Posted on

मालवणी कथा, कविता स्पर्धा

0

अभिनंदन एक शब्द अपुरो वाटता ..
ब्रोनाटो.कॉम चे सर्वेसर्वा शैलेश खडतरे अन मी मालवणीसाठी एक छोटंसं स्वप्न बघितलं. मालवणी भाषा रसिकांच्या फक्त घरापर्यंत नव्हे तर त्यांच्या मोबाईल, किंडल सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मनापर्यंत पोचली पाहिजे हाच उद्देश घेऊन गेल्या वर्षीपासून डिजिटली मालवणी कथा स्पर्धा घेण्याचं ठरवलं .. २०१८ मध्ये पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला.. आमच्या स्वप्नांना पूर्णत्वास नेल्यास ग्लोबल मालवणी या सामाजिक संस्थेची अनमोल साथ लाभली ..

नवोदित साहित्यिकांसाठी स्वलिखित कथा- काव्य स्पर्धा आयोजित करून मालवणी भाषा संवर्धन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला गेला. जिल्ह्यातील नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन व व्यासपीठ मिळावे, त्याद्वारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यायाने मालवणी साहित्यिक वारसा जपला जावा हा या स्पर्धेचा मुख्य हेतू होता. या कथा-काव्य स्पर्धेत जिल्ह्यातून २५९ लेखक, कवींनी सहभाग घेतला. नवनवीन विषय,नव्या दमाची लेखणीची ताकद अन मालवणी साहित्य दर्जा यांचा संगम या स्पर्धेच्या निमित्ताने दिसून आला. या स्पर्धेसाठी प्रसिद्ध मालवणी साहित्यिक श्री.प्रभाकर भोगले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. सदर स्पर्धेचे नियोजन नितीन नाईक यांनी केले.. स्पर्धेतील निवडक कथा, कविता यांचे मिळून ब्रोनाटो डॉट कॉम यांच्या मार्फत ई बुक तयार केलं जाईल.विजेत्या पहिल्या पाच कथा लेखकांना तसेच पहिल्या दोन कविता लेखकांना ग्लोबल मालवणी संस्थेकडून पारितोषिके प्राप्त होतील.
तर कथा आणि काव्य विभागातील प्रथम पारितोषिक
विजेत्यांना रोख रक्कम, ग्लोबल मालवणी सन्मानचिन्ह, ब्रोनाटो डॉट कॉम कडून प्रशस्तीपत्र जाहीर करण्यात आले आहे …
सदर स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे (कंसात क्रमांक व कविता/ कविता )
कथा विभाग …
*सरिता पवार (पहिला : फेरो)*,
*कल्पना मलये (दुसरा:तांबडा कलाम ),*
*अर्चना परब (तिसरा: म्हापुरुस)*
*नितीन राणे (चौथा :सकलोज फेणी)*
*न्हयवरली भेट (पाचवा:पूर्णिमा मोरजकर)*
काव्य विभाग

*अश्विनी परब (प्रथम: विटाळ)*

*श्रेयश शिंदे (द्वितीय: रोम्बाट)*

मी नितीन नाईक तुम्हा सर्व मायबाप लेखकाचे आभार व्यक्त करतो ..आमच्या सोबत वटवृक्ष म्हणून असलेल्या ग्लोबल मालवणी संस्थेचे अध्यक्ष Sachin Acharekar अन त्यांच्या संपूर्ण टीम चे आभार .. मा. Prabhakar Bhogle आपच्या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून लाभले त्यांचेही आभार .. भावासारखा मित्रा Shailesh Khadtare तुझे ही मनापासून आभार .. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला लाभलेल्या त्या प्रत्येक लेखक, कवी अन इतर व्यक्तींचे आभार …

विजेत्यांचे साहित्य तुम्हाला लवकरच ईबुक च्या स्वरूपात ऍमेझॉन किंडल आणि गूगल प्ले बुक्स वर विनामूल्य उपलब्ध होईल . www.bronato.com वर अपडेट दिले जातील ..

#मालवणी भाषा मोठी अन समृद्ध होवक होई ह्यासाठी केलेलो ह्यो प्रयत्न ..अशीच साथ देत रव्हा ..

#आमकांतुम्हीमहत्वाचे

Archana Parab Nitin Rane Shreyash Shinde पूर्णिमा गावडे मोरजकर Sarita Chavan Kalpana Malaye Ashwini Sawant Parab

0