आमचा बाप आन् आम्ही- डॉ नरेंद्र जाधव
₹200.00 ₹100.00
डॉ. नरेंद्र जाधव –
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, देशी-विदेशी अग्रगण्य विद्यापीठांतील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले प्रभावी वक्ते, मराठी-हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून तब्बल 41 पुस्तकांचे लेखन-संपादन करणारे सिध्दहस्त लेखक; तसेच एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. नरेंद्र जाधव सर्वदूर सुपरिचित आहेत.
डॉ. नरेंद्र जाधव सध्या राज्यसभेचे राष्ट्रपती-नियुक्त खासदार म्हणून कार्यरत आहेत. सत्ताधारी पक्षाचे सदस्यत्व न स्वीकारता आपला स्वतंत्र बाणा त्यांनी कसोशीने जपला आहे. प्रत्यक्षात संसदेत तसेच विविध स्थायी समित्यांमध्ये (वित्त, व्यापार आणि आता माहिती-तंत्रज्ञान) आणि परराष्ट्र व्यवहाराच्या सल्लागार समिती मध्ये अभ्यासू आणि सक्रिय सहभागातून डॉ. नरेंद्र जाधव यांनी संसदपटू म्हणून आपला एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे. खासदारकी शिवाय अशोका युनिव्हर्सीटी सारख्या नावाजलेल्या विद्यापीठासह एकूण तीन विद्यापीठात ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत ते देशाच्या युवापिढीच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्याच बरोबर, टाटा उद्योग समूहासह विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर ‘स्वतंत्र संचालक’ म्हणून देखील डॉ. जाधव कार्यरत आहेत. त्यांची ज्ञानसाधना आणि लेखनकार्य तर अखंडपणे निरंतर चालूच असते.
डॉ. नरेंद्र जाधव यांनी गेली 45 वर्षे सार्वजनिक जीवनात अनेकानेक उच्चतम पदांना आपल्या कर्तृत्वाने नवीन झळाळी मिळवून दिली आहे. केंद्रीय नियोजन आयोग (अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग) तसेच राष्ट्रीय सल्लागार परिषद (अध्यक्षा : श्रीमती सोनिया गांधी) या दोन भूतपूर्व शिखर संस्थांमध्ये केंद्रीय राज्य-मंत्री समकक्ष पातळीवरील सदस्य म्हणून देशाची 12 वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आणि एकूणच देशाच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्याही पूर्वी भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून देखील डॉ. नरेंद्र जाधव यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे.
Reviews
There are no reviews yet.