ललित
या छोट्याशा पुस्तकात माझी मागची दहा वर्षं सामावली आहेत, असं म्हटलं तर काही वावगं नाही ठरणार. या पुस्तकातले लेख २००६ पासून ते २०१६ पर्यंतचे आहेत. प्रत्येक लेख कुठल्याशा अनुभवाचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक लेखातला ‘मी’, मी स्वत: असेनच असं नाही, पण त्यात माझं मन गुंतलंय एवढं नक्की. हे सारे अनुभव खरेच असतील याची मी खात्री देऊ शकत नाही, इच्छित नाही. त्यातले काही कल्पनांचे तुकडे असतील, तर काही अगदी खरोखर घडलेल्या- बिघडलेल्या गोष्टींच्या तांत्रिक नोंदी असतील.
पंजक कोपर्डे
Reviews
There are no reviews yet.