Sale!

मुंबईतील पुरातन शिवमंदिरे

150.00 100.00

Description

0

मुंबई नगरीला ‘सोन्याची नगरी’ म्हटले जाते. पण त्यापेक्षा तिला मंदिराची नगरी म्हणणेच अधिक संयुक्तिक ठरेल. मुंबई नगरीत जवळ जवळ ४८१ मंदिरे आहेत. त्यापैकी सर्वात जास्त मंदिरे हनुमंताची असून त्याखालोखाल क्रमांक येतो शंकर मंदिरांचा! मुंबईत महादेवाची – शंकराची ७१ पुरातन मंदिरे आहेत.

मुंबई शहरावर अनेकांनी इंग्रजी, मराठीतून ग्रंथ प्रसिध्द केले आहेत.पण केवळ मंदिरांची माहिती देणारा एकही प्रमाणभूत ग्रंथ उपलब्ध नाही. के. रघुनाथजी यांनी ‘हिंदू टेम्पल ऑफ बॉम्बे’ हा ग्रंथ १९०० साली प्रसिद्ध केला होता. त्यात भरपूर माहिती असली तरी ९६ वर्षांनंतर तो ग्रंथ कालबाह्य झाला आहे. मराठीत तर या विषयावर एकही ग्रंथ प्रसिद्ध झालेला नाही. म्हणूनच ‘मुंबईतील प्राचीन सांस्कृतिक परंपरा’ हा विषय निवडून मंदिरांची माहिती प्रसिद्ध करण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. प्रत्येक मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन त्याची छायाचित्रे काढून पुस्तक रूपाने प्रसिद्ध करण्याचा आमचा विचार आहे. या प्रकल्पाचा भाग म्हणून आम्ही ‘मुंबापुरीतील पुरातन शिव मंदिरे’ हा ग्रंथ प्रसिद्ध करीत आहोत. या पुस्तकात २१ हून अधिक पुरातन मंदिरांची माहिती दिली आहे. यानंतर जमलेच तर ‘मुंबापुरीतील पुरातन शक्तिपीठे’ व इतर देवस्थानांवर ग्रंथ प्रसिद्ध करण्याचा आमचा विचार आहे.

हा ग्रंथ तयार करताना अनेक अडचणी आल्या. माझी पत्नी अॅड. संजीवनी व मुलगी प्रज्ञा यांनी ग्रंथ प्रसिद्ध करण्यासाठी आग्रह धरला. मंदिराची माहिती गोळा करण्यासाठी माझ्याबरोबर माझी कन्या कु. प्रज्ञा व मुलगा राजेंद्र आले. ग्रंथ प्रत माझी बहिण कु. काशी हिने तयार केली तर प्रुफे वाचण्याचे कंटाळवाणे काम माझा धाकटा भाऊ विनायक व मुलगा पत्रकार राजेंद्र (उप-संपादक ‘डेली’) याने केली. माझा पुतण्या चि. अनंत विनायक कांबळी यानी प्रत्येक मंदिराची सुबक छायाचित्रे तत्परतेने काढून दिली. मनीषा लेझर सिस्टिमच्या कु. मनिषा मांजरेकर व सौ. पूजा पाटकर यांनी न कंटाळता टाईप सेटिंगचे काम सुबक करून दिले. मंदिराचे विश्वस्त व पुजाऱ्यांनी  देवस्थानाची माहिती पुरवली. माझे मित्र चित्रकार संजय कुलकर्णी यांनी मुखपृष्ठ व सजावटीची जबाबदारी पार पाडली. तर ग्रंथाचा आर्थिक भार उचलणे व इतर बाबींकडे माझी पत्नी सौ. संजीवनीने लक्ष दिले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळेच माझा हा ग्रंथ आज प्रकाशित होत आहे. या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

डॉ. भालचंद्र आकलेकर

0