Sale!

मी कैकयी- मेधा इनामदार

150.00 130.00

युगानुयुगं रामायणाचा गोडवा तसाच आहे.

रामायणाला अद्भुताचा एक देखणा स्पर्श आहे. त्याग, प्रेम, आदर, भक्ती, पराक्रम आणि निष्ठा यासारख्या साकार सकारात्मकतेने रामायणातली बहुतेक सर्व व्यक्तिरेखा नटलेल्या आहेत. अयोध्येच्या महाराज दशरथांपासून सुरू झालेली ही कथा म्हणजे श्रीरामाच्या आयुष्याची एक आगळीवेगळी कहाणी आहे.

राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न या चारही भावांच्या प्रेमाची ही कथा आहे. माता पिता आणि पुत्र यांच्यामधल्या मधुर नात्याची ही कथा आहे. राजा आणि प्रजा यांच्यातील गडदबंधनाची ही कथा आहे. कर्तृत्वाने मिळवलेल्या दैवत्वाची आणि त्यामुळे त्याला प्राप्त झालेल्या भक्तीच्या सखोल निष्ठेची ही कथा आहे. रावणसारख्या मायावी आणि आसुरी शत्रुत्वाशी केलेल्या अथक संघर्षाची ही कथा आहे आणि त्याचबरोबर सावत्र मातेच्या पुत्रप्रेमाची आणि तिच्या सावत्रपणाचीही ही कथा आहे.

तसं पाहिलं तर रामायणात खलपात्र अभावानेच येतात.

कैकेयी ही रामायणातली खलनायिका…

परंतु ती खरेच तशी आहे का?…

…सर्वांनी तिला क्षमा केली तरी ती मात्र स्वत:ला कधीही क्षमा करत नाही.

मोठे विलक्षण व्यक्तित्व आहे तिचे. आजही अशा केवळ स्त्रियाच नव्हे तर पुरुषही आढळतात जे निसटत्या क्षणाच्या मोहाने सर्वस्व हरवून बसतात आणि मग पश्चातापाशीवे हाती काही उरत नाही.

म्हणूनच रामायणात खलनायिका ठरलेल्या कैकेयीचे मला आकर्षण वाटले. उपेक्षित ठरलेल्या कैकेयीचे मन वाचावे… तिला समजून घ्यावेसे मला वाटले.

हा माझा प्रयत्न वाचकांना नक्कीच आवडेल असा विश्वास आहे.

श्री. शैलेश खडतरे यांनी माझा हा प्रयत्न किंडल अमझोनवर प्रकाशित केला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. या पुस्तकासाठी एक सुंदर मुखपृष्ठ बनवले त्याबद्दल श्री. संतोष घोगाडे यांचेही खूप खूप आभार.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मी कैकयी- मेधा इनामदार”

Your email address will not be published. Required fields are marked *