लाटांवरच्या कविता
प्रेम … फक्त अडीच अक्षरं!! जिथे प्रेम असेल तिथे आपुलकी, जिव्हाळा, काळजी देखील असणारंच. पण हे नसेल तर… असेल फक्त जीवघेणा दुरावा, विरह आणि मनाची ओढाताण!
मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात, माझ्याही मनात झाले. मनसोक्त प्रेम केलं आणि तेवढंच केलं आणि जे माझ्या ओंजळीत पडलं ते तुमच्यासमोर घेऊन येत आहे. दुःख विकत नाही, तुमच्या सर्वांमध्ये स्वतःला शोधत आहे.
वेळ निघून जाते, परिस्थिती बदलते, काळाच्या ओघांबरोबर माणसंही बदलतात आणि भावनाही. राहतात त्या आठवणी! केलेल्या मैत्रीच्या, त्यानंतर झालेल्या प्रेमाच्या आणि मग प्रेम न मिळाल्यामुळे झालेल्या निराशेच्या, विरक्तीच्या आणि विरहाच्या! त्या आठवणी कटूच असतात पण तरीही मनाला त्याच भिडतात, त्याच हव्याहव्याश्या वाटतात, त्याच धीर देतात अन जगायला शिकवतात! या आठवणीच आपल्या प्रेमाचा गुणाकार करतात अन प्रत्येक क्षणाला ते प्रेम वाढवत असतात.
पाणावलेले डोळे अश्रूंनाही वाट मोकळी करून देतात. व्यक्त झालेल्या शब्दांवर ओघळून त्या शब्दांनाही मोठेपण देतात. आज त्याच शब्दांना तुमच्या समोर घेऊन येत आहे.
हि फक्त सुरुवात आहे… कारण प्रेम, विरह, दुरावा आणि हृदयातल्या त्या प्रत्येक भावना व्यक्त करण्यासाठी तुमच्या सर्वांचा वेळ, तुमचं प्रेम हवं आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. सुरुवातीला चारोळ्यांचं हे पुस्तक तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहे. हे पुस्तक मी माझ्या सहचारिणीला, माझ्या प्रेमाला, माझ्या पत्नीला अर्पण करतो कारण तिच्याचमुळे विरहाचे क्षण विसरून आजही प्रेम माझ्या मनात, हृदयात जिवंत आहे अन याची जाणिव मला प्रत्येक क्षणाला होत असते.
संजय रोकडे
Reviews
There are no reviews yet.