जेम्स बॉम्ब – विनय बहुलेकर

99.00

जेम्स बॉम्बह्या माझ्या पहिल्या ई-बूक ची आवृत्ती प्रसिद्ध होतांना मला खूप आनंद होत आहे!

ई-बूक ही संकल्पना जुनी असूनही तशी अजून आपल्याकडे, म्हणजे मराठी साहित्त्य विश्वात नवीनच म्हणायला हवी. कारण अजून ह्या संकल्पनेचा फारसा विस्तार झालेला नाही. पण नजदीकच्या भविष्य काळात ह्या संकल्पनेला उज्वल भवितव्य आहे ह्यात काहीही शंका नाही.

पूर्वीच्या वाचक पिढ्या छापील पुस्तकांवर घडल्या आणि संपन्न झाल्या. कारण तेच माध्यम वाचकांशी जवळीक साधत होते. -त्याला दूसरा पर्यायच नव्हता. पण काळ बदलला. इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे क्रांति झाली. पेपरलेस क्रांति! आता एक-दोन नव्हे, शेकडो – लाखो पुस्तकं तळहाता एवढ्या मोबाईल मध्ये किंवा रीडर मधून वाचायला मिळतात! हल्ली प्रकाशक विचारतात की, “पुस्तकांना वाचक कुठे आहेत?” पण वाचक इथेच आहेत, हे ते विसरतात! आणि उलट ते वाढलेले आहेत. वैचारिक साहित्त्याच्या गाड्या च्या गाड्या भरुन मांडून ठेवल्यावर ललित वाचन करणारे वाचक कशाला तिथे फिरकतील? पुस्तकांचा आधार हाच वाचक वर्ग आहे. त्याची आवड-निवड लक्षात न घेता आम्ही म्हणू तीच पूर्व दिशाअसं म्हणण्यात काय अर्थ आहे? प्रकाशक सांगतील तिच पुस्तकं वाचकांनी काय म्हणून वाचावीत?त्यांच्या अशा धोरणाने साहित्त्याचा मुळ पाया वाचक, तो मात्र साहित्त्यापासून दूर गेला. हे त्यांच्या लक्षातच आलं नाही. वैचारिक वाचन करणारे अजिबातच नाहीत असं नाही, ते ही आहेत. पण ते पुस्तकं विकत घेण्यापेक्षा सार्वजनिक वाचनालयातून पुस्तक घेऊन वाचनाची भूक भागवतात.

मनोरंजनाचा मोठा वाचक वर्ग आहे आणि तो तहानलेला आहे! त्यांची वाचनाची तहान भागवणे ही काळाची गरज आहे आणि अशा वाचकांपर्यंत पोहोचायलामाध्यमांशिवाय पर्याय नाही! हल्लीचा वाचक वर्ग पुन्हा छापील पुस्तकांकडे वळणं शक्य नाही. त्यातून प्रवाहाच्या विरुद्ध पोहोण्याचा प्रयत्न कुणी करेल तर तो तोंडघशीच पडणार, दुसरं काय होणार? प्रकाशकांना अनेक प्रश्न आहेत पण त्यावर उत्तर फक्त ई माध्यमांकडेच आहे.

ई बूक म्हणजे नक्की काय ह्याची विविध प्रकाशकांकडे चौकशी करत होतो तेव्हा एक-एक धक्कादायक अनुभव आले.

मेल ऑर्डर बिझिनेसह्या प्रकाराने सुमारे साठ वर्षांपूर्वी अमेरिकेत जोर धरला होता. त्यात ग्राहक आपली मागणी पोस्टाने कळवायचा आणि पोस्टाच्या माध्यमातून ती वस्तु त्याला घरपोच मिळायची. मी जेव्हा ई-बूक बद्दल चौकशी करत होतो त्यावेळी अनेक प्रकाशकांना ई-बूक म्हणजे काय हेच माहीत नव्हतं. काही प्रकाशकांनी मला हे सांगितलं की, “तुम्ही ई-मेलवर ऑर्डर पाठवा आम्ही कुरीयरने तुम्हाला हवं ते पुस्तक, सुंदर पॅकिंग करुन घरपोच पाठवून देऊ!ह्याला ते ई-बूक म्हणत होते. मराठीतील ते एक अग्रगण्य आणि जुने प्रकाशक होते. परंतु ह्या निमित्ताने मराठीतील हे प्रकाशक जगाच्या किती बरोबर आहेत, किंबहुना अजूनही काळाच्या किती मागे आहेत हे समजून येत होतं. त्यांना नवीन ची कल्पना दिली तरी ते नवीन स्वीकारण्याची त्यांची तयारी नव्हती. मराठी साहित्त्याच्या दुर्दैवाने, अशा विचारांचे जर प्रकाशक असतील तर लेखक, आणि वाचकही करणार काय? आज विविध कंपन्यांचे शेअर्स देखील पेपरलेस होऊन इंटरनेट च्या माध्यमातून त्यांचा व्यवहार होतो, व्यवहाराची जुनी पद्धत अस्तीत्वात असूनही मोठ्या प्रमाणातून ते ई-माध्यमातून साठवले ही जातात तर पुस्तकं का नाही? नव्याचा अंगीकार न केल्याने अनेक जुन्या नावाजलेल्या प्रकाशन संस्था डबघाईला आल्या आहेत. पण दुर्दैवाने तरी सुद्धा त्यांना नवीन वाट चोखाळावी असं वाटत नाही.

ह्या पार्श्व भूमीवर ‘Bronato ‘ चं काम उठून दिसतं. त्यांनी वाचकांपर्यंत नेमकं कशा प्रकारे पोहोचायचं हे जाणलं. मोबाईल तर हल्ली सगळ्यांकडेच असतो; त्याच माध्यमाचा उपयोग करून घेऊन ते आज प्रकाशक ह्या नात्याने वाचकांपर्यंत पोहोचले आहेत. ४२ देशांमध्ये सव्वा लाखाच्या वर ईपुस्तके डाऊनलोड झाली आहेत आणि खूप मोठा वाचक वर्ग निर्माण केला आहे. आणि आज अनेक प्रकाशन संस्थांसाठी‘ Bronato’ आदर्श बनली आहे.

‘Bronato ‘ मराठीतीत नवं साहित्त्य प्रकाशित करते. योग्य लेखकांना जगासमोर येण्यासाठी आणि आपली कलाकृती सादर करण्यासाठी ई-बूक च्या रुपाने व्यासपीठ उपलब्ध करुन देते. ह्या संस्थेचे श्री. शैलेश खडतरे हे खरोखर कौतुकास पात्र आहेत. वडोदरामध्ये पार पडलेल्या साहित्त्य संमेलनात त्यांनी मांडलेले विचार अनेकांना स्फूर्ति देऊन गेले. त्यांच्या माध्यमातून मी ही इंटरनेटवर काम करतो आहे ह्याचा मला अभिमान आहे

जेम्स बॉम्बच्या आवृत्तीच्या निमित्ताने मला ह्या विषयावर चार शब्द लिहायला मिळाले ह्याचाही मला आनंद आहे.

आपण देखील, म्हणजे विशेषतः ई-वाचकांनी आणि सर्वांनीच, नवीन प्रसिद्धी माध्यमांना नाकं न मुरडता, डिजिटल साहित्त्याचे मनापासून स्वागत करावे अशी मनापासून ची इच्छा आहे.

विनय बहुलेकर

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “जेम्स बॉम्ब – विनय बहुलेकर”

Your email address will not be published. Required fields are marked *