Posted on

‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’चे अॅप

0

*’थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’चे अॅप*

_ओळख आपल्‍या सामाजिक-सांस्‍कृतिक सभोवतालाची_
_आसपासच्‍या चांगुलपणाची आणि विधायक घडामोडींची_

महाराष्ट्रातील बुद्धिप्रतिभा आणि चांगुलपणा यांची कायमस्‍वरूपी नोंद करणारा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हा प्रकल्प *ॲपच्‍या स्‍वरूपात* दिवाळीच्या मुहूर्तावर जगभरातील समस्त मराठी वाचकांसमोर सादर झाला. तो प्रकल्प मराठी माणसाच्‍या कर्तृत्‍वाची, सेवाभावाची, प्रज्ञाप्रतिभेची, परंपरेची, सांस्‍कृतिक वैभवाची जणू डिजिटल नोंदवही आहे. आता ती माहिती ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या अॅपद्वारे वाचकांपर्यंत नित्‍यरोज पोचणार आहेत.

हे केवळ ‘अॅप’ नव्‍हे, हा तर आपला सकारात्‍मक भवताल!

या अॅपमध्‍ये वाचायला (आणि पाहायलासुद्धा!) मुबलक गोष्‍टी उपलब्‍ध आहेत.
म्‍हणजे नेमकं काय?

* महाराष्ट्रातील प्रेरणादायी व्यक्तींची छोटेखानी चरित्रे. (कलाकार, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, विचारवंत, लेखक, छांदिष्ट, प्रयोगशील शिक्षक, महाराष्ट्रात होऊन गेलेल्या विशेष व्यक्ती… अर्थात महाराष्ट्रातील चांगुलपणाचे प्रतिनिधित्व करणारी तुमच्या-आमच्यातील माणसे.)

* साहित्य, शिक्षण, संस्कृती, जलसंवर्धन, लोकविकास, ग्रामसुधारणा, पर्यावरण, इतिहास, नगररचना, वाहतूक, नागरी हक्‍क अशा विविध क्षेत्रातील प्रश्‍नांवर उत्‍तरे शोधण्‍यासाठी कार्यरत असलेल्या संस्थांची ओळख. चांगली व विधायक कामे घडवणारे समूह व लहानमोठे उपक्रम.

* महाराष्ट्रातील संस्कृतीच्या नानाविध छटा. (ग्रामदेवता, प्रथा-परंपरा, यात्रा-जत्रा, लोककला, गडकिल्ले, लेणी, ऐतिहासिक वास्तू, खाद्यसंस्कृती, पेहराव, स्थानिक इतिहास, वैशिष्ट्यपूर्ण बाजार, वनसंपदा, प्राणी व पक्षी वैभव असे बरेच काही!)

* मंथन या सदरात वाचा विचारप्रवर्तक लेख. समकालीन घडामोडींवर विचारी, संवेदनशील आणि संयत भाष्य असलेली टिप्पणी.

* त्यासोबत मराठी भाषा, कला, साहित्‍य, गावांच्‍या नोंदी अशा अनेकविध दालनांमधून उपयुक्‍त, वाचनीय लेखन.

_सोमवार ते शुक्रवार दररोज_

* ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या युट्यूब चॅनेलवरून प्रत्‍येक शनिवारी आणि रविवारी सादर होतो व्हिज्‍युअल कंटेण्‍ट. त्‍यात असतील मुलाखती, चर्चा, व्‍यक्‍तींची ओळख, उपक्रमांची माहिती आणि बरेच काही. तो सारा ‘कंटेण्‍ट’ पाहता येईल ‘थिंक महाराष्‍ट्र’च्‍या अॅपवरून.

सोबत दिलेली लिंक क्लिक करा (https://play.google.com/store/apps/details?id=com.thinkmaharashtra.cordova) आणि गुगल प्‍ले स्‍टोअरवरून ‘थिंक महाराष्‍ट्र’चे अॅप डाऊनलोड करा.

*चला! महाराष्‍ट्र जाणून घेऊया!*

_दीपावलीच्‍या शुभेच्छा!_

– टिम ‘थिंक महाराष्‍ट्र’

https://play.google.com/store/apps/details?id=com.thinkmaharashtra.cordova

 

 

 

 

0
Posted on

बुकशेल्फ: महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित

0

महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित

हो! यावेळचा व्हिडीओ सादर करायला आमच्‍याकडून थोडा उशीर झाला. मात्र आम्‍ही ‘महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित’ हे एक वेगळं पुस्‍तक तुमच्‍यासमोर घेऊन आलो आहोत. यावेळचा व्हिडीओ विशेष आहे, कारण ‘बुकशेल्फ’वर पुस्‍तकाच्‍या परिचयासोबत ते पुस्‍तक घडवणा-या तेवढ्याच वैशिष्‍ट्यपूर्ण उपक्रमाचीदेखील ओळख करून देण्‍यात आली आहे.

‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ हा महाराष्‍ट्राचे सामाजिक-सांस्‍कृतिक माहितीसंकलन करणारा राज्‍यव्‍यापी सामाजिक उपक्रम आहे. त्‍या उपक्रमाच्‍या वेबपोर्टलवरील निवडक लेखनाचे संकलन ‘महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित’ या ग्रंथामध्‍ये वाचता येते. त्‍या ग्रंथात महाराष्‍ट्रातील वेगवेगळ्या प्रदेशांतील कर्तृत्‍ववान व्‍यक्‍ती, सामाजिक संस्‍था आणि गावोगावच्‍या सांस्‍कृतिक वैशिष्‍ट्यांची ओळख करून देण्‍यात आली आहे. पुस्‍तकाच्‍या आरंभी संपादक दिनकर गांगल यांनी लिहिलेला ‘मेंढालेखातील खुशी’ हा सचित्र लेख आहे. मेंढालेखा हे आदिवासी गाव नक्षलवादी टापूत येते. तेथील गावक-यांनी अशा गावात लोकशाही विकेंद्रीकरणाचा लढा यशस्‍वी करून दाखवण्‍याचा चमत्‍कार घडवला आहे. मलखांबाचा इतिहास आणि वैशिष्‍ट्ये विषद करणारा ‘खेळांचा राजा – मल्‍लखांब’, पुण्‍याच्‍या वैशिष्‍ट्याची ओळख करून देणारा ‘पुण्‍यातील मंडई विद्यापीठ’, तर ओवळेकरांची मनमोहक आणि चित्‍तवेधक अशी ‘फुलपाखरांची बाग’ असे लेख त्‍या ग्रंथाचे वैशिष्‍ट्य आहेत. पुस्‍तकाचा सविस्‍तर परिचय ‘बुकशेल्फ’च्‍या व्हिडीओमध्‍ये होईलच…

‘बुकशेल्फ’ची टिम या पुस्‍तकावर काम करत असतानाच ‘थिंक महाराष्‍ट्र’ने ‘महाराष्‍ट्राचे संस्‍कृतिसंचित’ या ग्रंथाचा दुसरा खंड प्रकाशित केला. आम्‍ही या व्हिडीओत केवळ पहिल्‍याच खंडाची ओळख करून दिली असली, तरी ते दोन्‍ही खंड तेवढेच वाचनीय आहेत. ते दोन्‍ही खंड ऑनलाइन खरेदीकरता उपलब्‍ध आहेत. ते विकत घेण्‍याकरता पुढील लिंकचा वापर करावा.

या लिंकवरून पुस्‍तक विकत घेतल्‍यास पुस्‍तकाच्‍या पोस्‍ट किंवा कुरिअर अशा खर्चावर सवलत मिळेल.

खंड एक – https://goo.gl/MbrT92
खंड दोन – https://goo.gl/d3fjWm

धन्‍यवाद.

– टिम ‘बुकशेल्फ’

0