मालवणी कथा
नमस्कार मंडळी
आज हे मालवणी कथा साहित्यरुपी पुस्तक तुमच्यापर्यत पोहोचलय याचं खूप मोठं कौतुक वाटतंय, आपली माय मराठी भाषा अन तिची लेकरं म्हणजे महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, अन त्यात आपली जिवलग अशी ‘मालवणी’ भाषा .
आज मालवणी भाषेतील साहित्य सोशल मीडियाच्या माध्यमातून काही क्षणात जगापर्यंत पोचवू शकतो.पण त्या साहित्याला काही ठराविक वेळेपुरती प्रसिद्धी मिळत.फेसबुकवर अनेक मालवणी नवोदित लेखक ,लेखिका स्वतःहून मालवणी भाषेमध्ये नवनवीन कथा, इरसाल गजाली, कविता सादर करत असतात. काही कथा, कविता वर्तमानपत्र, मासिक मध्ये छापून येत असतात. मी जेव्हा फेसबुक सारख्या समाजमाध्यमावर आलो तेव्हा मालवणी भाषा एवढी वापरली वाजत नव्हती, एव्हाना ती नजरेत हि पडत नव्हती.पण गेले काही वर्षे सिंधुदुर्ग, कोकण मधला नेटप्रेमी तरुण वर्ग फेसबुक वर निःसंकोचपणे मालवणी भाषेतून व्यक्त होऊ लागला. आज मालवणी भाषा व त्या संलग्न फेसबुक ग्रुप वर २५०००+ ते १ लाखाहुन अधिक सभासद दिसून येतात.
तर दुसरीकडे ट्विटर सारख्या नवख्या माध्यमातून मालवणी भाषेतून व्यक्त होण्याची संधी मला मिळाली, याच ट्विटर मला मराठी भाषा अन बोलीभाषा यासाठी झटत असलेल्या शैलेश खडतरे नावाच्या मित्राची ओळख झाली ..
सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई,बीड, नगर सारख्या विविध विभागातील मित्रांपर्यत मला मालवणी भाषा पोचवता आली. मराठी भाषा जतन करताना प्रथम बोलीभाषा जपली गेली पाहिजे याच उद्देशाने Bronato.कॉम यांच्या सहकार्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली #मालवणी कथा स्पर्धा घ्यावी असं आम्ही ठरवलं अन त्याला तुम्हा सगळ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ही लाभला
मालवणी भाषेतल्या नवोदित लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत ईबुक रुपी साहित्य वाचकांना नक्कीच आवडेल. मालवणी भाषेतील एक अत्यंत महत्त्वाचा कथासंग्रह ‘bronato.com ’तर्फे प्रकाशित केला जातोय ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
सदर पुस्तकातील कथांचे परीक्षण नामांकित मालवणी लेखक श्री- प्रभाकर भोगले यांनी केले आहे. तर शैलेश खडतरे यांच्या अमूल्य सहयोगाने हे गुगल प्ले बुक वर उपलब्ध असणार आहे ..
मालवणी कथा संग्रह मी आमचे सगळ्यांचे लाडके ,ज्यांनी खऱ्या अर्थाने मालवणी जगप्रसिद्ध केली त्या मालवणी सम्राट श्री- मच्छिंद्र कांबळी यांच्या पुण्य चरणी अर्पण करतोय ..
बापूजी तुम्ही होतास म्हणून आम्ही आज मालवणी हक्काने जगापर्यंत ओरडून सांगू शकताव.. देवा गणपती बाप्पा आणि रवळनाथा आमच्या हातून अशीच मालवणी ची सेवा होयत रव्हानंदेत हीच प्रार्थना …
तुमचोच मालवणी झिलगो
नितीन नाईक
Reviews
There are no reviews yet.