Sale!

अनुपमा

100.00 0.00

प्रस्तावना: मंगेश पाडगावकर

ताज्या टवटवीत फुलांनी भरलेल्या परडीसारखा आपला पहिला कविता संग्रह घेऊन, श्री प्रसाद कुलकर्णी रसिकांच्या भेटीसाठी येत आहेत. फुललेल्या फुलांना आपला सुगंध जाहीर करण्यासाठी वेगळी निमंत्रण पत्रिका छापावी लागत नाही. श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या कवितांचेही असेच आहे. त्यांना कसल्याही प्रस्तावनेची वास्तविक गरज नाही. पण तरीही हा संकेत पाळावा असा त्याचा आग्रहच असल्यामुळे मी हे चार शब्द लिहायला बसलो आहे.

या फुलण्याचे रसिक वाचक स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो. कवितेवर प्रेम करणारा एक रसिक म्हणून मी श्री प्रसाद कुलकर्णी यांना या प्रस्तावनेच्या निमित्ताने माझ्याही शुभेच्छा देत आहे.

Description

4+

अनुपमा हा माझा पहिला कवितासंग्रह १९९० साली रत्नागिरीला भरलेल्या साहित्य संमेलनात श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते प्रकाशित झाला. त्याला प्रस्तावना होती कविवर्य श्री. मंगेश पाडगावकरांची. आज सत्तावीस वर्षानंतर हा कविता संग्रह ई बुक स्वरुपात येतोय याचं श्रेय माझे मित्र शैलेश खडतरे यांचं.

१९९० पासून काळाचं एक आवर्तन पूर्ण झालंय. अभिव्यक्तीने आपली परिमाणं आणि माध्यमं बदलली आहेत. काळाच्या महावृक्षावरुन जुनी पाने गळून पडत असतात आणि त्याला सतत नवी नवी पालवी फुटत असते. आपणही काळाबरोबर बदलायला हवं. १९९० साली ‘अनुपमा’ प्रसिद्ध झाला त्यावेळी अगदी किशोरवयात होतो. पहिल्यावहिल्या पुस्तकाचं खूप अप्रूप होतं. आज गाठीशी फार नाही पण आठ पुस्तकं, गीतकार म्हणून दीड डझन चित्रपट, वीसेक ध्वनिफिती एवढा ऐवज जमा आहे. पण तरीसुद्धा ह्या पहिल्यावहिल्या ई काव्यसंग्रहाचं मला एखाद्या पहिलटकरासारखं अप्रूप आहे. रसिक कसं स्वागत करतील… त्यांना कविता आवडतील ना… ते दाद देतील ना…..!

कविता लिहून होईपर्यंत आपली असते. लिहून झाली… रसिकांसमोर आली की ती रसिकांची बनते. तेव्हा रसिक हो, तुमचीच कविता तुम्हालाच पेश करतोय. फक्त माध्यम बदललंय…. पोच द्यायला विसरू नका. हो… आणखी एक लक्षात असू द्या. या कविता ऐन विशीतल्या आहेत. त्या स्वप्नाळू वयातल्या आहेत. त्यांना भाबडेपणाचा दरवळ आहे.

ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे आणि त्यांच्या टीमला पुन्हा एकदा धन्यवाद.

प्रसाद कुलकर्णी
जून २०१७

4+

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अनुपमा”

Your email address will not be published. Required fields are marked *