थवा

Description

0

आज माझा ‘थवा’ हा कथासंग्रह वाचकांच्या हाती सुपूर्द करताना मला खूप आनंद होत आहे. हा कथासंग्रह म्हणजे मी लिहिलेले आणि प्रकाशित झालेले पहिलेच पुस्तक. त्यामुळे साहजिकच अनामिक भीती आणि साशंकता मनात दाटून राहिली आहे.

खरं म्हणजे लेखन हा माझा विरंगुळा म्हणून जपलेला छंद. ‘दिसा माजी काहीतरी लिहावे’ म्हणून लिहिणारा. दिवसपाळी व रात्रपाळी ह्या भोवऱ्यात अडकून फावल्या वेळात लेखनाचा उद्योग करणारा मी. गेल्या तीन वर्षात असं बराच काहीतरी लिहिलं. आणि त्या ‘काहीतरी’ मधूनच ह्या संग्रहातील कथांनी जन्म घेतला. ह्या कथा कशा सुचल्या हे सांगणं अवघड आहे पण कधी कधी ऑफिसमध्ये काम करताना, कधी कधी ट्रेन मध्ये बसून खिडकीतून बाहेर पाहताना आणि कधी कधी घरामध्ये आणि घराबाहेर घडलेले प्रसंग पाहताना जे विचार मनात आले, जे विचार सुचले, ते शब्दांकित करून कथेच्या रुपात उतरवले हे मात्र खरे. बहुतेक कथा बोली भाषेत असल्यामुळे ह्यांत भाषेच्या सौंदर्याचा अभाव असणे हि शक्य आहे कारण मुख्यत्वे ह्यातील कथांचे कथन करणे हाच माझा उद्देश्य असल्यामुळे त्या प्रकारे लिहिल्या गेल्या आहेत.

ह्या संग्रहातल्या कथा विविध विषयावरच्या आहेत. प्रत्येक विषय मी अत्यंत साधेपणाने हाताळायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यात कितपत यशस्वी झालो आहे हे वाचकांनाच माहित. तथापि बऱ्याच उणीवा असण्याची शक्यता मी नाकारत नाही. माझ्या पुढील कथासंग्रहामध्ये त्या दूर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.

– श्रीकांत कुलकर्णी

0

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “थवा”

Your email address will not be published. Required fields are marked *