Sale!

गीतांजली अनुवाद

250.00 228.00

Description

0

रवींद्रनाथ टागोर हे नाव उच्चारताच लांब दाढी, मानेवर रुळलेले केस, शांत मुद्रा असे आदरणीय व्यक्तिमत्व डोळ्यासमोर येते. आपल्या देशाचे, त्याचप्रमाणे बांगलादेश आणि श्रीलंका याही देशांचे राष्ट्रगीत लिहिणारे कवी म्हणून आपल्याला त्यांची विशेष ओळख, त्याचप्रमाणे साहित्याचेनोबेल पारितोषिकमिळवणारे ते पहिले भारतीय होत.

बंगाली भाषेमध्ये त्यांनी अध्यात्म, मानवी जीवन, सृष्टी, बाल जीवन इत्यादी अनेक विषयांवर शेकडो कविता लिहिल्या. ‘गीतांजलीया नावाने हा संग्रह अजरामर आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक कथा, कादंबऱ्या आणि नाटकेदेखील प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कादंबऱ्यामधील कथानकांमुळे आणि गीतांमुळे चित्रपट सृष्टीलाही चांगलाच बहर आला.

निसर्गाच्या सान्निध्यात आध्यात्मिक प्रवृत्तीने मानवी विकास घडवून आणण्यासाठी त्यांनी स्थापन केलेलेशांतिनिकेतनहे तर जगप्रसिद्ध आहे.

गीतांजलीहा रवींद्रनाथांनी विविध विषयांवर लिहिलेल्या बंगाली कवितांचा वा गीतांचा संग्रह. सन १९१२ मध्ये युरोपच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आपल्या इंग्रजी मित्रांच्या आग्रहास्तव गीतांजलीतील निवडक १०३ कवितांचा इंग्रजी अनुवाद केला. ह्या इंग्रजी अनुवादालाच १९१३ सालीनोबेल पारितोषिकमिळाले.

मार्च २००७ मध्ये माझ्या एका मित्राने या गीतांजलीची इंग्रजी प्रत मला वाचायला दिली. ते दिव्य काव्य वाचताना प्रत्येक शब्दाचा गर्भितार्थ हृदयाला भिडत होता आणि माझ्या कवीमनात मराठी प्रतिशब्द अनाहूतपणे घोळू लागले होते. सहज म्हणून एक कविता मराठीत अनुवादित करून पहिली, आणि मग दुसरी, मग तिसरी अशाप्रकारे डिसेंबर २००७ पर्यंत सर्व १०३ कवितांचा अनुवाद पूर्ण झाला.

इंग्रजी गीतांजली हा रवींद्रनाथांनी स्वतः केलेला मूळ बंगाली छंदोबद्ध गीतांचा गद्यात्मक अनुवाद आहे. त्यावरूनच मी मराठीमध्ये काव्यात्मक, छंदोबद्ध रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. हे करताना मूळ अर्थाशी साधर्म्य साधण्यासाठी बंगाली भाषेचाही अभ्यास केला.

0

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गीतांजली अनुवाद”

Your email address will not be published. Required fields are marked *