Sale!

दुर्गयात्री

250.00 118.00

मला आठवते नवीन कोरे पुस्तक हातात आले की त्याचा सुगंध नाकात घामघमायचा आणि मगच पुढची पाने चाळायला सुरुवात व्हायची. पण आता सारे चित्र बदलले आहे. एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवतते आहे. या स्थित्यंतरास पुस्तकेही अपवाद नाहीत. आज स्मार्टफोनवर हाताळणाऱ्या प्रत्येकाला एका टिचकीसरशी असंख्य पुस्तके हाताळता येत आहेत.

या बदलत्या काळानुसार आपणही बदलावे म्हणून ईपुस्तकांचा विचार मनात घोळत होताच. माझी ‘दुर्गलेणी – दिव, दमन, गोवा, ‘महाराष्ट्रातील विरगळ’ ही दोन पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद करायचे ठरविल्यावर माझे तरुण मित्र ‘शैलेश खडतरे’ यांनी ईपुस्तकांची सरसता व सहजता पटवून दिली.  तसेच एकदा ईपुस्तक काढल्यावर प्रत्येक वेळी प्रिंटची नवीन प्रत काढताना येणारा खर्च तर  वाचेलच शिवाय वितरणाची धावपळ देखील वाचवता येते हा मुद्दा मला पूर्णपणे पटला. माझ्या या दोन पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद व तिसरे पुस्तक ‘दुर्गयात्री’ अशी तीन ही पुस्तकांची ई-आवृत्ती काढण्याचे शैलेश ने मनावर घेतले. ब्रोनॅटो.कॉम ने अप्लावधीत ही पुस्तके तयार केली. आता माझी पुस्तके भारतातच नव्हे तर जगभरातील वाचकांना उपलब्ध होतील याचे मला समाधान आहे.

मला आशा आहे की इतिहासप्रेमी या ईआवृत्त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतील.

– सदाशिव टेटविलकर

Description

0

सस्नेह जय महाराष्ट्र !

आपण आपल्या आयुष्यातील सह्याद्रीभ्रमण गाथा “दुर्गयात्री” म्हणून प्रसिद्ध करत आहात आणि या यात्रेची प्रस्तावना आपण माझेकडून मागितली याबद्दल मला स्वतःचाच अभिमान वाटला….

पृथ्वी आणि सूर्य यांच्या धुंद मिलनातून जन्माला आला सह्याद्री. सूर्याच्या रखरखत्या वीर्याचा हा आविष्कारही तितकाच कणखर, राकट, तापट ऐसा दिसतो आहे. जसा काही काळाकुट्ट रामोशीच! सूर्याच्या या प्रखर तेजाची त्याच्या पुत्राला नजर लागू नये म्हणून या पृथ्वीवरील कोण्या शिल्प  सोनाराने त्याच्या दंडात खंडोबाचा टाक बांधला तर त्याच्या उत्तुंग शिखरावर कळसुबाई चे देऊळ उभे केले. याच सह्याद्रीच्या अजिंक्य सुळक्यांना, शिखरांच्या चहुबाजूंनी तटा – बुरुजांचे चिलखत घातले. देवगिरीसारख्या वेरूळ, अजिंठाच्या परिसरातील सह्याद्रीच्या रांगेला भक्कम अशा तटाबुरुजांचे पोशाख चढवलेल्या भुईकोट किल्ल्यांनाही चहुबाजूंनी खंदक, मध्येच अंधारी वाट आणि किल्ल्याच्या रक्षणार्थ ती कराल दाढेची ‘मेंढे की तोफ’ सज्ज केली. या देवगिरीवर राज्य होते रामदेवरायाचे, आणि त्याचा पराक्रमी पुत्र शंकरदेवरायाचे. परंतु अल्लाउद्दीन खिलजीने “दीन दीन” करीत येऊन गफलतीत बसलेल्या रामदेवरायाचा पराभव केला. देवगिरीचे नाव बदलले गेले. दौलताबाद पडले. ऐशा अभेद्य किल्ल्यांचा पाडाव झाल्यावर हे हिरवे विष दक्षिणेकडे पसरू लागले. परंतु त्यानंतर या हिरव्या विषाला अडवून धरले ते सूर्यपुत्र सह्याद्रीने. सह्याद्रीच्या कडेकपारीत असणारा प्रत्येक गडकोट अभिमानाने छाती फुगवून “हिंदवी स्वराज्य आम्ही कसे राखले” हे सांगतो आहे. किल्ले तोरणा गर्वाने म्हणतो आहे, “हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण माझ्याच मस्तकाला बांधले गेले” तर शेजारचाच मुरुमदेवाचा डोंगर ताठ मान करून म्हणतो आहे,…..

….

शिवभक्त साबीर शेख

0

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दुर्गयात्री”

Your email address will not be published. Required fields are marked *