सोडून कॉर्पोरेट आयुष्य- समीर पोवळे
कॉर्पोरेट ऑफिसच्या बंद खिडकीतून
दिसतात झाडं वाऱ्याने डोलताना
पाहून उगाचच जीव झुरतोय
आणि त्याच एअरकंडिशन ऑफिसची
हवा थंडगार खाऊन
तोच जीव गुदमरतोय
आयुष्यात ज्या सुखा साठी झपाटलेलो
हे सुरुवातीलाच
स्वतःहून चुरडा करून फेकलं होतं केव्हाच
आता हे स्मरतंय
परंतु त्या निरागस सुखासाठी
या वैभवात मन मात्र रोज वारंवार मरतंय
धावत राहिलो जन्मभर
ज्या मखमली पलंगावर
हक्काने पहुडण्यासाठी
तो पलंग आता टोचतोय
प्रत्येक अंग अंग आणि या मखमलावर
आता झोप कसली आणि कसले स्वप्न
कुठे आहेत ते स्वप्नांचे रंग
खरं तर कॉर्पोरेट मधली
खोटी प्लास्टिक स्मितहास्य पाहून
जोरात रडावसं वाटतंय
आणि एखाद्या चांगल्या भल्या माणसाला
खळखळून हसणाऱ्याला कडकडून भेटावसं वाटतंय
एखाद्या व्यावहारिक क्लायंट ला भेटण्यापेक्षा
लहान बालक बनून
आपल्याच पोराची वाट पाहणाऱ्या
पालकांना भेटावसं वाटायला लागलंय
सोडावी कार, बाईक
आणि मित्रांबरोबर घ्यावा एक मस्त वॉक
आणि त्यांच्या मैत्रीसही व्हावं
परत एकदा पाईक असं वाटायला लागलंय
आता निघायचंय परतीच्या प्रवासाला
शोधायला तीच निरागसता
घालायच्यात या आयुष्याच्या जुन्या गल्ली बोळात परत कित्येक गस्ता
पाहिजे तीच जुनी वाट भेटताना
स्वतःच्या खऱ्या घराला आणि मित्रांना
कुठेय? शोधतोय मी तो जुना रस्ता
आता हे चकचकीत कॉर्पोरेट आयुष्य सोडून
जगाचंय गल्लीतलंच पण सच्चे जीवन एक साधा
सच्चा माणूस बनून
समीर
Reviews
There are no reviews yet.