गोष्ट छोटी डोंगराएवढी- अरविंद जगताप

200.00

सगळ्याच गोष्टी दाद मागण्यासाठी सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं. एकदा शुटींगच्या निमित्ताने एका गावात ड्रोन हवेत उडवला होता. गावकरी जमा झाले होते. कुतुहल म्हणून त्यातला एक माणूस म्हणाला, “किती दिवस झाले राव वर बघून! आभाळाकडे बघणंच सुटलं होतं.” धक्का बसला ऐकून. माणसं वर बघायचेच विसरून गेलेत काही ठिकाणी. आग ओकणारा सूर्य असतो खुपदा वर. तेंडूलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत उतरायचा ना तेवढ्या कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवा. ऐकायला साधी वाटते ही अपेक्षा पण खूप अवघड आहे. गावोगाव अशाच गोष्टी आहेत.
प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट छोटी वाटते पण असते डोंगराएवढी
– अरविंद जगताप 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गोष्ट छोटी डोंगराएवढी- अरविंद जगताप”

Your email address will not be published. Required fields are marked *