आरास

60.00

निष्ठापूर्वक लेखन करणाऱ्या साहित्यिकाची साहित्य निर्मिती ही सुरुवातीला अस्वस्थ करणारी, साहित्याच्या रुपबंधासाठी, जडणी घडणीसाठी, मांडणीसाठी प्राथमिक चौकटीसाठीसतत विचार करायला लावणारी मानसिक वेदनांची प्रक्रिया असते. एकदा आपल्या कल्पनेतून हवं ते मनात नीट आकार घेऊ लागल्यावर मग मात्र निर्मितीचा आनंददायक कैफ वाट्याला येतो. ही निर्मिती घडत असतांना स्वान्त सुखाय असते. पण एकदा पूर्ण झाल्यावर वाचकांच्या पसंतीचे वेध लागतात. कोणत्याही कलेची निर्मिती ही रसिकांशिवाय अपूर्ण असते. आपलं पुस्तक खूप वाचकांपर्यंत पोहोचावं त्यांच्याकडून आवडल्याची पोच पावती मिळावी असं प्रत्येक लेखकाला वाटतं. पण मुद्रण माध्यमाची प्रत्यक्ष मुद्रित पुस्तकांची काही बलस्थानं असतात तशाच काही कमजोर बाबी असतात. मुद्रित साहित्य काही काळाने जुनं होऊन पानं फाटू लागतात. घरातील एकंदर जागेत पुस्तकांचा साठा करण्यास जागेची मर्यादा येते. पुस्तकं कुठे न्यायची म्हटलं तरी ती सर्वत्र पोहोचत नाहीत. वजन फार असतं.

मात्र एकविसाव्या शतकात विद्युत माध्यम विस्तारल्यावर ह्या सर्व मुद्रित माध्यमातील कमतरता नाहीशा झाल्या. पुस्तक निर्मितीचा आवाक्यात आला. आज ‘ब्रोनॅटो’ ईपुस्तकांच्या माध्यमातून जगभर पुस्तकांचे वितरण करते. साहित्याचे वाचक कैक पटींनी वाढतात. पुस्तकांची साठवण करणं शक्य होतं. कारण अगदी कमी जागेत अनेक पुस्तकं मावतात. ह्या सर्वांचा विचार करता मलाही माझी पुस्तकं या माध्यमातून सर्वत्र पोहोचावी असं वाटलं. ‘ब्रोनॅटो’चे शैलेश खडतरे यांच्याशी बोलणं झाल्यावर मी निश्चिंत मनाने माझी पुस्तकं त्यांच्या हाती दिली. मराठी वाड्मयाचा एकूण प्रचार प्रसार विद्युत माध्यमातून नक्कीच वाढणार आहे. ‘ब्रोनॅटो’च्या प्रयत्नशीलतेला आणि कार्याला मनापासून शुभेच्छा.

माधवी कुंटे

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आरास”

Your email address will not be published. Required fields are marked *