलं असावे..

२. ब्रॉनतो.कॉम वर तुम्ही रजिस्टर असावे..

३. तुम्ही पाठवलेली कविता हि तुम्ही स्वतः रचलेली असावी..

४. पाठवलेली कविता जर ह्या पूर्वी कुठे हि प्रकाशित झाली असेल तर त्या कवितेचे पूर्ण हक्क तुमच्याकडे असणे आवश्यक आहेत.

५. स्पर्धे दरम्यान किंवा त्या नंतर हि जर कुणी हि त्या कवितेवर तुमच्या व्यतिरिक्त हक्क सांगितला आणि जर ती कविता तुमची नाही असं सिद्ध झालं तर ती कविता स्पर्धेतून रद्द केली जाईल..

या स्पर्धेची माहिती तुमच्या WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा.

12+
Posted on

दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

0

ब्रोनॅटोची बुक राईड १२/१२/२०१७

‘सध्याची पिढी वाचत नाही’ हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. पण थोडं बारीक निरीक्षण केल्यास जाणवेल की, सध्याची पिढी भयंकर वाचन करते आहे. पण ते डिजिटल स्वरूपातील वाचन आहे. या डिजिटल वाचनाची एक बाजारपेठ निर्माण झाली आहे. आणि या बाजारपेठेत सर्वात वेगाने वाढ होते आहे ती म्हणजे ‘ईपुस्तक उद्योगाची’.

२०१४ मध्ये जेव्हा मी ईपुस्तक प्रकाशन व्यवसायात उतरलो तेव्हा असं जाणवलं की या क्षेत्राचा ‘उद्योग’ म्हणून विकास होत नाहीये. आणि मला तर या क्षेत्रातील अमाप संधी खुणावत होत्या. मी ठरवलं की आपण व्यावसायिक दृष्ट्याच व उद्योग म्हणूनच ई पुस्तक निर्मिती करायची आणि ते ही जागतिक मापदंड वापरून. सुरुवातीपासूनच ईपुस्तके अधिक Continue reading दैनिक ‘सकाळ’ने दिली ब्रोनॅटो च्या यशोगाथेची नोंद

0