Sale!

सांगायलाच हवंय, असं नाही- भगवान निळे

200.00 150.00

प्रसन्न अन् उबदार मऊ सावळेपणा पसरलेला… मागनं पांढराशुभ्र धबधबा कोसळतोय. गारवा थंड हिरवा शांत, नीरव न् अशात छान मित्राच्या खांद्यावर हात टेकून आश्वस्तपणे आपल्या आयुष्याचा फोटो काढावा तशी भगवानची कविता!
-मलिका अमर शेख

थेट अनुभवाला भिडणारी अभिव्यक्ती, स्वच्छ प्रतिमाविरहित शब्दकळा, विशेषतः स्त्रीच्या करुणामय अस्तित्वाची पारदर्शक ठसठसणारी नस पकडण्याची अद्भुत किमया ही भगवान निळे यांच्या कवितांची अस्सल सारिणी आहे.
वीणा तर निनादते आहे नि विनाकारण शब्द तडफडतात समेवर अशा आभासांची मूर्त लकेर काळजाला चिरत जाते. मी खूप अस्वस्थ होतो त्याच्या कविता वाचताना!!
-अशोक बागवे

भगवान निळे यांची कविता ही जगण्या-वागण्याचा वेध घेताना व्यक्तिगत पातळीवरून समुहाची होत जाते. सरळ सोपी परंतु ठाशीव शब्दकळा अन् अंतर्मुख करणारी भगवानची कविता वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे.
-डॉ. अस्मिता गुरव

अन्याय, अत्याचार आपले खरे रूप बदलून नवनव्या पेहरावात येत असतात आणि आपले अन्यायी वर्चस्व गाजवीत असतात. हे बहुरुपीय अन्याय वेळीच ओळखणे कवीकलावंतांचे प्रथम कर्तव्य असते. ते एखाद्याचं कवीला समर्थपणे जमते. हे महत्त्वपूर्ण कर्तव्य पार पाडण्याचे काम भगवान निळे यांची कविता करते. हृदय आणि मेंदूवर एकाच वेळी त्यांची कविता प्रहार करत असल्यामुळे ती नेहमीच ताजी वाटते.
-लोकनाथ यशवंत

ऐंशीच्या दशकात ज्या काही थोड्या मोजक्या लोकांनी गांभीर्याने कवितालेखन केले त्यातील महत्त्वाचे नाव म्हणून भगवान निळे यांच्याकडे पाहता येते. या दशकातील सर्वच कवींनी स्वत:च्या जगण्याचे उत्खनन आपल्या कवितेत केले. पण निळे यांची कविता स्वत:कडून समाजाकडे जाताना जात-धर्म, स्त्री-पुरुष यांच्यातील अंतर्विरोधाचा व्यापक पट उभा करते.
-अजय कांडर

कप्पेबंद संकल्पनांच्या पलीकडे जाऊन नवी जाणीव मांडण्याचे काम भगवान निळे यांची कविता करते. विद्रोह, वेदना, नकाराच्या पातळीवर व्यक्त होण्यापेक्षा तिच्यातील समजूतदारपणा हे निळे यांच्या कवितेचे बलस्थान आहे. पुरुषी आकलनाच्या कक्षेतील संवेदना मांडणारी ही कविता आहे.
-डॉ. बाळासाहेब लबडे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सांगायलाच हवंय, असं नाही- भगवान निळे”

Your email address will not be published. Required fields are marked *