पुलंची बाग

Description

1+

मित्रांनो,
या वेळी लेखनस्पर्धेच्या निमित्ताने आम्ही घेऊन येत आहोत एक लाडका विषय. ‘पु.ल. देशपांडे’. १२ जून २००० हा दिवस मराठी माणसाच्याच नव्हे तर चक्क मराठीच्याही डोळ्यात पाणी ठेवून गेला. मराठीच्या चेहऱ्यावरचे स्मित ज्या दिवशी मावळले तो हा दिवस.
#लेखनस्पर्धा घेण्याच्या निमित्ताने आम्ही पुलंच्या लेखनाचा उत्सव साजरा करीत आहोत.
यांच्या साहित्याला डोक्यावर घेऊन नाचताना मराठी माणसाला चक्क विठ्ठलाच्या पायाची विट झाल्याचा आनंद मिळावा इतका लळा यांनी आपल्या लेखणीने व लोभस व्यक्तिमत्वाने मराठी मनाला लावला. परदेशातील एखादी सुंदर ललना जशी ‘नथ’ लावल्यावर अधिक सुंदर दिसू लागते; आपलीशी,आपल्यातलीच जाणवू लागते; तसेच अनेक इंग्रजी साहित्यकृतींना यांनी मराठीची ‘नथ’ देऊन अधिक सुंदर केले. आपलेसे केले. यांचे साहित्य निखळ आनंद तर देतेच पण प्रबोधन देखील करणारे आहे.
लेखन, कथा कथन, उत्तम वक्ता, अभिनेता, संगीत, व्यक्तिचित्रे, नाटक, गायन, अनुवाद, तत्वज्ञान असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तीमत्वात होते. त्यात ते निष्णात होते. स्वातंत्र्यानंतर दूरदर्शन सुरु झाले तेव्हा त्यावर सर्वप्रथम पंडित नेहरूंची मुलाखत घेण्याची योग्यता असणारे आपले पुलं नंतर अनेक शिखर सर करत गेले. तेही धाप न लागता. हसतमुख.
पु.ल आपल्याला पहिल्यांदा भेटले असतील ते शाळेच्या मराठीच्या धड्यातून. पण त्यांना प्रत्यक्ष भेटता आले नाही हि खंत नेहमी राहील. आता या लेखन स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही ‘पुलप्रेमींना’ एकत्रित करून पुलंच्या लेखानानंदाचा सोहळा साजरा केला आहे.
अनेकांनी यात सहभाग घेतला. खूप लेख मिळाले, निवडप्रक्रिया कठीण होती. पण मन कठोर करून निवडक लेख घेतले. ज्यांचे लेख निवडले गेले आहेत त्यांचे अभिनंदन. जर का तुमचा लेख यात नसेल तर नारज नका होऊ, रागावू तर मुळीच नका असाच लोभ ठेवा आणि लिहित रहा, पुढे अजून छान छान विषय येत आहेत. प्रयत्न नक्की करा.
लोभ असावा.
शैलेश खडतरे

1+

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पुलंची बाग”

Your email address will not be published. Required fields are marked *