मराठी

Showing 71–78 of 78 results

 • सांगायलाच हवंय, असं नाही- भगवान निळे

  Sale! 200.00 150.00

  प्रसन्न अन् उबदार मऊ सावळेपणा पसरलेला… मागनं पांढराशुभ्र धबधबा कोसळतोय. गारवा थंड हिरवा शांत, नीरव न् अशात छान मित्राच्या खांद्यावर हात टेकून आश्वस्तपणे आपल्या आयुष्याचा फोटो काढावा तशी भगवानची कविता!
  -मलिका अमर शेख

  थेट अनुभवाला भिडणारी अभिव्यक्ती, स्वच्छ प्रतिमाविरहित शब्दकळा, विशेषतः स्त्रीच्या करुणामय अस्तित्वाची पारदर्शक ठसठसणारी नस पकडण्याची अद्भुत किमया ही भगवान निळे यांच्या कवितांची अस्सल सारिणी आहे.
  वीणा तर निनादते आहे नि विनाकारण शब्द तडफडतात समेवर अशा आभासांची मूर्त लकेर काळजाला चिरत जाते. मी खूप अस्वस्थ होतो त्याच्या कविता वाचताना!!
  -अशोक बागवे

  भगवान निळे यांची कविता ही जगण्या-वागण्याचा वेध घेताना व्यक्तिगत पातळीवरून समुहाची होत जाते. सरळ सोपी परंतु ठाशीव शब्दकळा अन् अंतर्मुख करणारी भगवानची कविता वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे.
  -डॉ. अस्मिता गुरव

  अन्याय, अत्याचार आपले खरे रूप बदलून नवनव्या पेहरावात येत असतात आणि आपले अन्यायी वर्चस्व गाजवीत असतात. हे बहुरुपीय अन्याय वेळीच ओळखणे कवीकलावंतांचे प्रथम कर्तव्य असते. ते एखाद्याचं कवीला समर्थपणे जमते. हे महत्त्वपूर्ण कर्तव्य पार पाडण्याचे काम भगवान निळे यांची कविता करते. हृदय आणि मेंदूवर एकाच वेळी त्यांची कविता प्रहार करत असल्यामुळे ती नेहमीच ताजी वाटते.
  -लोकनाथ यशवंत

  ऐंशीच्या दशकात ज्या काही थोड्या मोजक्या लोकांनी गांभीर्याने कवितालेखन केले त्यातील महत्त्वाचे नाव म्हणून भगवान निळे यांच्याकडे पाहता येते. या दशकातील सर्वच कवींनी स्वत:च्या जगण्याचे उत्खनन आपल्या कवितेत केले. पण निळे यांची कविता स्वत:कडून समाजाकडे जाताना जात-धर्म, स्त्री-पुरुष यांच्यातील अंतर्विरोधाचा व्यापक पट उभा करते.
  -अजय कांडर

  कप्पेबंद संकल्पनांच्या पलीकडे जाऊन नवी जाणीव मांडण्याचे काम भगवान निळे यांची कविता करते. विद्रोह, वेदना, नकाराच्या पातळीवर व्यक्त होण्यापेक्षा तिच्यातील समजूतदारपणा हे निळे यांच्या कवितेचे बलस्थान आहे. पुरुषी आकलनाच्या कक्षेतील संवेदना मांडणारी ही कविता आहे.
  -डॉ. बाळासाहेब लबडे

 • साद अन्नपूर्णेची- डॉ. संदीप श्रोत्री

 • सोडून कॉर्पोरेट आयुष्य- समीर पोवळे

  कॉर्पोरेट ऑफिसच्या बंद खिडकीतून
  दिसतात झाडं वाऱ्याने डोलताना
  पाहून उगाचच जीव झुरतोय
  आणि त्याच एअरकंडिशन ऑफिसची
  हवा थंडगार खाऊन
  तोच जीव गुदमरतोय
  आयुष्यात ज्या सुखा साठी झपाटलेलो
  हे सुरुवातीलाच
  स्वतःहून चुरडा करून फेकलं होतं केव्हाच
  आता हे स्मरतंय
  परंतु त्या निरागस सुखासाठी
  या वैभवात मन मात्र रोज वारंवार मरतंय
  धावत राहिलो जन्मभर
  ज्या मखमली पलंगावर
  हक्काने पहुडण्यासाठी
  तो पलंग आता टोचतोय
  प्रत्येक अंग अंग आणि या मखमलावर
  आता झोप कसली आणि कसले स्वप्न
  कुठे आहेत ते स्वप्नांचे रंग
  खरं तर कॉर्पोरेट मधली
  खोटी प्लास्टिक स्मितहास्य पाहून
  जोरात रडावसं वाटतंय
  आणि एखाद्या चांगल्या भल्या माणसाला
  खळखळून हसणाऱ्याला कडकडून भेटावसं वाटतंय
  एखाद्या व्यावहारिक क्लायंट ला भेटण्यापेक्षा
  लहान बालक बनून
  आपल्याच पोराची वाट पाहणाऱ्या
  पालकांना भेटावसं वाटायला लागलंय
  सोडावी कार, बाईक
  आणि मित्रांबरोबर घ्यावा एक मस्त वॉक
  आणि त्यांच्या मैत्रीसही व्हावं
  परत एकदा पाईक असं वाटायला लागलंय
  आता निघायचंय परतीच्या प्रवासाला
  शोधायला तीच निरागसता
  घालायच्यात या आयुष्याच्या जुन्या गल्ली बोळात परत कित्येक गस्ता
  पाहिजे तीच जुनी वाट भेटताना
  स्वतःच्या खऱ्या घराला आणि मित्रांना
  कुठेय? शोधतोय मी तो जुना रस्ता
  आता हे चकचकीत कॉर्पोरेट आयुष्य सोडून
  जगाचंय गल्लीतलंच पण सच्चे जीवन एक साधा
  सच्चा माणूस बनून

  समीर

 • स्मरणिका २०१६

  0.00
 • स्मरणिका २०१८

  Sale! 150.00 0.00

  सप्रेम नमस्कार मंडळी,

  सलग तिसऱ्या वर्षी ट्विटरसंमेलनाच्या स्मरणिका प्रकाशनाचे काम हे आधीच्या दोन वर्षांपेक्षा अधिक व्यापक व आव्हानात्मक होते. या वेळी प्रथमच साहित्य व व्याख्याने थेट ईमेलने पाठवावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदा व्याख्यानांची संख्या जास्त आहे. आलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणात व्याकरणाच्या चुका होत्या. त्या दुरुस्त करून घेण्यात सर्वाधिक वेळ गेला. पुढील वर्षी प्रत्येकाने आपले साहित्य चोखंदळपणे तपासून त्यात सुधारणा करून पाठवावे ही विनंती. आलेल्या सर्व साहित्याची निवड करणे शक्य नव्हते म्हणून काही ठराविक निकष लागू करून साहित्य निवडले आहे.

  ट्विटरसंमेलन म्हणजे समाज माध्यमांवर होणारा भाषिक सोहळा आहे. या सोहळ्यात सर्वांचे स्वागत तर आहेच शिवाय व्यक्त होण्याची मुभा आणि प्रतिसाद मिळण्याची हमी देखील आहे.

  आपली ही स्मरणिका आकर्षक व वाचनीय व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षांच्या स्मरणिका या अनेक देशांमध्ये वाचल्या गेल्या आहेत. २०१८ ची ही स्मरणिका देखील उजळ भाग्याने वाचकांच्या प्रेमाला पात्र ठरेल अशी आशा आहे.

  लिहिताना आपण जे लिहिले आहे त्यावर भाषिक व भावनिक संस्कार करून लिहिणाऱ्याने लिहित जावे आणि असेच प्रभावित करणारे लेखन करत राहावे.

  यावेळी स्मरणिका प्रकाशित करायला थोडा उशीर झालाय पण एक उत्तम ईपुस्तक प्रकाशनासाठी तयार करायला लागणारी सर्वोतोपरी काळजी व आवश्यक तांत्रिक बाबी साभाळून हे काम करण्यात आले आहे.

  ईपुस्तक उद्योग उभारणीच्या आमच्या या ध्येयात हल्लीच ब्रोनॅटो ने ३९ देशांमध्ये ९१,००० [एक्याण्णव हजार] मराठी ईपुस्तक डाउनलोड्सचा पल्ला गाठला आहे. हे काम अजून खूप मोठ्या प्रमाणात करायचे आहे. मराठीतील अनेक लेखक लेखिकांच्या साहित्याला जागतिक मागणी तर आहेच शिवाय त्यांच्या साहित्याचा पुरवठा थेट वाचकांच्या मोबाईलवर व आर्थिक मिळकत थेट त्यांच्या स्वतःच्या अकौंटवर पोचवण्याचे काम ब्रोनॅटो आनंदाने करतंय. आणि करत राहील.

  ट्विटरसंमेलनाचे आयोजक स्वप्नील शिंगोटे यांचे प्रोत्साहन व सहकार्य या वर्षी देखील लाभले, यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. शिवाय ट्विटरवर इतकी सुंदर संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यांचे खूप कौतुक. पुढील वर्षी देखील इतक्याच जोमाने व उदंड उत्साहाने स्मरणिका सजवली व जगभर निःशुल्क वितरीत केली जाईल याचे प्रेमपूर्वक आश्वासन देतो आहोत.

  या स्मरणिकेबाबत तुमचा वाचनानुभव आम्हाला ईमेल किंवा WhatsApp [९९७००५१४१३] ने नक्की कळवा.

  [या ईपुस्तकातील मते व विचार ही लेखकांची वैयक्तिक मते व विचार आहेत. प्रत्येक मताशी व विचाराशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.]

  लोभ असावा.
  शैलेश खडतरे

  @ShaileshBronato
  www.bronato.com

 • स्मरणिका: ट्विटरसंमेलन २०१७

  नमस्कार,

  यंदाचे दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन अतिशय थाटात पार पडले. हजारोंनी ट्विट्स संमेलनात पडल्या आणि मराठी ट्विटरकर मनसोक्त व्यक्त झाले.यंदाच्या संमेलनात विशेष असे बारा हॅश टॅग निवडले होते.ट्विटरकरांनी बाराही हॅशटॅग वापरून आपले विचार संमेलनात मांडले.

  मराठी भाषेत ट्विटरवर काहीतरी सकस लिहिले जावे म्हणुन गेल्या वर्षी पहिले ट्विटर संमेलन भरले.

  गतवर्षीचा उत्साह यंदाही पहायला मिळाला.स्वप्निल जोशी,सोनाली कुलकर्णी ,कौशल इनामदार सारख्या सिने कलाकारांपासुन धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,सुप्रिया सुळे यांच्या सारख्या राजकारणींपर्यंत सर्वांना उत्साहाने सहभाग घेतला.

  नेहमी प्रमाणेच यंदाही #माझीकविता हा लोकप्रिय हॅशटॅग होता.वेगवेगळ्या विषयांवरील कविता संमेलनात वाचायला मिळाल्या . ट्विटरकरांनी आपले छंद ,कथा,कविता,पाककृती,मराठी साहित्य ह्या आणि अशा अनेक विषयांवर मराठीतून ट्विटरवर लिहिले.मराठीतुन लिहण्यासाठी एक कारण मिळावं म्हणुनच तर हा संमेलन उद्योग थाटला आहे,ट्विटरकरांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले.

  मराठी शाळेतील आपले अनुभव,महाराष्ट्रातील बोलीभाषा,मराठीसाठी तंत्रज्ञान या विषयांवरही मौलीक चर्चा झाली.यंदाच्या संमेलनात ट्विटर व्याख्यानाचा प्रयोग झाला.मराठी भाषेशी संबंधी अनेक विषयांवर व्याख्याने झाले.संमेलनाला यंदा मिळालेले बौद्धिक अधिष्ठान हे ट्विट व्याख्यानाचेच फळ आहे,हे आम्ही आनंदाने नमूद करू इच्छितो.

  मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर तिला कुठल्याही माध्यमाचे वावडे असण्याचे कारण,ट्विटर संमेलनामुळे ट्विटरचे माध्यम मराठीमय होण्यासाठी हातभार लागेल ही अपेक्षा करतो.

  ईबु पब्लिकेशन्सचे शैलेश खडतरे संमेलनात आलेल्या साहित्याचे ई-पुस्तक करत आहेत,त्यांचे व त्यांच्या चमूचे विशेष आभार. पुढील संमेलनातही तुमचे पाठबळ मिळाले तर संमेलन यशाची अधिक उंची गाठेल यात शंका नाही.

  आभार,

  आयोजक
  स्वप्निल शिंगोटे
  @MarathiWord

 • स्वप्नांचे ऋण- मधुसुत (दीपक कांबळी)

  Sale! 170.00 150.00
 • हसा लेको

  Sale! 60.00 40.00

  मुकेश माचकर
  ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये मुकुंद शिरगावकर, पंचम, मुन्ना, बित्तमबाज, अनंत फंदी आदी अनेक नावांनी विविध विषयांवर सदरलेखन केल्यानंतर मुकेश माचकर यांनी ‘हसा लेको’ या हास्यकथांच्या दैनिक सदरासाठी मामंजी हे टोपणनाव घेतलं आणि ते कालनिर्णयच्या दिवाळी अंकातून गेली १६ वर्षं नियमित वाचायला मिळतं आहे.

  शैक्षणिक-व्यावसायिक कारकीर्द
  फर्गसन कॉलेज, पुणे येथून अर्थशास्त्राची पदवी
  पुणे विदय़ापीठाच्या वृत्तपत्रविद्या आणि संज्ञापन विभागातून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी
  मार्केट मिशनरीज या जाहिरात संस्थेत कॉपीरायटर
  1993पासून पत्रकारितेत कार्यरत.
  केसरीमध्ये उपसंपादकपदापासून सुरुवात.
  महाराष्ट्र टाइम्समध्ये १५ वर्षांच्या कारकीर्दीत उपसंपादक, वार्ताहर, चित्रपट समीक्षक, मुख्य उपसंपादक, पुरवणी संपादक, सहायक संपादक ही पदे भूषविली.
  ‘प्रहार’ या दैनिकाची पायाभरणी करण्यात मोठा सहभाग. निवासी संपादक आणि सहयोगी संपादक
  ‘मी मराठी लाइव्ह’ या दैनिकाचे संपादक
  ‘बिगुल’ या महाराष्ट्रातल्या पहिल्या मत-पोर्टलचे संपादक.

  लेखन कारकीर्द
  वर्तमानपत्रांमध्ये चित्रपट, राजकीय-सामाजिक घडामोडींवर चौफेर लेखन
  ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या चित्रपट परीक्षणांमधून महाराष्ट्रभर निर्माण झालेली ओळख
  ‘मामंजी’ या नावाने हास्यकथांचे लोकप्रिय स्तंभलेखन
  राजकीय, सामाजिक विषयांचा तिरकस वेध घेणारी लेखणी.
  सोशल मीडियावर सजग वावर.
  फेसबुकसारख्या माध्यमातील लेखनाच्या क्षमता जोखण्यासाठी धक्कथा आणि दृष्टांतकथांचं लेखन
  ई-लिट या प्रकाशनसंस्थेच्या माध्यमातून ई-प्रकाशनात प्रवेश

  पुस्तकसंपदा
  ‘हसा लेको’ हा हास्यकथा संग्रह,
  ‘काय म्हणता राव’ हा अनवट म्हणींच्या माध्यमातून सामाजिक संदर्भांचा वेध घेणारा संग्रह,
  ‘आर. डी. बर्मन जीवन-संगीत’ हा राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सांगितिक चरित्राचा अनुवाद
  ‘अक्कलझाड’ हा दृष्टांतकथांचा पुस्तकसंच

Showing 71–78 of 78 results