मेमरीस्ट्रा

225.00

मित्रहो… आणि मैत्रीणींनो…

बालपणातच खरं तर आपण जीवन सत्यत्वाने पाहत असतो…जसं आहे तसंच…!
नंतर त्यात अनेक रंग मिसळतात ज्ञानाचे… अनुभवांनी प्रदूषित दृष्टिकोनांचे…
आणि हे मिसळ भेसळ असलेले रंग एका टप्प्यावर खोटे वाटू लागतात…

तेव्हा पुन्हा आठवतं ते निर्मळ बालपण… ते तेच सत्य होतं… कारण त्या तरल
अनुभवांची वीण घट्ट असते अजून मनात…

लेखक – कवी म्हणजे आपल्यातलंच ते बालक असतं जे भरभरून उत्कटतेने जीवन
जगताना कधीच कोणत्याच भूलथापांना बळी पडलेलं नसतं… ते त्या लाकूडतोड्या
सारखं असतं… वनदेवीने दिलेल्या सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीत त्याला रस नसतो …
तो जीवनरूपी वनाच्याच प्रेमात पडलेला असतो…!

आपल्या शाळेच्या आपण सारेच प्रेमात होतो… तेच आपलं निर्मळ जीवन होतं…
त्या जीवनात पुन्हा लॉंग इन झाल्याने सध्याच्या जीवनासाठी एक नवी ऊर्जा
आणि एक सत्य दृष्टिकोन प्राप्त झाल्याने नक्कीच सुखी आणि शांत होऊ… आणि
जुन्या सवंगड्यांच्या अधिक जवळ येऊ … वर्तमानात एक सुंदर भविष्य घडविण्याची
ही नांदी या मेमरीस्ट्राच्या निमित्ताने आपल्या साऱ्यांना मिळाली आहे… तिचा पूर्ण
उपयोग करून घेऊ…!

हे नुसतेच भावमनोरंजन नसून…
एक होडी आहे…
शुध्द मनोभूमीवर पुन्हा एकदा नेणारी …!!!

आपला
बालक मित्र…

Additional information

Author

Bhushan Bhansali

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मेमरीस्ट्रा”

Your email address will not be published. Required fields are marked *