Sale!

रश प्रिंट- विनय बहुलेकर

201.00 151.00

चित्रपट विश्वाच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल्या माझ्या ह्या नव्या पुस्तकाचे नाव आहे ‘रश प्रिंट.’
कुठलाही चित्रपट सलग चित्रित होत नाही. तो तुकड्या-तुकड्यांनी चित्रित होत असतो. चित्रपटातील एखाद्या सीनचा जरी विचार केला तरी तो सलग चित्रित होत नाही. कथेच्या प्रवाहातील काही नंतरचे शॉट्स आधी चित्रित होतात काही आधीचे शॉट्स नंतर … त्या नंतर चित्रित झालेले सर्व शॉट्स पटकथे बरहुकूम जोडतात. त्यावेळी त्यावर एडिटिंग, डबिंग आणि साऊंड मिक्सिंग आदी प्रक्रिया केल्या जातात व नंतर जी काही प्रिंट मिळते ती ‘फायनल प्रिंट’. त्यावरुन ‘मास्टर प्रिंट’ काढतात आणि त्यावरुन आणखी प्रती काढल्या जातात ज्या आपण सिनेमा गृहात चित्रपट रुपाने पहातो…
परंतु चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्याच्या आगोदर चित्रित झालेले हे शॉट्स, ज्यांना कुठलाही सिक्वेन्स नसतो आणि ज्याच्यावरुन चित्रपटाचे कथानक समजू शकत नाही; अशा ह्या शॉट्सच्या फिल्मवर केवळ रासायनिक प्रक्रिया झालेल्या असतात. त्यावर अन्य कुठलेही संस्कार झालेले नसतात. ह्या विस्कळीत शॉट्स चा एकत्र संग्रह म्हणजे ‘रशेस’. आणि हे ‘रशेस’ पहाण्यासाठी त्याची एकत्रित प्रिंट काढली जाते त्याला ‘रश प्रिंट’ म्हणतात. जी चित्रपट निर्मितीत अपरिहार्य असते. ह्या वरुन त्यानिर्माणाधीन चित्रपटाचा दर्जा लक्षात येतो. प्रत्येक शॉट वाईज त्याचा बारकाईने अभ्यास होतो…
हल्ली उत्तम दर्जाचे व्हिडीओ कॅमेरे चित्रीकरणासाठी वापरले जातात. त्यावरच्या मॉनिटर वरुन काय आणि कसं चित्रित झालं आहे रंग-संगती कशी जमली आहे इ. गोष्टी साऱ्या चित्रीकरण स्थळीच तपासल्या जातात.
‘रश प्रिंट’ म्हणजे चित्रपट नव्हे आणि ट्रेलर तर नव्हेच नव्हे. ट्रेलर म्हणजे जाहिरातीचा भाग, तर ‘रश प्रिंट’ म्हणजे अभ्यासाचा भाग. माझ्या ह्या चित्रपट पार्श्वभूमीच्या ह्या लेख मालिकेला सिक्वेन्स नाही. …चित्रपट क्षेत्रातील माझ्या निकटच्या श्रेष्ठ व्यक्तींवर मी हे लेख लिहिले. –पण माझं किंवा त्या सेलिब्रेटीजची ही आत्मचरित्रे नव्हेत. त्यांचे अल्प-स्वल्प अनमोल सहवास मला मिळाले, काही दुर्मिळ प्रसंग अनुभवायला मिळाले ते पुस्तकातून आपल्या बरोबर शेअर करावेसे वाटले म्हणून ते ह्या लेख मालिकेतून आपल्या समोर मांडले. एखाद्या सुंदर चित्रपटाच्या सुंदर रशेस सारखे मी ते अनुभवले. …
…तेव्हा ही ‘रश प्रिंट’ सर्व वाचकांनी पहावी आणि ह्या वेगळ्या प्रकारच्या ‘रश प्रिंट’चा भरपूर आनंद लुटावा, ही मनापासूनची इच्छा!…
आभार!
-विनय बहुलेकर.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रश प्रिंट- विनय बहुलेकर”

Your email address will not be published. Required fields are marked *