Sale!

स्मरणिका २०१८

150.00 0.00

सप्रेम नमस्कार मंडळी,

सलग तिसऱ्या वर्षी ट्विटरसंमेलनाच्या स्मरणिका प्रकाशनाचे काम हे आधीच्या दोन वर्षांपेक्षा अधिक व्यापक व आव्हानात्मक होते. या वेळी प्रथमच साहित्य व व्याख्याने थेट ईमेलने पाठवावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदा व्याख्यानांची संख्या जास्त आहे. आलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणात व्याकरणाच्या चुका होत्या. त्या दुरुस्त करून घेण्यात सर्वाधिक वेळ गेला. पुढील वर्षी प्रत्येकाने आपले साहित्य चोखंदळपणे तपासून त्यात सुधारणा करून पाठवावे ही विनंती. आलेल्या सर्व साहित्याची निवड करणे शक्य नव्हते म्हणून काही ठराविक निकष लागू करून साहित्य निवडले आहे.

ट्विटरसंमेलन म्हणजे समाज माध्यमांवर होणारा भाषिक सोहळा आहे. या सोहळ्यात सर्वांचे स्वागत तर आहेच शिवाय व्यक्त होण्याची मुभा आणि प्रतिसाद मिळण्याची हमी देखील आहे.

आपली ही स्मरणिका आकर्षक व वाचनीय व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षांच्या स्मरणिका या अनेक देशांमध्ये वाचल्या गेल्या आहेत. २०१८ ची ही स्मरणिका देखील उजळ भाग्याने वाचकांच्या प्रेमाला पात्र ठरेल अशी आशा आहे.

लिहिताना आपण जे लिहिले आहे त्यावर भाषिक व भावनिक संस्कार करून लिहिणाऱ्याने लिहित जावे आणि असेच प्रभावित करणारे लेखन करत राहावे.

यावेळी स्मरणिका प्रकाशित करायला थोडा उशीर झालाय पण एक उत्तम ईपुस्तक प्रकाशनासाठी तयार करायला लागणारी सर्वोतोपरी काळजी व आवश्यक तांत्रिक बाबी साभाळून हे काम करण्यात आले आहे.

ईपुस्तक उद्योग उभारणीच्या आमच्या या ध्येयात हल्लीच ब्रोनॅटो ने ३९ देशांमध्ये ९१,००० [एक्याण्णव हजार] मराठी ईपुस्तक डाउनलोड्सचा पल्ला गाठला आहे. हे काम अजून खूप मोठ्या प्रमाणात करायचे आहे. मराठीतील अनेक लेखक लेखिकांच्या साहित्याला जागतिक मागणी तर आहेच शिवाय त्यांच्या साहित्याचा पुरवठा थेट वाचकांच्या मोबाईलवर व आर्थिक मिळकत थेट त्यांच्या स्वतःच्या अकौंटवर पोचवण्याचे काम ब्रोनॅटो आनंदाने करतंय. आणि करत राहील.

ट्विटरसंमेलनाचे आयोजक स्वप्नील शिंगोटे यांचे प्रोत्साहन व सहकार्य या वर्षी देखील लाभले, यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. शिवाय ट्विटरवर इतकी सुंदर संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यांचे खूप कौतुक. पुढील वर्षी देखील इतक्याच जोमाने व उदंड उत्साहाने स्मरणिका सजवली व जगभर निःशुल्क वितरीत केली जाईल याचे प्रेमपूर्वक आश्वासन देतो आहोत.

या स्मरणिकेबाबत तुमचा वाचनानुभव आम्हाला ईमेल किंवा WhatsApp [९९७००५१४१३] ने नक्की कळवा.

[या ईपुस्तकातील मते व विचार ही लेखकांची वैयक्तिक मते व विचार आहेत. प्रत्येक मताशी व विचाराशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.]

लोभ असावा.
शैलेश खडतरे

@ShaileshBronato
www.bronato.com

Description

0

नमस्कार,

ट्विटर संमेलनन म्हणजे मुक्त व्यासपीठ, आपले विचार, साहित्य हजारो लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी हे समीकरण सलग तिसऱ्या वर्षी सिद्ध झाले. यंदाचे संमेलन अतिशय थाटात पार पडले. हजारोंनी ट्विट्स संमेलनात पडल्या आणि मराठी ट्विटरकर मनसोक्त व्यक्त झाले. यंदाच्या संमेलनात विशेष असे बारा हॅश टॅग निवडले होते. ट्विटरकरांनी बाराही हॅशटॅग वापरून आपले विचार संमेलनात मांडले.

मराठी भाषेत ट्विटरवर काहीतरी सकस लिहिले जावे म्हणून तीन वर्षांपुर्वी पहिले ट्विटर संमेलन भरले.

गतवर्षीचा उत्साह यंदाही पहायला मिळाला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी ट्विटरकरांनी यंदा संमेलनात मोठ्या संख्येने ट्विट केले.

नेहमी प्रमाणेच यंदाही #माझीकविता हा लोकप्रिय हॅशटॅग होता. वेगवेगळ्या विषयांवरील कविता संमेलनात वाचायला मिळाल्या. ट्विटरकरांनी आपले छंद, कथा, कविता, पाककृती, मराठी साहित्य ह्या आणि अशा अनेक विषयांवर मराठीतून ट्विटरवर लिहिले. मराठीतून लिहण्यासाठी एक कारण मिळावं म्हणूनच तर हा संमेलन उद्योग थाटला आहे, ट्विटरकरांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले.

मराठी शाळेतील आपले अनुभव, महाराष्ट्रातील बोलीभाषा, मराठीसाठी तंत्रज्ञान या विषयांवरही मौलिक चर्चा झाली. यंदाच्या संमेलनात गेल्या वर्षी प्रमाणे ट्विटर व्याख्यानाचा प्रयोग झाला. मराठी भाषेशी संबंधी अनेक विषयांवर व्याख्याने झाले. संमेलनाला मिळालेले बौद्धिक अधिष्ठान हे ट्विटरव्याख्यानाचेच फळ आहे, हे आम्ही आनंदाने नमूद करू इच्छितो.

यंदाच्या संमेलनाला माध्यमांकडून भरपूर प्रोत्साहन मिळाले. बीबीसी मराठी, मटा, सकाळ इत्यादी मराठी प्रसारमाध्यमांनी ट्विटकरांच्या या सोहळ्याचे कौतुक केले.

मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर तिला कुठल्याही माध्यमाचे वावडे असण्याचे कारण नाही, ट्विटर संमेलनामुळे ट्विटरचे माध्यम मराठीमय होण्यासाठी हातभार लागेल ही अपेक्षा करतो.

‘ब्रोनॅटो.कॉम’चे शैलेश खडतरे संमेलनात आलेल्या साहित्याचे किंडल ई-पुस्तक करत आहेत, त्यांचे व त्यांच्या चमूचे विशेष आभार. पुढील संमेलनातही ट्विटरकरांचे पाठबळ मिळाले तर संमेलन यशाची अधिक उंची गाठेल यात शंका नाही.

आभार,
आयोजक

स्वप्निल
शिंगोटे
ट्विटर: @MarathiWord

0

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्मरणिका २०१८”

Your email address will not be published. Required fields are marked *