ट्विटरसंमेलन स्मरणिका २०१९

भाषा वापरल्याने वाढते ह्या एका तत्वावर ट्विटरसंमेलन चालते.ट्विटरवरील मराठी जणांना मराठी भाषा वापरण्याची संधी देणे आणि त्यातून त्यांच्या कला गुणांना वाव देणे हे संमेलनाचे उद्धिष्ट आहे.संमेलन तीन दिवस भरते आणि ट्विटर मराठीमय होवून जाते. कुणी कविता लिहतं, कुणी कथा लिहतं, तर कुणी आपले अनुभव शेअर करतं. स्वतः व्यक्त होणं तर संमेलनामुळे होतंच परंतु दुसरीही मंडळी काहीतरी लिहित असतात, त्यांचे अनुभव वाचल्याने नकळत आपणही समृद्ध होत जातो. विचारांच्या ह्या घुसळनीनेच अमृत सापडतं. दर वर्षी संमेलनात असेच हीरे सापडतात.

ट्विटर संमेलन म्हणजे मुक्त व्यासपीठ, आपले विचार, साहित्य हजारो लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी हे समीकरण सलग चौथ्या वर्षी सिद्ध झाले. ट्विटरकरांनी मनसोक्त कविता केल्या. सर्व बारा हॅश टॅग वापरलेले ट्विट संमेलनात दिसले.

नेहमी प्रमाणेच यंदाही #माझीकविता हा लोकप्रिय हॅशटॅग होता.वेगवेगळ्या विषयांवरील कविता संमेलनात वाचायला मिळाल्या. ट्विटरकरांनी आपले छंद ,कथा,कविता सर्वांशी शेअर केल्या.

पाककृती,मराठी साहित्य ह्या आणि अशा अनेक विषयांवर मराठीतून ट्विटरवर लिहिले.मराठीतुन लिहण्यासाठी एक कारण मिळावं म्हणुनच तर हा संमेलन उद्योग थाटला आहे,ट्विटरकरांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले.

मराठी शाळेतील आपले अनुभव,महाराष्ट्रातील बोलीभाषा,मराठीसाठी तंत्रज्ञान या विषयांवरही मौलीक चर्चा झाली.यंदाच्या संमेलनात गेल्या वर्षी प्रमाणे ट्विटर व्याख्यानाचा प्रयोग झाला.मराठी भाषेशी संबंधी अनेक विषयांवर व्याख्याने झाली. संमेलनाला मिळालेले बौद्धिक अधिष्ठान हे ट्विट व्याख्यानाचेच फळ आहे,हे आम्ही आनंदाने नमूद करू इच्छितो.

ट्विटर संमेलनासारखे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे तरुण पिढीला आत्मविश्वासाने मराठी वापरण्याची संधी मिळेल. मराठी ही एक ‘कूल’ भाषा आहे आणि ती वापरणे आम्हाला आवडते अशी मानसिकता तरूण पिढीची घडणे अशा उपक्रमांमधून साध्य होते.

Bronato चे शैलेश खडतरे संमेलनात आलेल्या साहित्याचे किंडल ई-पुस्तक करत आहेत, त्यांचे व त्यांच्या चमूचे विशेष आभार. पुढील संमेलनातही ट्विटरकरांचे पाठबळ मिळाले तर संमेलन यशाची अधिक उंची गाठेल यात शंका नाही.

आभार,

आयोजक
स्वप्निल शिंगोटे
ट्विटर: @MarathiWord

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ट्विटरसंमेलन स्मरणिका २०१९”

Your email address will not be published. Required fields are marked *