मराठी

Showing 21–30 of 93 results

 • कॉलगर्ल- सत्यजित कबीर

  Rated 5.00 out of 5
  Sale! 150.00 100.00

  आज ‘कॉलगर्ल’ प्रकाशित होत असताना मनात वचन पूर्ण केल्याचं समाधान आहे. लेखनाच्या विषयापासून ते पुस्तकाच्या शीर्षकापर्यंत सगळ्या गोष्टींवर प्रश्न विचारले जात आहेत, पुढेही विचारले जातील. ‘कॉलगर्ल’ऐवजी दुसरं शीर्षक देता आलं असतं, पण मलाच ते पटत नव्हतं. जेनी आणि यश माझ्या आयुष्यातील जिवंत व्यक्तिमत्त्व. जेनी नेहमी म्हणायची, “समोरच्याला आपला भूतकाळ माहीत असला की खोटं वागावं लागत नाही, काही लपवायची गरज नसते त्यामुळे बिनधास्त जगता येतं.” जेनीचं हे तत्वज्ञान मला पटतं म्हणून या कथेचं नाव ‘कॉलगर्ल’.
  जेनी आणि यश या कथेतील नायक नायिका आहेत. यश पेट्रोकेमिकल इंजिनिअर तर जेनी कॉलगर्ल.
  जर मी लेखक झालो तर जेनीवर नक्की लिहीन असं मी वचन दिलं होतं, ते पूर्ण झाल्याचं समाधान आहे. जेनीला पाहिल्यावर मला अंगराज महारथी कर्णाची आठवण यायची. अंगराज कर्ण हा खरा सुर्यपूत्र पण आयुष्यभर सुतपुत्र म्हणून हिणवला गेला. कर्णाचं कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व असामान्य होतं. परिस्थिती अनुकूल असती तर कर्ण चक्रवर्ती सम्राट झाला असता. कौरवांचा राजदंड त्याने मानाने मिरवला असता, पण नियतीच्या फटकाऱ्याने त्याच्या हाती घोड्याचा लगाम दिला. कर्ण कधी झुकला नाही आयुष्यभर स्वतःच्या अटींवर स्वाभिमानाने जगला. कर्णाच्या शरीरावर कवचकुंडले होती. कोणतेही शस्त्र त्याला भेदू शकले नाही. जेनीच्या मनावर तीच कवचकुंडले होती. अमर्याद दुःख, अनेक अपमान, अवहेलना, तुच्छता तिच्या वाट्याला आली. पण तिच्या जगण्याच्या इच्छेला कोणी भेदू शकले नाही. नियती अनुकूल असती तर जेनी ध्रुवताऱ्याप्रमाणे अढळपदी गेली असती. पण परिस्थतीमुळे तिला ‘कॉलगर्ल’ बनावं लागलं. तरीही ती कायम स्वतःच्या अटींवर स्वाभिमानाने जगली.
  जेनी मला लोहाराच्या ऐरणीसारखी वाटते. लोहार ऐरणीवर आगीत तापून रसरशीत झालेलं लोखंड ठेवतो, त्यावर घणाने, हतोड्याने वार करतो. त्याचा प्रत्येक वार ऐरण मुकाट्याने सहन करते. ऐरणीने तक्रार केली किंवा घणाच्या घावाने ऐरण भंगली असं मी कधी ऐकलं नाही. एकवेळ वार करून लोहार थकतो पण ऐरण साध्वी प्रमाणे शांत, स्थितप्रज्ञ असते.
  जेनीला मी कधीच दुःखी, कष्टी निराश बघितलं नाही. तिच्यावर अनेकदा विचत्र जीवघेणे भयानक प्रसंग ओढवले आहेत. त्या घटना माझ्या कानावर आल्या की मी अनेकदा शहारून गेलो आहे. पण जेनीच्या चेहऱ्यावर दुःखाची छटा मी पाहिली नाही. माझ्यासोबत माझं कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी सगळे आहेत. पण ‘का जगायचं?’ हा प्रश्न मला अनेकदा पडतो. जेनीसोबत तर कोणीच नव्हतं, एक काळ असा होता की तिची सावली सुद्धा तिचा तिरस्कार करायची. पण जेनी लढली, संकटांच्या छातीवर पाय रोवून उभी राहिली. ‘का जगायचं?’ या प्रश्नाचं उत्तर तिला फार पूर्वीच गवसलेलं असावं. भगवान कृष्णाने सांगितलेला कर्मयोग मी वाचण्याचा प्रयत्न केला पण तो मला जेनीच्या मुखातून समजला.
  आज जेनी शब्दरूपाने येत आहे. यातील शब्द माझे असले तरी यामागील प्रेरणा माझा मित्र वाय. एस. खिस्तीची आहे. वाय.एस.के ने तगादा लावला नसता तर ‘कॉलगर्ल’ पूर्णत्वास जायला आणखी दोन वर्ष लागली असती. त्यासोबतच वाय.एस.के चा मित्र ‘सत्यम विवेक मल्हार’ हा सर जे जे स्कुल ऑफ आर्टस् चा वारसदार. त्याने जेनीला मुखपृष्ठावर अत्यंत सुरेख पद्धतीने रेखाटले आहे. आणि शेवटी अत्यंत महत्वाची व्यक्ती म्हणजे आमचे प्रकाशक, ब्रोनॅटोचे शैलेश खडतरे. ‘ब्रोनॅटो’च्या अमूल्य सहकार्यानेच ‘कॉलगर्ल’ तुमच्यासमोर सादर होत आहे. या सर्वांचे मी आभार वगैरे मानणार नाही. कारण आत्ताच हा प्रवास सुरु झाला आहे. आणखी बरेच अंतर कापायचे आहे. आणि या प्रवासात हे सर्व नेहमीच माझ्या सोबत असणार आहेत.
  पाहिलं पुस्तक प्रकाशित होताना भीती किंवा हुरहूर वाटत नाहीये. प्रतिसाद कसा असेल याची तर अजिबात चिंता नाही. ‘परिणामांची चिंता भ्याड माणसाला असते असं म्हणतात’ परंतु जेनीसारख्या तळपणाऱ्या विद्यूलतेला मी शब्दबद्ध करू शकलो, तिला तुमच्या समोर सादर करताना माझी लेखणी डगमगली नाही. याचंच मला अपार समाधान आहे.
  आणखी काय लिहू? जेनी म्हणायची त्याप्रमाणे ‘न लिहिलेलं समजून घेण्याइतके तुम्ही समंजस आहात.’
  धन्यवाद
  सत्यजित कबीर

 • कोवळी पानगळ- किशोर सानप

  Sale! 250.00 200.00

  डॉ. अभय आणि राणी बंग, डॉ. प्रकाश आणि मंदा आमटे, डॉ. रवींद्र आणि स्मिता कोल्हे आणि कोवळी पानगळ सोसणाऱ्या आदिवासी कुपोषित बालकांना अर्पण

  एकविसाव्या शतकाच्या प्रारंभीच खुल्या जगात माणूस एक बाजारपेठ बनला. जग बदलले परंतु समाजाचे मुलभूत अन्नवस्त्रनिवाऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत. जात, धर्म, शिक्षण, शोषण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आदिवासींचे प्रश्न-कुपोषण,भाषा-प्रांताचे प्रश्न, दहशतवादाचे प्रश्न, सामान्य माणसांच्या जगण्याचे प्रश्न, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मूलतत्त्ववादातून निर्माण झालेल्या समस्या, भय आणि असुरक्षिततेचे प्रश्न आजही नव्या जगात-नव्या रुपात ठाण मांडून बसले आहेत. आपण सर्वच लॉक ह्या प्रश्नांशी रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग; अंतर्बाह्य जग आणि मनात लढत आहोत. ज्या मानवी समूहाला जगण्यापासून वंचित व्हावे लागते, अमानुषतेला बळी पडावे लागते; त्या भयप्रद अमानुष हादऱ्यांना साक्षीभूत असलेल्या समकालीन लेखकानं कोवळी पानगळ मधून कथेचा आकार दिला आहे.

 • खिडकी

  Sale! 150.00 118.00

  मी लिहिलेल्या ‘खिडकी’ या ललित पुस्तकाच्या ‘ईआवृत्ती’च्या निमित्ताने माझ्या वाचकांशी संवाद साधताना खूप आनंद होतोय.

  कालानुरूप होणाऱ्या चांगल्या बदलाला सामोरं जाणं हा माझ्या मते मानवधर्म असला पाहिजे. ‘वाचाल… तर वाचाल!’ असं माझ्या लहानपणी मोठी माणसं नेहमी सांगत. परंतु हल्ली मोबाईल, इंटरनेटच्या काळात वाचन संस्कृती कमी होताना जाणवत असताना ‘ई-पुस्तक’ ही नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे पुन्हा वळवेल अशी खात्री वाटते.

  ‘किंडल’ किंवा ‘गुगल प्ले बुक’ अॅपवर आता छान छान पुस्तके वाचायला मिळत आहेत.

  लेखकांसाठी तर पुस्तक प्रकाशनाचे हे जणू नवं दालन खुलं झालं आहे. पुस्तक छपाई करून प्रकाशन करण्याच्या खर्चापेक्षा ई-पुस्तक प्रकाशनाचा खर्च अत्यंत माफक आहे. शिवाय तुमचं पुस्तक जगभरात वाचनासाठी उपलब्ध होतं. मी याचं मनःपूर्वक स्वागत करतो.

  माझ्या ‘खिडकी’ हे ललित पुस्तक तुम्हाला ब्रोनॅटो डॉट कॉम या वेबसाईटने वाचनासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

  प्रदीप कबरे
  २६/१/२०१७

 • गाज- पल्लवी वढवेकर-बर्वे

  Sale! 150.00 120.00
 • गीतांजली अनुवाद

  Sale! 250.00 228.00
 • गुंजा

  Sale! 120.00 100.00
 • गोष्ट छोटी डोंगराएवढी- अरविंद जगताप

  200.00

  सगळ्याच गोष्टी दाद मागण्यासाठी सांगितल्या जात नसतात. काही गोष्टी आपल्या मनावर डोंगराएवढं ओझं वाटत असतात. कुणाला तरी सांगायला पाहिजे असं वाटतं. एकदा शुटींगच्या निमित्ताने एका गावात ड्रोन हवेत उडवला होता. गावकरी जमा झाले होते. कुतुहल म्हणून त्यातला एक माणूस म्हणाला, “किती दिवस झाले राव वर बघून! आभाळाकडे बघणंच सुटलं होतं.” धक्का बसला ऐकून. माणसं वर बघायचेच विसरून गेलेत काही ठिकाणी. आग ओकणारा सूर्य असतो खुपदा वर. तेंडूलकर जेवढा कौतुकाने वर आकाशाकडे बघत उतरायचा ना तेवढ्या कौतुकाने बळीराजा वर बघत शेतात जायला हवा. ऐकायला साधी वाटते ही अपेक्षा पण खूप अवघड आहे. गावोगाव अशाच गोष्टी आहेत.
  प्रत्येक शेतकऱ्याची गोष्ट छोटी वाटते पण असते डोंगराएवढी
  – अरविंद जगताप 

 • घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ- श्रीनिवास जोशी

 • चंद्रकांत- विनय बहुलेकर

  Sale! 120.00 101.00
 • चल बस एक राऊंड मारून येऊ- सुहास मळेकर

  Sale! 200.00 150.00

  माझ्या ‘चल बस, एक राऊंड मारून येऊ!’ या कथासंग्रहाचं १७ मार्च २०१९ ला प्रकाशन झालं आणि महिनाभराच्या कालावधीतच पाचशे पुस्तकांची पहिली आवृत्ती दणक्यात संपली.

  फोटोग्राफी व्यवसायानिमित्त होणाऱ्या भटकंतीतून टिपलेले अनुभव कथेच्या स्वरूपात वाचकांसमोर ठेवण्याचा मी केलेला हा प्रयत्न सर्वांच्या पसंतीस उतरला, याचं समाधान निश्चितच आहे.

  संवेदना प्रकाशनामार्फत पुस्तकांचं वितरण होतच राहील, नव्या आवृत्याही निघतील, मात्र पुस्तकाची मागणी वाढल्यानंतर पुस्तक लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचवणं हे प्रकाशकाच्या सोबतीने माझंही काम आहे, असे मी मानतो. अशा वेळेस देश-विदेशातल्या वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी ‘ई-बुक’ या नवीन तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचं ठरवलं आणि त्यासाठी सुप्रसिध्द ‘ब्रोनॅटो’ या ई-प्रकाशनसंस्थेची मी निवड केली. ब्रोनॅटोने आजपावेतो अनेक पुस्तके या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवली आहेत आणि ऑनलाईन वाचनाचा आनंद तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्या वाचकांना मिळवून दिला आहे. वाचक आणि लेखक यांच्यातलं अंतर अशा नव्या पध्दतीने कमी होणं आजच्या नेटयुगात गरजेचंच आहे.

  माझं हे पहिलं पुस्तक या नव्या रूपात तुमच्या हाती देताना खूप आनंद होत आहे. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा!

  – सुहास मळेकर
  १७ एप्रिल २०१९

Showing 21–30 of 93 results