Posted on

गझल- संजय सकटे

55+

भोगली शिक्षा जरी निष्पाप होतो
हाच माझा दोष की चुपचाप होतो

दुःख करतो पालथे मी कागदावर
अन रिकामा रोज आपोआप होतो

कोणता झाला गुन्हा हातून माझ्या
का मनाचा सारखा थरकाप.. होतो ?

काळजाला सारख्या डसतात माझ्या
अठवणीचा का विषारी साप…होतो

तोडले लचके कळ्यांचे लाडंग्यानी
देखणेपण हा फुलांचा शाप.. होतो

जीर्ण झाला कागदागत देह त्याचा
मग समजले कोण मी अद्याप होतो

पाहिजे होते मला काळीज कणखर
या मऊ हळवेपनाचा ताप….. होतो

टोचलो अन फेकले काढून.. त्यानी
गुंतल्या केसातला मी चाप…. होतो

लायकी ज्याची तिला सांभाळण्याची
तोच एखादा मुलीचा बाप……. होतो

संजय सकटे

 

55+
Posted on

श्लील अश्लील- विशाल लोणारी

10+

श्लील अश्लील या बाबी
गळून पडतात
जेव्हा समाजाच्या
सो कॉल्ड शुद्ध सात्विक गोंजस विचारांनी
ठेचून ठेचून मारण्यात येतात
व्यक्तीच्या सुखनैव भावना

या भावनांचे केलं जातं नामांतर
वासना म्हणून
अन, बंधनाच्या काळ्या राखेने झाकोळून टाकलं जातं
ऊरात धगधगत करत पेटलेली आग

अशावेळी
कुणा ललनेवर चढून
दोघे उपभोगतोय आनंदी संभोग
एकमेकांच्या जिभांनी त्या क्षणी भिडवलं आहे संबंध आयुष्य
की, ताठलेल्या शिश्नच्या धक्के घेऊन जात आहेत, समाधानाच्या अत्युच्च पातळीवर
या विचारांनी तो
करत असेल सुखासुखी हस्तमैथुन तेव्हा
किती जाड जाणवायला लागेल त्याचा अवयव तेव्हा
किती लांब उडतील वीर्याच्या पिचकाऱ्या

कोणत्यातरी न्यूनगंडाची भावना
सुडोप्रत उराच्या पार खोलपर्यंत
आग लावत सुटते, विचारांना
तेव्हा आलेल्या नैराश्याला उकळवून फेकून देण्यासाठी
त्याला करूच द्या
मनसोक्त हस्तमैथुन

एकट्या पडल्या जीवाला
त्रिखंड गुंजत उठेल इतक्या
सौम्य आवाजात
नपुसंक
ठरवायचा स्कोपच
तुम्हाला मिळणार नाही, मग

विशाल लोणारी

 

10+
Posted on

प्रजासत्ताक भारत- शिवाजी भोसले

70+

अर्धा भारत जगतो अर्ध्या पावावर
अन कसाब इथे बिर्याणी खातो,
अर्ध्या पोटच्या पूर्ण प्रश्नातही
भारत आम्हाला कुठे प्रजासत्ताक दिसतो हो?

आईच्या आकांतात अन बापाच्या आग्रहात
आजही खुडले जाते निष्पाप कळीला
तिच्या मिटणाऱ्या डोळ्यांसोबतही
भारत आम्हाला कुठे प्रजासत्ताक दिसतो हो?

काळ्या ढेकळात घाम गाळूनही
बाभलीलाच शेवटी जवळ करतो शेतकरी राजा
पोशिंद्याच्या या बलिदानातही
भारत आम्हाला कुठे प्रजासत्ताक दिसतो हो?

टेबलाखालून टेबलावर आजही सुरूच असत
कधी भगवं कधी निळं हिरवं रक्त इथं वाहत
दोन दिवसच आठवणाऱ्या तिरंग्यातही
भारत आम्हाला कुठे प्रजासत्ताक दिसतो हो?

छताडावर वार झेलणारा भारत पहिला आपण
अहो देशभक्तीच्या दाखल्यांमध्ये
भारतमातेच्याच पाठीत खंजिर खुपसणाऱ्या माणसात आज
भारत आम्हाला कुठे प्रजासत्ताक दिसतो हो?

शिवाजी भोसले

 

70+
Posted on

मासिक पाळी- संजय जाधव

7+

घरातली महत्वाची
दोन स्क्वेअर फूट जागा
अडवून बसलेल्या निष्क्रीय देवांनो !

बायकोच्या मासिक पाळीत
तिची पूजा नाकारताना
आणि तिला वाळीत टाकताना
तुमचं देवत्व फारकत घेतं
तमाम धार्मिक फालतू कर्मकांडांशी.

बेवारस कुत्र्यांच्या पिल्लांसारखे
तुमचे पौराणिक संदर्भ
कण्हत.. ..लोळत रहातात
निर्माल्याच्या गटारगंगेत.

अशावेळी मी ठरवतो
ठामपणे.
बायकोच्या ऋतू वस्त्रांवरच
तुमची स्थापना करायचं
आणि तुम्हालाच “पाळी”त उभं करायचं.

संजय जाधव

 

7+
Posted on

छंद……!- महेश देशपांडे

309+

शेवटी भेटलोच आपण…..!

किती वर्षांनी माहीत नाही…
पण आज मिळाला वेळ
तूला तुझ्या आणि मला माझ्या प्रपंचातून…..!

किती घुम्या सारखी असतेस…
नुसतच आभाळ गच्च दाटल्या सारखं वाटतं….
पण बरसत नाहीस ….अजूनही..!

काही सांगू पाहतेस मला…पण
नुसतीच सरगम चिवडत बसतेस..
समेवर येत नाहीस…अजूनही..!

कित्येक उमाळे,उसासे  मुरवत ठेवलेस तू आतल्या आत ..
पातिव्रत्य जपण्यासाठी…
ते ओठांवर आणत नाहीस …अजूनही…!

बघ ना….!
इतका वेळ आपण फक्त लाटा मोजतोय…आपल्यात उमडणाऱ्या…
मी भिजलोय पुरता…पण तू पूरती ओली झाली नाहीस … अजूनही..!

फूट गं राणी आणि मोकळी हो….
होउ दे प्रवाही काय मुरतंय तुझ्यात ते…
घुसळून निघूदे तुझा चांगुलपणा….
वाहू दे पातिव्रत्य आणि स्वामिनिष्ठा…

मिसळूदे लाटांत तुझी बंधनं तुझ्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा निर्माल्य झालेल्या……

मी होतोच किनारा तुझ्या समुद्राचा …तेव्हाही…
मी आहे किनारा समुद्राचा अजूनही…!

शेवटी भेटलोच आपण….!

महेश देशपांडे

 

 

309+
Posted on

एकमेकांचे कधी झालोत आपण..? अमर शिंदे 

5+

का अचानक एकटे वाटून जाते..?
की खरोखर एकटे आहोत आपण..?.

ती कधीची विसरली नात्यास एका
तेच नाते घेउनी जगलोत आपण

काजळी व्यापून घेते सांजवेळी
रोज जळणारी दिव्याची ज्योत आपण

शेवटी औकात दाखवणार दुनिया
मग कितीही चांगले वागोत आपण..

आपले काही कधी ठरलेच नाही
आपले काहीतरी ठरवोत आपण…

वाहत्या प्रेतास पडला प्रश्न नंतर
कोणत्या काठावरी आलोत आपण..?

अमर शिंदे 

 

5+
Posted on

माझं किचन- गीता देव्हारे-रायपुरे

3+

पाच खोल्यांचं प्रशस्त घर
कुठूनसा कधीतरी येतोय वारा
अन होऊन जातो वादळ
मात्र ,इथलं किचन मला आताशा
फार आवडायला लागलंय
इथल्या वस्तू
अगदी अळगडीतल्या सुद्धा
मला वाटतात हव्याहव्याशा
कारण त्या ही मला माझ्यासारख्याच
भासतात हल्ली
त्या बोलतात माझ्याशी
सांगतात आपलं दुःख
गांजलेला मुलामा
नकोसा झालाय त्यांनाही
हे सहज कळतंय आता मलाही

तो कांदा चिरतो
तसाच चराचरा कापून घ्यावे वाटतात
त्याने आवळलेले दोर
मात्र रडतात डोळे अक्षरशः
माझ्या पिलांच्या भवितव्यासाठी

तो कुकर बिचारा
किती साठवतो आत वाफ
अन तिसरी शिट्टी झाली की
घेतो मोकळा श्वास
मी ही बघतेय वाट
कुकरसारखीच रोज रोज
मोकळा श्वास घेण्याची

किचनच्या तावदानातून
येणारी किरणं
माझी व्यथा ती बघतात रोज
माझ्यासाठी दोन पावलं पुढे उचलतील
या आशेनं मी ही झेलून घेते अंगावर मनसोक्त
दिवस आपोआप आशावादी होतो
म्हणूनच
मला फार आवडायला लागलंय माझं किचन!

गीता देव्हारे-रायपुरे

3+
Posted on

राधा – सचिन चौकासकर

299+

या नजरेची त्या नजरेला
जेव्हा होते नकळत बाधा ।
हरऊन जाते ती तीजला अन
होऊन जाते नटखट राधा ।।

केस रेशमी पवन उडवता
हळुच सुटतो कुंतल गुंता ।
गंध मोगरा दरवळतो अन
मोहुन जाते शामल राधा ।।

सुरेल बासरी नभांत घूमता
भान हरपते जपता जपता ।
मनी पिसारा मोर फुलवतो
धुंद बरसते श्रावण राधा ।।

इंद्रधनु तो धरी टेकता
रंग उधळतो येता जाता ।
भाव तयाचे टिपता टिपता
लाज बावरी होते राधा ।।

गोकुळ गोडी चाखुन घेण्या
घट लोण्याचा चोरून नेता ।
क्षणात हसते क्षणात रूसते
हळुच फसते वेडी राधा ।।

नाद वेणुचा कानी येता
तना मनात फुलते राधा ।
यमुने काठी फिरता फिरता
कृष्णा साठी झुरते राधा ।।

सचिन चौकासकर

299+
Posted on

माझ्या  कवितेचं  चांदणं – ज्योती. प. शिंदे

28+

 

माझं  सांजावलं  मन
निज  सावलीच्या  कुशीत
स्वप्न   ओल्या  काळजाची
विखुरली  चिंब  डोळ्यात!

उंडारुन  जाती   क्षण
गर्द  पाचूच्या   रानात
कधी  धुमसते  ज्योत
निमिष  काळोख्या रातीत!

मंद  पाखरांचा  थवा
घेई   भरारी   नभात
निळ्या  भैरवीचे  सूर
गुंजे  ढगांच्या  ढोलात!

धुकं  घेऊनी   कवेत
कसं  आभाळ  निजतं
माझ्या  कवितेचं चांदणं
शब्दा  शब्दात  झंकारतं!

ज्योती. प. शिंदे

 

28+
Posted on

तुला काय हवंय माझ्याकडून?- शिल्पा राजेंद्र सपकाळ

19+

शरीरासोबत मनाला ही उपभोगायला शिकशील हळूहळू
एवढीच काय ती श्रद्धा नाहीतर अपेक्षा पूजत जगत आहे
मुलां बाळांच्या देव्हाऱ्या समोर

जरी तू गरजे पुरता गोड होतोस
आणि मी
तुझ्या चार प्रेमळ शब्दां खातर तुझ्या स्वाधीन होते

शरीरावरचा प्रत्येक कपडा नाही तर
मनावरची एक एक खपली चिघळवतोयेस

म्हणून च आता ,
ही विद्रुप रात्र नकोशी वाटते

मनावरील न दिसणारे आणि अंगावरील दिसणारे
ओरखडे लपवावेत किती आणि कसे ?
म्हणून हा धुसपुसणारा दिवस ही पचायला जड जातोय हल्ली

आज जरा जास्त च घेतलीस वाटतं !

पूर्वी तू मित्रांसोबत पार्टी करून आलास तरी ,
मी तुला आपल्या रूम मध्ये येऊ नाही द्यायचे

पण आता ,

आता तू प्यायल्या खेरीज मला तुझ्या रूम मध्ये घेत नाहीस
अर्ध आयुष्य संपून गेलं रे आपलं, आता तरी शुद्धीवर ये !

बाय द वे,

विशिंग यु हैप्पी थर्टीयेथ वेडिंग अनिव्हर्सरी
तुला काय हवंय माझ्याकडून  ?

शिल्पा राजेंद्र सपकाळ

 

19+