Sale!

मनातलं काही- नितीन साळुंखे

200.00 120.00

‘मनातलं काही’ हे माझं पहिलंच ई-बुक..! माझ्या मनात, त्या त्या वेळी एखादा प्रसंग अनुभवताना जे जे उलट-सुलट विचार आले, ते सांगणाऱ्या लेखांचं हे पुस्तक.
गेल्या चार पांच वर्षातलं मी वेळोवेळी केलेलं लिखाणापैकी काही निवडक लेखन आता डिजिटल साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य ‘ब्रोनॅटो’ तर्फे प्रसिद्ध होतं आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाचीही गोष्ट आहे. आनंदाची यासाठी की, ई-बुकच्या माध्यमातून आता माझं लेखन अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि अभिमान एवढ्यासाठी की, ‘ब्रोनॅटो’सारख्या प्रतिष्ठीत संस्थेला माझं ई-पुस्तक प्रकाशित करावसं वाटलं म्हणून..!
आज पुस्तकं विकत घेऊन किंवा वाचनालयातून आणून वाचण्याचं प्रमाण कमी झालंय. याला अनेक कारणं आहेत व त्यापैकी एक म्हणजे तंत्रज्ञानाचा अविष्कार. आज आपल्या हातातला स्मार्ट फोन बसल्याजागी आपल्यासमोर जगातली हवी ती चीज काही सेकंदात हजर करत आहे. यात, अर्थातच, पुस्तकंही आलीच.
आजच्या तरुणाईचं आयुष्य पूर्वीच्या मानाने खुपच जास्त व्यस्त झालंय. नोकरी-व्यवसायामुळे त्यांची भटकंतीही वाढलीय. जगही स्पर्धेच आहे आणि या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी आजच्या तरुण पिढीला सतत कार्यरत राहावं लागतं. यातून तिला स्वत:साठी खुप कमी वेळ उरतो, पण जो काही वेळ या पिढीला मिळतो, त्यातला बराचसा वेळ ही पिढी स्मार्टफोनवर आलेलं किंवा किंडल सारख्या मुद्दाम विकत घेतलेल्या उपकरणावर डाऊनलोड करुन घेदलेलं बरं-वाईट साहित्य वाचनात घालवत असते. म्हणजे ‘वाचन कमी झालेलं नाही, तर वाचनाचं माध्यम फक्त बदललंय’. वाचनाची भुक अजुनही आहे याचं हे लक्षण आहे. सोशल मिडीया, मोबाईल वरील विविध ऍप किंवा किंडलसारखी साधनं किंवा ई बुक ही साधनं पुस्तकांपेक्षा तुलनेने स्वस्त तर आहेतच, परंतु एकावेळी अनेक प्रकारची पुस्तक स्टोअर करण्याची सुविधा देणारीही आहेत. पुस्तक एका वेळी एकच वाचता येतं किंवा प्रवासात नेता येतं. तसं याचं नाही. या ईलेक्ट्राॅनिक माध्यमात असलेली अक्षरक्ष: शेकडो पुस्तकं, या उपकरणांच्या माध्यमातून खिशातून कुठेही घेऊन जाता येतात व आपल्या त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे वाचता येतात. हा या माध्यमाचा फायदा.
अशा या वाचनवेड्या मुलांना चांगल्या व सकस वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने शैलेश खडतरे या तरुण तंत्रज्ञाने ‘ब्रोनॅटो’ ही ई-बुक प्रकाशन संस्था युरू केली आहे. आणि असा काही उद्देश घेऊन कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे आपलं पुस्तक प्रसिद्ध होतंय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
कोणत्याही गोष्टीच्या पहिलेपणा’चं कौतुक कुणालाही असतंच. ‘मनातलं काही’ हे माझं पहिलं ‘ई-बुक’..! मलाही याचं कौतुक आहेच. त्यात माझ्या पहिल्याच ई बुकाचं बाळंतपण जर शैलेश खडतरेंसारख्या निष्णात आणि सर्जनशील ‘सर्जन’च्या हातून होतंय, ह्यातं कौतुक मला अंमळ जास्तच वाटतंय..
आपणही या माझ्या बाळाचं कौतुक कराल अशी अपेक्षा आहे.
-नितीन साळुंखे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मनातलं काही- नितीन साळुंखे”

Your email address will not be published. Required fields are marked *