Sale!

दिल से…संग्रह स्पंदनांचा- अमरजीत आमले

250.00 200.00

मनात येणारे विचार, खोलवर दडून राहिलेला भावनांचा उद्रेक, भवताल अनुभवत असताना निरंतर जाणवणारी असहायता, प्रतिक्षण विदीर्ण होत जाणारी सत्यमेव जयते ची ललकार आणि त्याच क्षणी या सगळ्यांशी समरस होत असताना स्वतःशी उलगडत गेलेलो मी..
प्रत्येक लेखागणिक मी स्वतःला नव्यानं जाणून घेत होतो.. जाणिवेतुन नेणिवेच्या पातळीवर प्रवास करत असताना, शब्दांचे मूल्य, त्याचं शाश्वत रूप सतत जिवंत ठेवत होतं मला.. नश्वर देहापेक्षा शब्दांचे चिरंतन रूप अमरत्वाचं सामर्थ्य देत होतं मला.. आणि अस्वस्थ वर्तमानाचा दाहक वास्तव प्रखर समाजभान देत होतं मला..
संवेदना बोथट झाल्या की वेदना नाहीशा होतात, स्पंदनं थांबतात आणि मृत आत्मा घेऊन माणसं जिवंत असल्याचा आभास निर्माण करतात.. स्वतःभोवती ती जगत असतात लौकिक अर्थाने.. उपभोगत असतात सगळ्या लालसा.. मिरवत असतात त्यांचा क्रूरपणा कलेच्या मुखवट्याआड.. निरागसतेचा बळी देऊन ही मंडळी अखंड प्रज्वलित ठेवत असतात स्वतःचा वखवखलेला अहम रुपी यज्ञ..
पण कधी ना कधी ज्वाला थंड होतात आणि या निरागसतेच्या राखेतूनच उभं रहातं माणुसकीचं अधिष्ठान. लागते चाहूल उद्याच्या उन्नत उज्वल भविष्याची… आणि त्या क्षणी डोळे भरून येतात… कृतार्थतेची भावना उचंबळून येते.. माणूस असण्याचा सार्थ अभिमान चराचरात ओसंडून वाहू लागतो.
या जाणीवा प्रवाही असतात, त्यांना साठवावे असे वाटते आणि त्यांना बांध घालणे शक्य हि नसते. म्हणून मग मनात प्रफुल्लीत झालेल्या भावना आणि वेदना माणसाने शब्दांच्या रूपाने साठवल्या. माझे देखील तसेच झाले.
सकाळ दैनिकात आलेले माझे लेख संकलित करून एकत्रितपणे ईपुस्तक स्वरुपात तुमच्या समोर ठेवताना मला आनंद होतो आहे. आपल्यातील भावनानुबंध अजून दृढ व सशक्त होतील अशीच कामना करतो.
-अमरजीत आमले

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दिल से…संग्रह स्पंदनांचा- अमरजीत आमले”

Your email address will not be published. Required fields are marked *