कॉर्पोरेट कविता- प्रथमेश किशोर पाठक

150.00

कविता लेखन कधी सुरू केलं ते आठवतं, कविता सुचणं नाही! आजही कविता सुचल्याचाच आनंद जास्त होतो. बाबांच्या रूपाने आणि त्यांच्या पुण्याईने अनेक जिवंत कविता वाचल्या, भेटल्या, आशीर्वाद देऊन गेल्या, मांडीवर खेळवून गेल्या. त्यासगळ्यांच्या प्रति मनोभावे वंदन करतो.
पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई गाठली आणि माझं आयुष्य आणि कविता बदलली. मला समुद्र भेटला, मी प्रेमात पडलो. मला लोकल भेटली, मी जिवंत होत गेलो. मी चकचकीत ऑफिसमध्ये बसून इ एम आय चुकवत आयुष्य घालवणाऱ्या माणसांमध्ये रमू लागलो, मी अस्वस्थ होत गेलो. ही अस्वस्थता कधी कधी बाहेर उमटते. माझ्यासारख्याच दोन पाच पिचलेल्या (पण शर्टाची ईस्त्री न मोडलेल्या) व्यक्तींना ती कविता आपलीशी वाटते, यात मला समाधान मिळतं. ह्या कवितांमध्ये बहुतेकवेळा दिसेल तुम्हाला एक अशी चकचकीत व्यक्ती जी समोरून असेल टापटीप आणि पाठीला शर्ट पूर्णपणे घामाने थिजलेला, पण तरीही परफ्युम लावल्याने दुर्गंध न येणारा. त्या सगळ्या व्हाईट कॉलर जॉब’ करणाऱ्यांच्या या कविता.
एक अखंड भांडण सुरू असतं डाव्या आणि उजव्या मेंदूत. माझ्या कविता त्याचेच मी पडसाद समजतो. तर्क आणि भावना यांची जुगलबंदी तटस्थपणे बघणं यात मौज असते.
या पुस्तकासाठी ज्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि चार हिताच्या गोष्टी सांगितल्या अशा काहींचा उख अनिवार्य आहे. ‘ग्रंथाली’चे श्री. सुदेश हिंगलासपूरकर आणि त्यांचे सहकारी ज्यांनी हे सुंदर पुस्तक जुळवून आणलं, ज्येष्ठ चित्रकार श्री. श्रीधर अंभोरे (माझा अंभोरे काका), माझी पत्नी तेजस्विनी जिने सुंदर मुखपृष्ठ केले, ज्येष्ठ कवयित्री डॉ. सिसिलिया कार्डालो ज्यांच्या प्रस्तावनेने हा संग्रह अजून वाचनीय झाला आणि ज्येष्ठ कवी श्री. प्रशांत असनारे ज्यांनी माझ्यावरच्या प्रेमाखातर दिलेले शब्दाशीर्वाद संग्रहाच्या मलपृष्ठावर आहेत.
बाबा वाढदिवसाला म्हणत, ‘तुझ्यातली अस्वस्थता वृद्धिंगत होवो!’ हाच आशीर्वाद तुम्ही रसिकही मला द्याल ही आशा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कॉर्पोरेट कविता- प्रथमेश किशोर पाठक”

Your email address will not be published. Required fields are marked *