Description
एखाद्या स्त्रीनं लिहेलेल्या कथांत स्त्रीची दुःख चित्रित व्हावी, यात नवल नाही. वर्षा रेगे यांच्या या संग्रहातील कथांतूनही स्त्रीची विविध परींची दुःखंच चित्रित झाली आहेत. त्यांच्या कथांतील स्त्रिया बव्हंशी संसारी स्त्रिया आहेत, संसारातील ताणताणाव सोसणं आणि त्यांच्यावर मात करणं ही त्यांच्या जीवनाची कसोटीच असते. या कसोटीला उतरताना स्त्रियांची होणारी ओढाताण आणि मनाचं सैरभैरपण या कथांत समंजसपणे चित्रित झालं आहे. या कथांत पुरुषपात्रं नाहीत असं नाही, पण अधिकतर संख्या आहे ती स्त्री पात्रांची. वर्षा रेगे संसारिक समस्यांतून, संकटातून कथा शोधत जातात. आणि त्या फुलवता फुलवता स्त्रियांच्या अंतरंगातील दुःख, व्यथांना प्रकाशात आणत जातात, त्या व्यथा दुःखांचा स्पर्श वाचकांच्या जाणिवांना घडवत जातात. अर्थात समस्या चित्रणाच्या वरच्या पातळीवर त्यांच्या कथालेखनाने झेप घ्यावी, ही अपेक्षा!
– ह. मो. मराठे
Reviews
There are no reviews yet.