महाभारत एक नवीन दृष्टिकोन- माधुरी सप्रे
₹250.00 ₹200.00
कै.सौ. माधुरी सप्रे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शालेय शिक्षण त्यांच्या आईच्या आजोळी, कोल्हापूर येथे झाले. त्यानंतर पुणे विद्यापीठामध्ये नोकरी करताना बी.ए. (Externally) पूर्ण केले.लग्नानंतर बऱ्याच वर्षांनी मुंबई विद्यापीठामध्ये एम.ए. (मराठी व तौलनिक वाङ्मय) पूर्ण केले. प्रथम वर्गात पास झाल्यामुळे पीएच्.डी.ची चार वर्षांची स्कॉलरशिप मिळाली. संशोधनाचा विषय होता ‘महाभारत आणि त्यावर आधारित मराठी वाङ्मयाचा तौलनिक अभ्यास.’ संशोधनासाठी मार्गदर्शक होते, प्रसिद्ध कवी, प्रा. वसंत बापट. काही घरगुती अडचणींमुळे पीएच.डी. पूर्ण करता आली नाही.
परंतु महाभारताचा अभ्यास करताना बरेच सखोल व चौफेर वाचन झाले होते. त्यानिमित्ताने विषयासंबंधी व इतर अशा बऱ्याच पुस्तकांचे वाचन झाले. वाचलेल्या पुस्तकांच्या व महाभारतासंबंधीच्या बऱ्याच नोट्स काढल्या होत्या. त्या नोट्स बरेच दिवस नुसत्या पडून होत्या. कागद जीर्ण झाल्यामुळे त्या झेरॉक्स स्वरूपात संग्रहित करण्याचा विचार होता. परंतु मी स्वतः घरीच असल्यामुळे त्या संगणकावर टाइप करण्यास सुरवात केली. नोट्स टाइप करताना असे लक्षात आले की, कर्ण व त्यासंबंधी बऱ्याच नोटस् एकत्र केल्या तर त्याचे एक पुस्तक होऊ शकते. त्यामुळे ‘कर्ण : महापुरुष की खलपुरुष’ हे पुस्तक २०१२ साली प्रसिद्ध झाले. या पुस्तकाला महाभारताचे एक थोर व्यासंगी श्री. दाजी पणशीकर यांची प्रस्तावना आहे. सदर पुस्तकाला प्रसिद्ध साहित्यिक वि. ह. कुळकर्णी यांच्या नावे असलेल पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुस्तकाला अनेक नामवंत लेखक व व्यासंगी वाचकांनी पसंती दाखविली. पुस्तकाची पहिली आवृत्ती हातोहात संपल्यामुळे मॅजेस्टिक प्रकाशनाचे श्री. अशोकराव कोठावळे यांनी सदर पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली.
त्यानंतर भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था (B.O.R.I) वर आधारित ‘संस्कृत महाभारत’ आणि प्रा. न. र. फाटक संपादित मराठी ‘महाभारत’ या पुस्तकाचा जरुरीपुरता आधार घेत ‘महाभारत: एक नवीन दृष्टिकोन’ हे पुस्तक प्रसिद्ध होत आहे.
Reviews
There are no reviews yet.