मराठी
Showing 81–90 of 93 results
-
वस्त्रहरण- गंगाराम गवाणकर
Sale!₹300.00₹206.00अध्यक्ष म्हणून पु.लं.नी केलेल्या भाषणाचा गोषवारा
मित्रहो, खरा म्हणजे मी कोकणीतूनच बोलूक होया आसा. पण माझा कोकणी समजण्याक जरा कठीणच जाताला.
आत्तापर्यंत बऱ्याचवेळा नाटकाच्या शंभराव्या, दोनशेव्या, पाचशेव्या प्रयोगाला मी अध्यक्ष म्हणून बोललो आहे पण आजच्या इतकी पंचाईत माझी कधीच झाली नव्हती. कारण मी हसून हसून अतिशय दमलो आहे. ह्या लोकांनी इतक्या सुंदर विनोदी रितीने हा पहिला अंक संपवलेला आहे की त्यानंतर आपण काही विनोद करणे म्हणजे ‘स्वतःला विनोदबुद्धी नाही’ हे इतर लोकांना सांगण्यासारखं आहे. मी हे नाटक प्रथम जेव्हा पाहिलं त्यावेळेला दहापंधरा दिवस माझ्या घरी आलेल्या प्रत्येक माणसाचं मी वस्त्रहरण याशिवाय दुसरं काहीही करत नव्हतो. मला मोठी गंमत वाटते की, यांच्यातली बरीचशी मंडळी ही सूतगिरण्यांमध्ये कामाला आहेत. कपडे करणाऱ्यांनी लोकांचं इतकं वस्त्रहरण करावं हे सुद्धा एक नाट्यच आहे. कामगार असूनसुद्धा या लोकांनी इतका ….…. ही जी अध्यक्षीय भाषण करण्याची संधी तुम्ही मला दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानतो. पुनश्च सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि मी माझं भाषण संपवतो. नमस्कार.
भाषणाचं संकलन आणि पुनर्लेखन -
सगळं उलथवून टाकलं पाहिजे- देवा झिंजाड
-
सलणारा सलाम- अनुराधा नेरुरकर
-
संस्कार शिदोरी
Sale!₹250.00₹200.00मी सौ. मृणाल महेश पेंडसे, माझे पहिलेवहिले पुस्तक ‘संस्कार शिदोरी’ आपणासमोर ठेवताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी आपणास प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की, हे पुस्तक मी स्वत: लिहिलेले नाही तर ते संकलन आहे.
खरं तर हे काम माझ्या हातून घडण्यास कारण माझी मुलगी कु. प्राजक्ता आहे. माझे बालपण अलिबाग तालुक्यातील नारंगी या छोट्याशा खेड्यात गेले. माझे लग्नापूर्वीचे नाव कु. मनीषा वसंत जोशी. मी पदवीधर झाल्यावर कॉम्प्युटर इन्स्ट्रक्टर म्हणून नोकरी केली. नंतर माझे लग्न झाले व मी रोहा या गावी आले आणि मी थोडे दिवस कॉम्प्युटरपासून दूर राहिले. परंतु काही महिन्यांनी माझ्या घरी कॉम्प्युटर आला. मला कॉम्प्युटरची चांगली माहिती असल्यामुळे घरातील कामे उरकल्यावर वेळ मिळेल तेव्हा कॉम्प्युटरवर बसायचे.
दरम्यान प्राजक्ताचा जन्म झाला व पुन्हा एकदा कॉम्प्युटरपासून तिच्या संगोपनामुळे दूर राहिले. परंतु ती मोठी झाल्यावर माझ्या लक्षात आले की तिला खेळण्यापेक्षा पुस्तकांचीच जास्त आवड आहे. त्यामुळे मला असे वाटले की हिच्यासाठी आपण असे संकलन करूया की तिला आवश्यक ते सर्व ज्ञान व माहिती एकत्र मिळेल.
त्यामुळे घरातील कॉम्प्युटरवर श्लोक, स्तोत्रे तसेच इतर गोष्टी टाईप केल्या. मला माहीत असलेली व इतर माहिती जमा करून त्याचे एक अत्यंत उपयोगी संकलन तयार केले. या सर्व कामात मला घरच्या सर्व लोकांनी व माहेरच्यांनी खूप प्रोत्साहन दिले व मदत केली. या सर्व संकलनाची प्रिंट काढून मी प्राजक्तासाठी एक पुस्तक तयार केले. ते तिला इतके आवडले की ती सारखीच ते पुस्तक घेऊन बसायची. तेव्हा मनात विचार आला की हे पुस्तक मी जर प्रकाशित केले तर समाजाला त्याचा फार उपयोग होईल. ज्यांनी ज्यांनी हे पुस्तक पाहिले त्यांनी पण मला हे पुस्तक प्रकाशित करण्याचा प्रेमळ आग्रह केला. त्यात मला विशेष करून आवर्जून उल्लेख करावासा वाटतो तो म्हणजे कै. प्रा. महेश भावे ह्यांचा. कारण त्यांची फार इच्छा होती की मी हे पुस्तक प्रकाशित करावे. कारण ही काळाची गरज आहे. दरम्यान मला दुसरी मुलगी कु. प्राची झाली व पुन्हा तिला शिकविताना मला या पुस्तकाची गरज असल्याची प्रकर्षाने जाणीव झाली व आपोआपच हे पुस्तक प्रकाशित करण्याचा माझा विचार नक्की झाला.
योगायोगाने पार्ले येथील कै. श्री. रा. ग. खासगीवाले यांनी त्यांचे पुण्याचे बंधू श्री. वामनराव खासगीवाले ह्यांच्याकडे मला पाठविले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुणे येथील घरकुल प्रकाशनचे श्री. विश्वास व सौ. विदुला पटवर्धन यांच्याकडे गेले. त्यांना ही कल्पना फार आवडली व त्यांच्या मदतीने ‘संस्कार शिदोरी’ आपणासमोर ठेवण्याची इच्छा प्रत्यक्षात आली.
ह्या पुस्तकासाठी श्री. दिनानाथ पाटील व सौ. विभा वा. दातार यांनी छान प्रस्तावना दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
मला खात्री आहे की हे पुस्तक वाचकांच्या नक्कीच पसंतीस पडेल. माझी अशी विनंती आहे की ह्या पुस्तकाचा लोकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.
दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने-
पहिली आवृत्ती प्रसिद्ध करताना वाचकांच्या कितपत पसंतीस येईल अशी शंका मनात होती. परंतु वाचकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे पहिली आवृत्ती कधी संपली ते कळलेच नाही. वाचक या पुस्तकाचा उत्तम उपयोग करून घेत आहेत हे बघून व वाचकांच्या वाढत्या मागणीमुळे अल्पावधीतच दुसरी आवृत्ती काढण्याचा योग जुळून आल्याने मला अतिशय आनंद होत आहे.
सौ. मृणाल महेश पेंडसे
बी.ए. कॉम्प्युटर डिप्लोमा. -
साखरबिटकी- श्रीनिवास चितळे
Sale!₹300.00₹202.00रसिक मित्रानो मी श्रीनिवास केशव चितळे राहणार ठाणे. नुकतीच साठी ओलांडली. मूळ कोकणातील, थोडक्यात माझी नाळ कोकणात पुरलेली आहे, देहाने मी ठाण्यात असलो तरी मनाच्या ओसरीवर कायम कोकणातील कंदील लटकत असतो, प्राथमिक शिक्षण चिपळूणला, माध्यमिक जोगेश्वरी मुंबई येथे आणि कॉलेज पार्ले म्हणजे सध्याचे साठे कॉलेज,घरात वातावरण धार्मिक आणि तसच शिक्षणालाहि प्राधान्य, आमचे चुलते म्हणायचे तस देवळातील आणि शाळेतील घंटा तेवढ्याच ताकदीने वाजवणे महत्वाचे, बालपणी गुरगुट्या, मेतकुट, दही भात यावर पिंड पोसलेला. घरात सकाळचे सूर्यनमस्कार घातल्या खेरीज दुधाचा कप पुढे आला नाही आणि संध्याकाळचा झोपाळ्यावर बसून परवचा म्हटल्याशिवाय समोर जेवणाच ताट आल नाही. नोकरी भारत पेट्रोलियम मध्ये केली, ३४ वर्षाच्या नोकरीनंतर निवृत्त झालो. पत्नी कर सल्लागार आणि एकुलती एक मुलगी कमर्शियल आर्ट शिकते आहे. व्यसन म्हणाल तर माणस जोडणे आणि वाचणे. पुस्तक वाचन, नाट्य अभिनय, भरपूर केल. लिखाण देखील बर जमत असे लोक म्हणतात. नोकरी निमित्त भरपूर प्रवास देखील केला. अनुभव गोळा केले आणि ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न देखील केला. कविता विशेषतः कुसुमाग्रज, बोरकर, करंदीकर हे त्रिदेव मनात पुजलेले आणि गद्य लेखनात भाई म्हणजे पु.ल. हे दैवत. गोनीदा, पेंडसे, जयवंत दळवी हे अत्यंत आवडते लेखक. आमच्या पिढीचे अनुभव त्या कालचे वातावरण पुढील पिढीला समजावे हि लिखाणा मागची प्रेरणा. मी अत्यंद आनंदी आणि सुखी प्राणी आहे. देवाने खूप काही दिल आणि जे दिल नाही त्याची मला आवश्यकताच नव्हती अशा वृत्तीचा, लोकसंग्रह मात्र अफाट आहे, “जिथे पहावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत “अशी स्थिती आहे, राजकीय म्हणाल तर नमस्ते सदा वत्सले मातृभूमे या बाळकडूवर मोठा झालो आणि ती विचारसरणी बदलावी अस कधीही वाटल नाही. असो माझ्या लिखाणातून माझा अधिक परिचय होईलच आणि आता माझ हे मैत्र तुमच्यामुळे अधिक वृद्धिगत होईल हि खात्री आहे.
आपला मित्र,
श्रीनिवास केशव चितळे.
-
सांगायलाच हवंय, असं नाही- भगवान निळे
Sale!₹200.00₹150.00प्रसन्न अन् उबदार मऊ सावळेपणा पसरलेला… मागनं पांढराशुभ्र धबधबा कोसळतोय. गारवा थंड हिरवा शांत, नीरव न् अशात छान मित्राच्या खांद्यावर हात टेकून आश्वस्तपणे आपल्या आयुष्याचा फोटो काढावा तशी भगवानची कविता!
-मलिका अमर शेखथेट अनुभवाला भिडणारी अभिव्यक्ती, स्वच्छ प्रतिमाविरहित शब्दकळा, विशेषतः स्त्रीच्या करुणामय अस्तित्वाची पारदर्शक ठसठसणारी नस पकडण्याची अद्भुत किमया ही भगवान निळे यांच्या कवितांची अस्सल सारिणी आहे.
वीणा तर निनादते आहे नि विनाकारण शब्द तडफडतात समेवर अशा आभासांची मूर्त लकेर काळजाला चिरत जाते. मी खूप अस्वस्थ होतो त्याच्या कविता वाचताना!!
-अशोक बागवेभगवान निळे यांची कविता ही जगण्या-वागण्याचा वेध घेताना व्यक्तिगत पातळीवरून समुहाची होत जाते. सरळ सोपी परंतु ठाशीव शब्दकळा अन् अंतर्मुख करणारी भगवानची कविता वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे.
-डॉ. अस्मिता गुरवअन्याय, अत्याचार आपले खरे रूप बदलून नवनव्या पेहरावात येत असतात आणि आपले अन्यायी वर्चस्व गाजवीत असतात. हे बहुरुपीय अन्याय वेळीच ओळखणे कवीकलावंतांचे प्रथम कर्तव्य असते. ते एखाद्याचं कवीला समर्थपणे जमते. हे महत्त्वपूर्ण कर्तव्य पार पाडण्याचे काम भगवान निळे यांची कविता करते. हृदय आणि मेंदूवर एकाच वेळी त्यांची कविता प्रहार करत असल्यामुळे ती नेहमीच ताजी वाटते.
-लोकनाथ यशवंतऐंशीच्या दशकात ज्या काही थोड्या मोजक्या लोकांनी गांभीर्याने कवितालेखन केले त्यातील महत्त्वाचे नाव म्हणून भगवान निळे यांच्याकडे पाहता येते. या दशकातील सर्वच कवींनी स्वत:च्या जगण्याचे उत्खनन आपल्या कवितेत केले. पण निळे यांची कविता स्वत:कडून समाजाकडे जाताना जात-धर्म, स्त्री-पुरुष यांच्यातील अंतर्विरोधाचा व्यापक पट उभा करते.
-अजय कांडरकप्पेबंद संकल्पनांच्या पलीकडे जाऊन नवी जाणीव मांडण्याचे काम भगवान निळे यांची कविता करते. विद्रोह, वेदना, नकाराच्या पातळीवर व्यक्त होण्यापेक्षा तिच्यातील समजूतदारपणा हे निळे यांच्या कवितेचे बलस्थान आहे. पुरुषी आकलनाच्या कक्षेतील संवेदना मांडणारी ही कविता आहे.
-डॉ. बाळासाहेब लबडे -
साद अन्नपूर्णेची- डॉ. संदीप श्रोत्री
-
सोडून कॉर्पोरेट आयुष्य- समीर पोवळे
कॉर्पोरेट ऑफिसच्या बंद खिडकीतून
दिसतात झाडं वाऱ्याने डोलताना
पाहून उगाचच जीव झुरतोय
आणि त्याच एअरकंडिशन ऑफिसची
हवा थंडगार खाऊन
तोच जीव गुदमरतोय
आयुष्यात ज्या सुखा साठी झपाटलेलो
हे सुरुवातीलाच
स्वतःहून चुरडा करून फेकलं होतं केव्हाच
आता हे स्मरतंय
परंतु त्या निरागस सुखासाठी
या वैभवात मन मात्र रोज वारंवार मरतंय
धावत राहिलो जन्मभर
ज्या मखमली पलंगावर
हक्काने पहुडण्यासाठी
तो पलंग आता टोचतोय
प्रत्येक अंग अंग आणि या मखमलावर
आता झोप कसली आणि कसले स्वप्न
कुठे आहेत ते स्वप्नांचे रंग
खरं तर कॉर्पोरेट मधली
खोटी प्लास्टिक स्मितहास्य पाहून
जोरात रडावसं वाटतंय
आणि एखाद्या चांगल्या भल्या माणसाला
खळखळून हसणाऱ्याला कडकडून भेटावसं वाटतंय
एखाद्या व्यावहारिक क्लायंट ला भेटण्यापेक्षा
लहान बालक बनून
आपल्याच पोराची वाट पाहणाऱ्या
पालकांना भेटावसं वाटायला लागलंय
सोडावी कार, बाईक
आणि मित्रांबरोबर घ्यावा एक मस्त वॉक
आणि त्यांच्या मैत्रीसही व्हावं
परत एकदा पाईक असं वाटायला लागलंय
आता निघायचंय परतीच्या प्रवासाला
शोधायला तीच निरागसता
घालायच्यात या आयुष्याच्या जुन्या गल्ली बोळात परत कित्येक गस्ता
पाहिजे तीच जुनी वाट भेटताना
स्वतःच्या खऱ्या घराला आणि मित्रांना
कुठेय? शोधतोय मी तो जुना रस्ता
आता हे चकचकीत कॉर्पोरेट आयुष्य सोडून
जगाचंय गल्लीतलंच पण सच्चे जीवन एक साधा
सच्चा माणूस बनूनसमीर
-
स्मरणिका २०१६
₹0.00 -
स्मरणिका २०१८
Sale!₹150.00₹0.00सप्रेम नमस्कार मंडळी,
सलग तिसऱ्या वर्षी ट्विटरसंमेलनाच्या स्मरणिका प्रकाशनाचे काम हे आधीच्या दोन वर्षांपेक्षा अधिक व्यापक व आव्हानात्मक होते. या वेळी प्रथमच साहित्य व व्याख्याने थेट ईमेलने पाठवावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदा व्याख्यानांची संख्या जास्त आहे. आलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणात व्याकरणाच्या चुका होत्या. त्या दुरुस्त करून घेण्यात सर्वाधिक वेळ गेला. पुढील वर्षी प्रत्येकाने आपले साहित्य चोखंदळपणे तपासून त्यात सुधारणा करून पाठवावे ही विनंती. आलेल्या सर्व साहित्याची निवड करणे शक्य नव्हते म्हणून काही ठराविक निकष लागू करून साहित्य निवडले आहे.
ट्विटरसंमेलन म्हणजे समाज माध्यमांवर होणारा भाषिक सोहळा आहे. या सोहळ्यात सर्वांचे स्वागत तर आहेच शिवाय व्यक्त होण्याची मुभा आणि प्रतिसाद मिळण्याची हमी देखील आहे.
आपली ही स्मरणिका आकर्षक व वाचनीय व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षांच्या स्मरणिका या अनेक देशांमध्ये वाचल्या गेल्या आहेत. २०१८ ची ही स्मरणिका देखील उजळ भाग्याने वाचकांच्या प्रेमाला पात्र ठरेल अशी आशा आहे.
लिहिताना आपण जे लिहिले आहे त्यावर भाषिक व भावनिक संस्कार करून लिहिणाऱ्याने लिहित जावे आणि असेच प्रभावित करणारे लेखन करत राहावे.
यावेळी स्मरणिका प्रकाशित करायला थोडा उशीर झालाय पण एक उत्तम ईपुस्तक प्रकाशनासाठी तयार करायला लागणारी सर्वोतोपरी काळजी व आवश्यक तांत्रिक बाबी साभाळून हे काम करण्यात आले आहे.
ईपुस्तक उद्योग उभारणीच्या आमच्या या ध्येयात हल्लीच ब्रोनॅटो ने ३९ देशांमध्ये ९१,००० [एक्याण्णव हजार] मराठी ईपुस्तक डाउनलोड्सचा पल्ला गाठला आहे. हे काम अजून खूप मोठ्या प्रमाणात करायचे आहे. मराठीतील अनेक लेखक लेखिकांच्या साहित्याला जागतिक मागणी तर आहेच शिवाय त्यांच्या साहित्याचा पुरवठा थेट वाचकांच्या मोबाईलवर व आर्थिक मिळकत थेट त्यांच्या स्वतःच्या अकौंटवर पोचवण्याचे काम ब्रोनॅटो आनंदाने करतंय. आणि करत राहील.
ट्विटरसंमेलनाचे आयोजक स्वप्नील शिंगोटे यांचे प्रोत्साहन व सहकार्य या वर्षी देखील लाभले, यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. शिवाय ट्विटरवर इतकी सुंदर संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यांचे खूप कौतुक. पुढील वर्षी देखील इतक्याच जोमाने व उदंड उत्साहाने स्मरणिका सजवली व जगभर निःशुल्क वितरीत केली जाईल याचे प्रेमपूर्वक आश्वासन देतो आहोत.
या स्मरणिकेबाबत तुमचा वाचनानुभव आम्हाला ईमेल किंवा WhatsApp [९९७००५१४१३] ने नक्की कळवा.
[या ईपुस्तकातील मते व विचार ही लेखकांची वैयक्तिक मते व विचार आहेत. प्रत्येक मताशी व विचाराशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.]
लोभ असावा.
शैलेश खडतरे
@ShaileshBronato
www.bronato.com
Showing 81–90 of 93 results