Description
प्रिय कविते,
तुला आठवतं, कुठं भेटलो होतो आपण पहिल्यांदा ? मला आठवतं. अशीच भेट झाली होती कॉलेजच्या कट्ट्यावर रेंगाळत असताना. पहिल्याच नजरेत तू उतरली होतीस मनात. नकळत ओढ निर्माण झाली तुझ्याबद्दल. खरंतर वेडच लागलं होतं म्हण ना तुझं ! सतत तुझा सहवास हवाहवासा वाटू लागला. चाललो काही पावलं हातात हात घालून, भान हरपून, वेडयासारखे. कॉलेजचे ते मंतरलेले दिवस कधी भुरभुरुन गेले कापरासारखे कळलं देखील नाही. हातात डिग्री आली आणि निघालो भविष्याच्या शोधात मुंबईच्या दिशेनं. इथं दाखल झालो आणि जगण्यासाठीची ही जीवघेणी स्पर्धा, ही धावपळ पाहिली तेव्हाच खरंतर ठरवलं होतं की थांबायचं नाही इथं फार काळ. परत जायचं आपल्या शांत, निवांत गावात. पण कां कुणास ठाऊक, काही गोष्टी जमतच नाहीत आयुष्यात, खूप मनात असूनही. दिंडी पहायला आलेल्या माणसाच्या पावलांनी त्याच्याही नकळत ताल धरून दिंडीत सामील व्हावं तसंच काहीसं झालं. जगण्याच्या मागे धावताना तुझा हात कधी निसटून गेला हातातून तेही कळलंच नाही. चालत राहिलो एकटाच, एखादया यंत्रासारखा, स्वत:च्या मनाविरुध्द…..
….या ई-पुस्तकाच्या प्रकाशनाची जबाबदारी आपणहून स्वीकारणाऱ्या ब्रोनेटो.कॉमच्या शैलेश खडतरे आणि पुस्तकाचं अतिशय सुंदर मुखपृष्ठ/मलपृष्ठ तयार करून देणारा माझा मित्र निलेश गायधनी यांचे आभार न मानता पुढे जाणं शक्यच नाही. दोघांचाही खूप खूप ऋणी आहे.
तुझा,
आनंद पेंढारकर
Reviews
There are no reviews yet.