मनस्विनी- पल्लवी शिंदे-माने

150.00

कविता काय आहे नेमकी कविता माझ्यासाठी ? कविता माझ्यासाठी माझं मुक्त असणं आहे. माझी वेगळी ओळख आहे. परक्या देशात, परक्या संस्कृतीत माझं ‘मी’पण जपणं आहे. कुठून रुजली ही कवितेची बीजं माझ्यात ? आईला कविता आणि गाणी गुणगुणत राहायची सवय… तर वडिलांना संगीत ऐकण्याची…
भावगीत, भक्तिगीत, लोकसंगीत, लावण्या, पोवाडे, श्लोक सतत काही ना काही ऐकत मी लहानाची मोठी झाले आणि त्यातूनच कविता लेखनाचा कुठेतरी जन्म झाला असावा. नववीत असताना आवडत्या शिक्षकावर पहिली कविता केली. आनंद वाटला की तो द्विगुणित होतो असं म्हणतात. म्हणून हा कवितासंग्रह …
कवितेच्या माध्यमातून खूप सारी माणसे जोडली गेली. ओळखी होत गेल्या. स्पर्धा, बक्षीसं, कवितेच्या मैफिली ह्यामुळे जगण्याला रंगत आली. तान्ह्या बाळाला पहिली अंघोळ घातल्यावर जी हुडहुडी भरत असेल, तसंच हे पहिलंवहिलं पुस्तक प्रकाशित करताना होत आहे.
यात काही ललितगद्यांचाही समावेश आहे. आजुबाजूला जे घडत असतं ते मेंदू आणि मन नकळतपणे टिपत असतं. ह्यात काही स्वतःचे अनुभवही विघळून जातात. ह्या मिश्रणाचा परिपाक म्हणजे ललित. कवितेत जे मांडता येत नाही, ते इथे मांडता येतं. म्हणून हे ललितलेखन… वाचकांना हा प्रयत्न आवडेल अशी आशा आहे.
तुमच्या सगळ्यांच्या साथीने आणि प्रेरणेने हा प्रवास सुरू राहू दे !
शुभम भवतु !!
पल्लवी माने
डेनवर, कोलोरॅडो युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनस्विनी- पल्लवी शिंदे-माने”

Your email address will not be published. Required fields are marked *