मोडी लिपी

Showing all 2 results

  • मोडी लिपी – शिका सरावातून

    299.00

    मनोगत
    नाइट कॉलेज, कोल्हापूरच्या मोडी वर्गामध्ये मोडी लिपी शिकत असताना एक बाब माझ लक्षात आली की, मोडी अक्षरे लिहिण्यास अवघड आहेत. त्या अक्षरांचा सराव असेल तरच ती लिहिता येऊ शकतात, हे लक्षात आल्यावर मी अक्षरे सरावासाठीचा कित्ता शोधला, पण तसे कित्ता पुस्तक उपलब्ध नाही, ही माहिती मोडीतज्ञाकडून मिळाली. पण मोडी लिपी शिकण्याठी सराव महत्वाचा आहे. मी संगणकावरील मोडी अक्षरांची प्रिंट काढून सराव केला व माझ्यापरीने सरावाचा प्रश्न सोडविला. सदरची बाब प्रा. अरुण शिंदे सरांच्या धनात आली. त्यांनी सुचवले की असे कित्ता पुस्तक नव्याने मोडी शिकणार्‍यासाठी गरजेचे व उपुक्त आहे. यातूनच असे कित्ता पुस्तक आपण लिहावे, अशी प्रेरणा माझ्या मनात निर्माण झाली. यासाठी मोडीचा माँट श्री लिपी (मॉड्युलर इन्मोटेक प्रा. लि., पुणे) यांच्याकडून तयार करून घेतला. पुस्तकासाठी काम करणची ही माझी पहिलीच वेळ असल्याने प्रत्येक गोष्ट नीटपणे समजून घेऊन, झपाटून कामास लागलो व अनेक पातळ्यावर सतत काम करीत सदर कित्ता पुस्तक पूर्ण केले.
    सदरच्या पुस्तकात मराठी वर्णमालेबरोबर मोडी वर्णमाला आहे. तसेच मराठी अक्षरांचे इंग्रमजीतील पर्यायही दिले आहेत. अमराठी लोकांना मोडी लिपीचा परिचय होऊन त्यांना मोडी लिपीचे ज्ञान आत्मसात करण्यास इंग्रजी अक्षरांमुळे मदत होईल. इंग्रजीमधून मराठी अक्षर व त्या मराठी अक्षराची मोडी लिपीमध्ये लिहिण्याची पद्धत व सरावासाठी मोकळी जागा पुस्तकामध्ये दिलेली आहे. पुस्तकातील प्रत्येक मराठी शब्दाचे इंग्रजी भाषेत स्पेलींग दिले आहे. यामुळे अमराठी भाषिकांना या पुस्तकाद्वारे मोडी लिपी शिकण्यास मदत होईल. मराठीतील स्वर, व्यंजने, बाराखडी मोडी लिपीत कशी लिहावीत, हे सोप्या पद्धतीने समजावून दिले आहे. स्वर, व्यंजने व बाराखडीमधील कठीण अक्षरे यांचा जास्तीत जास्त सराव व्हावा म्हणून सरावासाठी रिकामी जागा दिली आहे. तसेच काना-मात्रा विरहित शब्द, काना-मात्रा असलेले शब्द, उकार-वेलांटी असलेले शब्द, त्यांचे इंग्रजी स्पेलींग व ते मोडी लिपीत कसे लिहावे हे दिले आहे. त्याच्यापुढे सरावासाठी जागा उपलब्ध आहे.

    काही मोडी अक्षरांचे मोडी लिपीत लिहिण्याचे विविध प्रकार दिलेले आहेत. मोडी लिपीमध्ये अनेक शब्दसंक्षेप वापरले जातात. त्यांचीही माहिती पुस्तकात आहे. मोडी लिपीची अक्षरे आपण सरावाने लिहू शकतो. पण पूर्वीचे ऐतिहासिक दस्तऐवज वाचताना आपल्याला बर्‍याच बाबींची काळजी घ्यावी लागते. मोडी लिपी वापरात असताना कोरे कागद असत. त्यामुळे कागदाच्या डाव्या बाजूपासून उजव्या बाजूपर्यंत एक शिरोरेषा काढून मोडीत लिहिण्यास सुरुवात केली जाई. मोडी लिपीत कोणत्याही प्रकारचे व्याकरणाचे नियम नसल्याने, ऐतिहासिक कागदपत्रांचे वाचन काळजीपूर्वक करावे लागते. लिहिलेल्या मजकुराचे तारतम्याने व संदर्भ समजून घेऊन वाचन केल्यास दस्तऐवजांचा अर्थ लागण्यास सोपे जाते.

    – नवीनकुमार माळी

  • राजर्षी शाहु छत्रपती महाराज

    100.00

    लिप्यंतरकाराचे मनोगत

    ‘राजर्षी शाहु छत्रपती महाराज’ हे मोडी लिपीतील पहिले शाहु चरित्र वाचकांसमोर ठेवताना मला अतिशय आनंद व अभिमान वाटत आहे. मोडी वाचकासांठी व मोडी प्रचार प्रसारासाठी हे चरित्र मैलाचा दगड ठरेल असा मला विश्वास वाटतो. मी माझे मोडी शिक्षण ऊदयसींह राजेयादव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले. मोडी शिकताना मूळाक्षरे, बाराखडी, शब्द, वाक्य मी सहज शिकलो पण मोडीतील हस्तलिखीत कागदपत्रांचे वाचन करताना मला अडचणी आल्या. यावेळी साधे सोपे मोडी साहित्य वाचनासाठी असावे असे मला वाटत होते.

    कोल्हापूरमधील जेष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार संपादित ‘राजर्षी शाहु गौरव ग्रंथ’ मराठी बरोबरच चौदा भारतीय भाषांमध्ये तसेच जर्मन, इंग्रजी आदी विदेशी भाषांमध्येही प्रसीद्ध झाला आहे. रशीयन, जपानी, फ्रेंच, चिनी या भाषांमध्येही अनुवादाचे काम सूरू आहे. याचवेळी डॉ. जयसिंगराव पवारांचे सदरचे शाहु चरित्र माझ्या वाचनात आले. ‘मोडीलीपी शिका सरावातुन’ या माझ्या पुस्तकाच्या निमीत्ताने डॉ.जयसिंगराव पवार यांना भेटण्याचा योग आला, त्यावेळी मी त्यांना शाहु चरित्रतील काही पाने मोडी लिपीत संगणकीय टंकन केलेली दाखविली, व शाहु चरीत्राचे मोडी लिप्यंतर करण्याची इच्छा व्यक्त केली. पवार सरांनी आनंदाने परवानगी दिली. आज संगणकीय टंकन माध्यमातुन जशेच्या तसे पुस्तक लिप्यंतर करून वाचकासमोर ठेवणे हा अशक्यप्राय प्रवास इतिहास तसेच मोडीची गोडी यामुळेच शक्य झाले आहे.

    – नवीनकुमार माळी
    दि. ४ जानेवारी २०१७

Showing all 2 results