स्वरचित्त- एक प्रवास

50.00

Description

1+

नमस्कार! नवं काहीतरी शोधावं म्हणून एखादा जसा जे हातात मिळेल ते सगळं जमवून प्रवासाला निघतो, नक्की कुठे जायचे ते माहीत नाही मग मिळेल त्या वाटेने जातो, अमुकच एक हवे आहे असे काही ठरले नसल्याने वाटेवरचे प्रत्येक क्षण अनुभवत प्रवासाचा आनंद घेत जातो, प्रत्येक वाटेवर थांबून ‘अरे हेच तर मिळवायचे होते’ असे त्याला वाटते पण नेमकी त्याचवेळी नवी वाट खुणावते आणि पुढचा प्रवास सुरु होतो… अगदी तसचं… हे माझे ‘स्वरचित्त’… शालेय पाठ्यपुस्तकाबाहेर कवितेचा फारसा गंध नसलेला मी, अचानक एक दिवस एक नवी वाट खुणावते, आणि मी एका वेगळ्या- कवितेच्या प्रवासाला निघतो, मिळेल तो कागद पेन जमवून स्वतःतच हरवलेले शब्द शोधून एक कविता लिहतो… नक्की काय लिहायचे होते हेच ठरले नसल्याने एक वेगळीच कविता तयार होते… माझ्या आयुष्यातली पहिली कविता… ‘जीवन’… …. आणि इतकी वर्ष पाहिलेले हे स्वप्न सत्यात ज्यांच्यामुळे उतरले त्या संपूर्ण ‘ब्रोनॅटो’ टीम आणि शैलेश खडतरे यांचे मनापासून आभार आणि ज्यांच्यामुळे ‘ब्रोनॅटो’शी ओळख झाली त्या माझ्या काकी सौ. सुवर्णा घोडींदे यांना मनापासून धन्यवाद ! कुणी आपलं भेटलं की आपण बरंच काही बोलून जातो तसच आज झालं, बरीच वर्ष मिटलेल्या ‘प्रवासवर्णना’ची पाने परत चाळवली गेली. तरी आता निरोप घेतो… आपण हे ‘स्वरचित्त’ आपले मानून यावर अखंड प्रेम कराल या विश्वासासोबत. “जरी चाललो आज सोडून तरी नक्की येईन मी परतून लाडक्या वाचका… फक्त तुझ्यासाठी…” आपला, गणेश सुभाष शिंदे

1+

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वरचित्त- एक प्रवास”

Your email address will not be published. Required fields are marked *