ब्रह्मराक्षस- ओंकार जोशी
₹100.00
ई-आवृत्तीच्या निमित्ताने
ब्रह्मराक्षसाचं पर्व लिहून संपलं आणि अनेकांच्या प्रेरणेने मी ही कथा पप्रकाशित करण्याचं धाडस केलं. ही कथा प्रकाशित करताना आधी परंपरागत छापील ईपुस्तक रुपात करावी असंच मनात होतं आणि त्याप्रमाणे कामालाही लागलो होतो. पण एकदा सहजच फेसबुक ची पानं चाळत असताना ब्रोनॅटो विषयी समजलं आणि त्या पानावर लिहिलेल्या टॅग लाईनच्या प्रेमातच पडलो.
‘ईपुस्तक जगभर जाते, सदैव राहते!’
मग शैलेश शी मेसेंजर वर संपर्क साधला, आणि माझ्या मेसेज ला प्रतिसाद ही मिळाला, शैलेश ने सांगितलेली पुस्तकां विषयीची माहिती, आणि आजच्या काळातली त्याची व्याप्ती ही नक्कीच मान्य केली पाहिजे अशीच आहे,
ईपुस्तक हे स्थळ व काळाच्या मर्यादा कधीच ओलांडून गेलं आहे हे आपल्याला किंडल आणि प्ले बुक सारखं जागतिक ई -व्यासपीठ पाहिल्यावर समजतं. तिथे पुस्तक वाचण्याची सुलभता आणि त्याची कुठेही असलेली उपलब्धता ह्या गोष्टींमुळे ईपुस्तक विशेष ठरतं.
आणि म्हणूनच माझी ही पाहिलीवहिली कथा ईपुस्तक रुपात प्रकाशित व्हावी असं मला वाटू लागलं आता ‘ब्रोनॅटो’च्या साहाय्याने त्या विचारला मूर्त रूप ही मिळालं आहे आणि आता माझी कथा ह्या अंतरजालात चिरंतर व सुरक्षित रित्या टिकून राहील ह्याची शाश्वती आहे.
ओंकार जोशी
Reviews
There are no reviews yet.