Sale!

कॉफी- मकरंद सावंत

200.00 150.00

मनोगत
संपूर्ण पुस्तकच मनातलं बरंच काही उतरवून घेणारं असलं की त्यातल्या मनोगताला मिठाई वरच्या चांदीच्या वर्खाची चव येऊ लागते. तो तिला कॉफी का म्हणतो आणि ती त्याला हनी का? या प्रश्नासाठी शब्दांची चव आणि गुणधर्म चाखून घ्यावे लागतील आणि प्रश्न विचारावे लागतील स्वतःच स्वतःला. कॉफी कशी असते? tempting, हवीहवीशी..
कॉफी नशा चढवते पण पाय घसरू देत नाही. ही त्याची कॉफी म्हणजे अगदी कुणीही असू शकते का? तर उत्तर आहे नाही. ती एकंच आहे म्हणून ‘कॉफी’ आहे. तसाच तिचा ‘हनी’ तो सुद्धा तितकाच exclusive. थोडासा तुरट, थोडासा गोड, आवडेलच असा नाही पण, तितकाच गरजेचा.
या कॉफी आणि हनी च्या गप्पा, एखाद्या कॉफी शॉप मध्ये त्या दोघांच्या बाजूला बसून ऐकल्या सारख्या आहेत. यातले आपण कधीकधी कॉफी होतो आणि समजून घेतो कधी हनी होत समजूत काढतो. कधी स्वतः मधली कॉफी शोधतो आणि हनी सापडू लागला की आपोआप ओठांवर येतो .
ही त्याने तिला पाठवलेली पत्रं तिच्या पर्यंत पोहोचली असतील, नसतील, कसलीच शाश्वती नाही. शाश्वत रहातं ते नातं.
सोबतीला नात्याचं नाव देता येतं पण नातं देताच येईल याची खात्री नाही. दोन दिशेला निघून गेलेल्या किंवा विरून गेलेल्या पानांवरची ही अर्धी मुर्धी कविता शब्दांचं ओझं होऊ न देता उतरत जाते खोलवर, अचानक कोणतं ही पान उलगडून आपण आपल्याच आयुष्याच्या एखाद्या वळणावर उभं रहातो जिथे आपली कॉफी किंवा हनी आपली वाट बघत असतो.
शब्दांच्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या ओळी, आयुष्याला चव देवोत ही अपेक्षा.
– मकरंद

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कॉफी- मकरंद सावंत”

Your email address will not be published. Required fields are marked *