मराठी

Showing 31–40 of 78 results

 • टॉलस्टॉयचे कन्फेशन- श्रीनिवास जोशी

  Sale! 200.00 150.00
 • ट्विटरसंमेलन स्मरणिका २०१९

  भाषा वापरल्याने वाढते ह्या एका तत्वावर ट्विटरसंमेलन चालते.ट्विटरवरील मराठी जणांना मराठी भाषा वापरण्याची संधी देणे आणि त्यातून त्यांच्या कला गुणांना वाव देणे हे संमेलनाचे उद्धिष्ट आहे.संमेलन तीन दिवस भरते आणि ट्विटर मराठीमय होवून जाते. कुणी कविता लिहतं, कुणी कथा लिहतं, तर कुणी आपले अनुभव शेअर करतं. स्वतः व्यक्त होणं तर संमेलनामुळे होतंच परंतु दुसरीही मंडळी काहीतरी लिहित असतात, त्यांचे अनुभव वाचल्याने नकळत आपणही समृद्ध होत जातो. विचारांच्या ह्या घुसळनीनेच अमृत सापडतं. दर वर्षी संमेलनात असेच हीरे सापडतात.

  ट्विटर संमेलन म्हणजे मुक्त व्यासपीठ, आपले विचार, साहित्य हजारो लोकांपर्यंत पोहचवण्याची संधी हे समीकरण सलग चौथ्या वर्षी सिद्ध झाले. ट्विटरकरांनी मनसोक्त कविता केल्या. सर्व बारा हॅश टॅग वापरलेले ट्विट संमेलनात दिसले.

  नेहमी प्रमाणेच यंदाही #माझीकविता हा लोकप्रिय हॅशटॅग होता.वेगवेगळ्या विषयांवरील कविता संमेलनात वाचायला मिळाल्या. ट्विटरकरांनी आपले छंद ,कथा,कविता सर्वांशी शेअर केल्या.

  पाककृती,मराठी साहित्य ह्या आणि अशा अनेक विषयांवर मराठीतून ट्विटरवर लिहिले.मराठीतुन लिहण्यासाठी एक कारण मिळावं म्हणुनच तर हा संमेलन उद्योग थाटला आहे,ट्विटरकरांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले.

  मराठी शाळेतील आपले अनुभव,महाराष्ट्रातील बोलीभाषा,मराठीसाठी तंत्रज्ञान या विषयांवरही मौलीक चर्चा झाली.यंदाच्या संमेलनात गेल्या वर्षी प्रमाणे ट्विटर व्याख्यानाचा प्रयोग झाला.मराठी भाषेशी संबंधी अनेक विषयांवर व्याख्याने झाली. संमेलनाला मिळालेले बौद्धिक अधिष्ठान हे ट्विट व्याख्यानाचेच फळ आहे,हे आम्ही आनंदाने नमूद करू इच्छितो.

  ट्विटर संमेलनासारखे उपक्रम होणे ही काळाची गरज आहे, त्यामुळे तरुण पिढीला आत्मविश्वासाने मराठी वापरण्याची संधी मिळेल. मराठी ही एक ‘कूल’ भाषा आहे आणि ती वापरणे आम्हाला आवडते अशी मानसिकता तरूण पिढीची घडणे अशा उपक्रमांमधून साध्य होते.

  Bronato चे शैलेश खडतरे संमेलनात आलेल्या साहित्याचे किंडल ई-पुस्तक करत आहेत, त्यांचे व त्यांच्या चमूचे विशेष आभार. पुढील संमेलनातही ट्विटरकरांचे पाठबळ मिळाले तर संमेलन यशाची अधिक उंची गाठेल यात शंका नाही.

  आभार,

  आयोजक
  स्वप्निल शिंगोटे
  ट्विटर: @MarathiWord

 • तलवारीच्या पात्यावर थरथरणारे फुलपाखरू- भगवान निळे

  Sale! 60.00 50.00

  गेली अडतीस- चाळीस वर्षांपासून मी सातत्याने कविता लिहितो आहे. कवितेनं मला नाव, प्रसिद्धी, महाराष्ट्र आणि राज्याबाहेर असंख्य मित्र – मैत्रिणी दिल्या. विशेष म्हणजे, माणूस म्हणून घडविण्यास कवितेनं मला खरोखर हात दिला. स्वतःशीच बोलण्याची, स्वतःवर रागावण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःशीच लढण्याची प्रेरणा मला कवितेनं दिली. कवितेमुळेच मी स्वतःला दुरुस्त करू शकलो.माझ्या आयुष्यात कविता आली नसती तर माझं जीवन पातळ आणि अळणी झालं असतं हे कबूल करायला मला कसलीही कमीपणा वाटत नाही.
  “सांगायलाच हवंय, असं नाही” या 2015 साली ‘ सृजन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या माझ्या पहिल्याच काव्यसंग्रहाला आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे जवळ जवळ पंधरा पुरस्कार मिळाले आहेत. या संग्रहाची ” श्री भैरी भवानी प्रकाशन’ ने दुसरी आवृत्तीही काढली.
  या संग्रहानंतर दुसऱ्याच वर्षी “एका कवीच्या दुःखाचे भाषांतर” या शीर्षकाचे काव्यनाट्याचे पुस्तकही प्रकाशित झाले. पुण्याच्या “संवेदना प्रकाशन”ने ते प्रकाशित केले. या पुस्तकाचीही बऱ्यापैकी चर्चा झाली. पुस्तकावर अभिवाचनाचे जाहीर कार्यक्रमही झाले.
  त्यानंतर 2017 साली ” तलवारीच्या पात्यावर थरथरणारे फुलपाखरू” या दीर्घ कवितेचे छोटेखानी पुस्तक प्रकाशित झाले.
  ही पुस्तके प्रकाशित होण्यापूर्वी मी पाच पुस्तकांचेही संपादन केले होते. आता ” चोळामोळा काळाचा आंधळा डोळा” “त्रेपन्न” “आरस्पानी डोळ्यातील बाईपणाचा सुरमा” “अनुक्रमणिका नसलेलं आयुष्य” व “गाळलेल्या जागी भरलेले शब्द” हे काव्यसंग्रह येऊ घातले आहेत.
  विशेष म्हणजे, जग खूप झपाट्यानं बदलत चाललं आहे. विकसित माहिती तंत्रज्ञानानं सारं विश्व खूप जवळ आलं आहे. संपूर्ण जग एक कुटुंबं बनत चाललं आहे. या झपाट्यानं बदलत चाललेल्या जगासोबत आपण चाललो नाही तर आपण खूप मागे पडू ही रास्त धारणा होऊन बसली आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम असल्यानं या बदलाला सामोरं जाणं सगळ्यांनाच भाग पडत आहे. जगभर आमूलाग्र क्रान्ति घडत आहे. येणारी नवी नवी प्रसार माध्यमं आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. ” जुनं ते सोनं ” असलं तरी नवं हे हिऱ्यासारखं बहुमूल्य असू शकतं हेही समजून घ्यायला हवं.
  सांगायचा मुद्दा हा की, माझ्या प्रकाशित तीनही पुस्तकांची आता ईपुस्तकं आली आहेत. शैलेश खडतरे या हुन्नरी मित्रानं जेंव्हा माझी पुस्तकं ईपुस्तक स्वरूपात काढण्याची कल्पना सविस्तरपणे माझ्यासमोर मांडली तेंव्हा मला नकार देणं जीवावर आलं. कारण त्यानं चर्चेत त्याच्या संस्थेबद्दल जे काही सविस्तरपणे, मनमोकळे, कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं. Bronato ही शैलेश आणि त्याच्या टीमची संस्था असून अल्पावधीतच ती लोकमान्य आणि परिचित झाली आहे. या संस्थेचा प्रचार आणि प्रसार झपाट्यानं वाढतो आहे. ईपुस्तक प्रकाशक, वितरक असलेल्या Bronato तर्फे माझी पुस्तकं किंडल व गुगल प्ले बुक्सवर झळकली याचा मला मनापासून आनंद झालेला आहे. या संस्थेतर्फे मराठी साहित्यातील उत्तमोत्तम पुस्तकं किंडलवर प्रकाशित व्हावीत आणि मराठी भाषेचा झेंडा जगभर लहरत राहावा, अशी मंगल कामना मी व्यक्त करतो.
  – भगवान निळे

 • तिसरी घंटा- डॉ विजया वाड

  Sale! 200.00 150.00

  प्रिय वाचकहो,
  सस्नेह नमस्कार!
  ‘तिसरी घंटा’ हे पुस्तक अनेक कथुल्यांनी सजले आहे. कित्येकदा तुम्हाला ते आपल्याच घरात घडलेले प्रसंग वाटतील. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक हे तुमच्या घरातील ठेवणीचे जाळीदार पिंपळपान आहे. त्यांच्या व्यथा, आशा, आकांक्षा घरच्यांशी निगडित आहेत. तुमच्या सुख-दुःखांशी त्यांचे जवळचे नाते आहे. माझी सर्व तरुण मुला-नातवंडांना खूप प्रेमळ नि आग्रहाची विनंती आहे की, मरण स्वाधीन नसलेल्या हतबल म्हाताऱ्या खोडांना केरपोतेऱ्यासारखे वागवू नका. त्यांना हवीय घोटभर माणुसकी, ओंजळभर जिव्हाळा नि दोन गोड प्रेमाचे शब्द! द्याल ना एवढे?
  मित्रांनो, ‘संध्याछाया भिवविति हृदया’ ह्याऐवजी ‘संध्याछाया जमविती माया, ज्यांच्यासाठी झिजविली काया, त्यांचे प्रेम मिळावे राया’… असे मला मनापासून वाटते. ‘नवशक्ती’तून हेच विचार मी सातत्याने मांडत आले.
  आसावरी जोशी ह्या तरुण, ममताळू, कल्पक मुलीने ते फार सुंदर चित्रांसह पेश केले. तिची आणि ‘नवशक्ती’ परिवाराची मी ऋणी आहे. अशोक कुलकर्णी, कल्पना परब, तेजस्विनी जोशी प्रत्येक रविवारच्या कथेचे सुरेख रसग्रहण करीत. त्यांच्या ऋणात राहणे मी पसंत करेन.
  एक सांगू? आयुष्य एकदाच मिळतं. मग ते शेवटच्या श्वासापर्यंत असोशीने जगावे. त्यातच मनुष्यजन्माचे सार्थक आहे.
  कुठे तरी राग, लोभ सोडून द्यायचा बिंदू आयुष्यरेषेवर असावा. ज्येष्ठ नागरिकांनी मायेच्या शाली अंतरीच्या पेटीतून काढून आपल्या माणसांवर पांघराव्यात. तिसरी घंटा वाजतेय. ती सांगते आहे…
  ‘आता सोडुनि दे जळूकरपणा
  दे सोडुनी वसवस
  आता जवळ करी क्षमाशीलपणा
  मायेचि दे खसखस
  येई दिवस नवा, नवीन किरणे
  देती नवी कामना
  तूही जा विसरोनी कटुता
  सोपा करी सामना’
  आपल्या आयुष्यमंचावरील या तिसऱ्या खेळीसाठी माझ्या खूप शुभेच्छा व प्रेम.
  – डॉ. विजया वाड

 • थवा

 • दिल से…संग्रह स्पंदनांचा- अमरजीत आमले

  Sale! 250.00 200.00

  मनात येणारे विचार, खोलवर दडून राहिलेला भावनांचा उद्रेक, भवताल अनुभवत असताना निरंतर जाणवणारी असहायता, प्रतिक्षण विदीर्ण होत जाणारी सत्यमेव जयते ची ललकार आणि त्याच क्षणी या सगळ्यांशी समरस होत असताना स्वतःशी उलगडत गेलेलो मी..
  प्रत्येक लेखागणिक मी स्वतःला नव्यानं जाणून घेत होतो.. जाणिवेतुन नेणिवेच्या पातळीवर प्रवास करत असताना, शब्दांचे मूल्य, त्याचं शाश्वत रूप सतत जिवंत ठेवत होतं मला.. नश्वर देहापेक्षा शब्दांचे चिरंतन रूप अमरत्वाचं सामर्थ्य देत होतं मला.. आणि अस्वस्थ वर्तमानाचा दाहक वास्तव प्रखर समाजभान देत होतं मला..
  संवेदना बोथट झाल्या की वेदना नाहीशा होतात, स्पंदनं थांबतात आणि मृत आत्मा घेऊन माणसं जिवंत असल्याचा आभास निर्माण करतात.. स्वतःभोवती ती जगत असतात लौकिक अर्थाने.. उपभोगत असतात सगळ्या लालसा.. मिरवत असतात त्यांचा क्रूरपणा कलेच्या मुखवट्याआड.. निरागसतेचा बळी देऊन ही मंडळी अखंड प्रज्वलित ठेवत असतात स्वतःचा वखवखलेला अहम रुपी यज्ञ..
  पण कधी ना कधी ज्वाला थंड होतात आणि या निरागसतेच्या राखेतूनच उभं रहातं माणुसकीचं अधिष्ठान. लागते चाहूल उद्याच्या उन्नत उज्वल भविष्याची… आणि त्या क्षणी डोळे भरून येतात… कृतार्थतेची भावना उचंबळून येते.. माणूस असण्याचा सार्थ अभिमान चराचरात ओसंडून वाहू लागतो.
  या जाणीवा प्रवाही असतात, त्यांना साठवावे असे वाटते आणि त्यांना बांध घालणे शक्य हि नसते. म्हणून मग मनात प्रफुल्लीत झालेल्या भावना आणि वेदना माणसाने शब्दांच्या रूपाने साठवल्या. माझे देखील तसेच झाले.
  सकाळ दैनिकात आलेले माझे लेख संकलित करून एकत्रितपणे ईपुस्तक स्वरुपात तुमच्या समोर ठेवताना मला आनंद होतो आहे. आपल्यातील भावनानुबंध अजून दृढ व सशक्त होतील अशीच कामना करतो.
  -अमरजीत आमले

 • दुर्गयात्री

  Sale! 250.00 118.00

  मला आठवते नवीन कोरे पुस्तक हातात आले की त्याचा सुगंध नाकात घामघमायचा आणि मगच पुढची पाने चाळायला सुरुवात व्हायची. पण आता सारे चित्र बदलले आहे. एकविसाव्या शतकात आधुनिक तंत्रज्ञान सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवतते आहे. या स्थित्यंतरास पुस्तकेही अपवाद नाहीत. आज स्मार्टफोनवर हाताळणाऱ्या प्रत्येकाला एका टिचकीसरशी असंख्य पुस्तके हाताळता येत आहेत.

  या बदलत्या काळानुसार आपणही बदलावे म्हणून ईपुस्तकांचा विचार मनात घोळत होताच. माझी ‘दुर्गलेणी – दिव, दमन, गोवा, ‘महाराष्ट्रातील विरगळ’ ही दोन पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद करायचे ठरविल्यावर माझे तरुण मित्र ‘शैलेश खडतरे’ यांनी ईपुस्तकांची सरसता व सहजता पटवून दिली.  तसेच एकदा ईपुस्तक काढल्यावर प्रत्येक वेळी प्रिंटची नवीन प्रत काढताना येणारा खर्च तर  वाचेलच शिवाय वितरणाची धावपळ देखील वाचवता येते हा मुद्दा मला पूर्णपणे पटला. माझ्या या दोन पुस्तकांचा इंग्रजी अनुवाद व तिसरे पुस्तक ‘दुर्गयात्री’ अशी तीन ही पुस्तकांची ई-आवृत्ती काढण्याचे शैलेश ने मनावर घेतले. ब्रोनॅटो.कॉम ने अप्लावधीत ही पुस्तके तयार केली. आता माझी पुस्तके भारतातच नव्हे तर जगभरातील वाचकांना उपलब्ध होतील याचे मला समाधान आहे.

  मला आशा आहे की इतिहासप्रेमी या ईआवृत्त्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करतील.

  – सदाशिव टेटविलकर

 • नात्यांचा रिचार्ज- साईनाथ टांककर

  Sale! 270.00 230.00
 • निद्रानाशाची रोजनिशी

 • पण: महाराष्ट्रदिन विशेषांक

Showing 31–40 of 78 results