Sale!

मुंबईतील आद्य शक्तिपीठे

150.00 100.00

Description

0

शक्तीची उपासना भारतात फार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. मोहें – जो – दडोच्या उत्खननात प्राचीन संस्कृतीचे काही अवशेष आढळून आले आहेत. त्यात देवीच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यावरून सर्वसाधारणपणे इ. स. पूर्व चार हजार वर्षे शक्तीची उपासना येथे होती असे म्हणता येते.

वेदवाङ्मयातही ‘उषादेवी’, ‘सुर्यादेवी’, ‘लक्ष्मीदेवी’ अशा विविध देवतांची अनेक सूत्रे आढळून येतात. ॠग्वेदाच्या आठव्या मंडलातील शेवटच्या सूक्तात सरस्वतीची स्तुती आहे. यजुर्वेदात तर सरस्वतीला आहुती देण्यात आलेली आहे. अथर्वशीर्ष, देवी सूक्त व श्रीसूक्त यात तर देवीचेच स्तवन आहे. अथर्ववेदातील सौभाग्यकाण्डात तंत्राचे विवेचन आलेले आहे. उपनिषदात अनेक ठिकाणी सृष्टी निर्मितीचे रहस्य सांगताना प्रकृती आणि पुरुष यांच्या वर्णनातून या शक्तीचेच रहस्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

महाभारतातील ‘दुर्गादेवी’चे महात्म्य वर्णन आहे. या सर्व गोष्टी ध्यानात घेता भारतात शक्तीची उपासना फार प्राचीन काळापासून चालत असावी यात संदेह राहत नाही. पंचमहाभूतांच्या उपासनेमागे हेच शक्तीतत्व प्रधान आहे. इंद्र, वरुण, सूर्य इत्यादी शक्ती जीवन विकास घडवून आणणाऱ्या आणि म्हणूनच उपास्य मानण्यात जीवनावरील महान निष्ठा दिसून येते. परंतु त्याच बरोबर श्रद्धेचे व भावनांचे दर्शन घडून येते.

शक्ति पंथात ज्या अनेक देवतांची उपासना होत असते त्या सर्व देवता ‘सत्व, रज, तम’ या त्रिगुणात्मक शक्तीच्याच प्रतिक आहेत. एकाच देवतेची अनेक नावेही प्रचलित आहेत. तथापि ‘महाकाली’, ’महालक्ष्मी’, ‘महासरस्वती’ या तीन महान् शक्तीचीच ती विविध रूपे आहेत. तसेच तांत्रिकाच्या उपासनेत ‘त्रिपूर सुंदरी’ या देवतेचे प्राधान्य दिसून येते. त्रिगुणात्मक अशा शक्तीचीच ती रूपे असल्यामुळे या शक्तींना ‘आद्यशक्ति’ म्हटले जाते…..

…..

माझे ज्येष्ठ स्नेही श्री. शामराव करंगुटकर व त्यांचे चिरंजीव श्री. नागेश करंगुटकर यांनी आपल्या प्रॉस्पेक्ट प्रिंटींग प्रेसमध्ये हा ग्रंथ तत्परतेने सुबकपणे छापून दिला. पुस्तकातील छायाचित्रे माझा पुतण्या श्री. अनंत विनायक कांबळी उर्फ पिंटु यानी अविश्रांत भटकंती करून काढून दिली. सुप्रसिध्द चित्रकार चंद्रकांत वाईरकर यांचे चिरंजीव श्री. संदीप वाईरकर यांनी तत्परतेने सुंदर मुखपृष्ठ तयार करून दिले. मुंबई मराठी प्रत्रकार संघाचे अध्यक्ष श्री वसंतराव शिंदे यांनी तत्परतेने प्रस्तावना लिहून दिली.  सर्वांचे मन:पूर्वक आभार.

विजया दशमी
डॉ. भालचंद्र आकलेकर [२१-१०-९६]

0

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मुंबईतील आद्य शक्तिपीठे”

Your email address will not be published. Required fields are marked *