मराठी
Showing 11–20 of 93 results
-
आम्ही शहाणे पेडगावचे- विनय बहुलेकर
Sale!₹299.00₹249.00 -
आरसे
₹100.00 -
आरास
₹60.00निष्ठापूर्वक लेखन करणाऱ्या साहित्यिकाची साहित्य निर्मिती ही सुरुवातीला अस्वस्थ करणारी, साहित्याच्या रुपबंधासाठी, जडणी घडणीसाठी, मांडणीसाठी प्राथमिक चौकटीसाठीसतत विचार करायला लावणारी मानसिक वेदनांची प्रक्रिया असते. एकदा आपल्या कल्पनेतून हवं ते मनात नीट आकार घेऊ लागल्यावर मग मात्र निर्मितीचा आनंददायक कैफ वाट्याला येतो. ही निर्मिती घडत असतांना स्वान्त सुखाय असते. पण एकदा पूर्ण झाल्यावर वाचकांच्या पसंतीचे वेध लागतात. कोणत्याही कलेची निर्मिती ही रसिकांशिवाय अपूर्ण असते. आपलं पुस्तक खूप वाचकांपर्यंत पोहोचावं त्यांच्याकडून आवडल्याची पोच पावती मिळावी असं प्रत्येक लेखकाला वाटतं. पण मुद्रण माध्यमाची प्रत्यक्ष मुद्रित पुस्तकांची काही बलस्थानं असतात तशाच काही कमजोर बाबी असतात. मुद्रित साहित्य काही काळाने जुनं होऊन पानं फाटू लागतात. घरातील एकंदर जागेत पुस्तकांचा साठा करण्यास जागेची मर्यादा येते. पुस्तकं कुठे न्यायची म्हटलं तरी ती सर्वत्र पोहोचत नाहीत. वजन फार असतं.
मात्र एकविसाव्या शतकात विद्युत माध्यम विस्तारल्यावर ह्या सर्व मुद्रित माध्यमातील कमतरता नाहीशा झाल्या. पुस्तक निर्मितीचा आवाक्यात आला. आज ‘ब्रोनॅटो’ ईपुस्तकांच्या माध्यमातून जगभर पुस्तकांचे वितरण करते. साहित्याचे वाचक कैक पटींनी वाढतात. पुस्तकांची साठवण करणं शक्य होतं. कारण अगदी कमी जागेत अनेक पुस्तकं मावतात. ह्या सर्वांचा विचार करता मलाही माझी पुस्तकं या माध्यमातून सर्वत्र पोहोचावी असं वाटलं. ‘ब्रोनॅटो’चे शैलेश खडतरे यांच्याशी बोलणं झाल्यावर मी निश्चिंत मनाने माझी पुस्तकं त्यांच्या हाती दिली. मराठी वाड्मयाचा एकूण प्रचार प्रसार विद्युत माध्यमातून नक्कीच वाढणार आहे. ‘ब्रोनॅटो’च्या प्रयत्नशीलतेला आणि कार्याला मनापासून शुभेच्छा.
माधवी कुंटे
-
एक प्रियदर्शिनी भेट
Sale!₹200.00₹115.00दृष्टीकोन! आयुष्य जगणं हे सर्वस्वी आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असतं. जर आपला जीवनाकडं पाहण्याचा दृष्टीकोन मर्यादीत असेल तर आपल्याला आयुष्यदेखिल मर्यादीत स्वरूपातच दिसतं. पण जर आपण जीवनातील दृष्टीकोन विशाल केला तर आपल्या आयुष्याला एक नविन विस्तारीत आयाम मिळतो. जीवनाकडं विशाल दृष्टीकोनातून पाहून आपण भरभरून आयुष्य जगावं हीच तर ‘माईंड ट्रान्सफॉर्मर’ सुरू करण्यामागची मूळ प्रेरणा होती. “आपलं मन ही केवळ एक स्मृती आहे आणि आपण आपल्या तिचं कशाप्रकारे आकलन करतो आणि अंमलात आणतो हा खरा समंजसपणा आहे.” यावर माझा विश्वास आहे.
माझं आयुष्य नेहमीच अस्थिर आणि आव्हानात्मक राहिलं आहे. आणि त्यामुळंच मला माझ्या श्रद्धांबद्दल, दृष्टीकोनांबद्दल स्वत:लाच प्रश्न करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. का? आणि कसं? या प्रश्नांची उत्तरं शोधत असतानाच मी आयुष्यातील मूलतत्वांचा धांडोळा घ्यायला सुरूवात केली. मी माझ्या जीवनातील समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी आयुष्याकडं नव्या दृष्टीकोनातून पहायला सुरूवात केली. सुमारे ३ वर्षांपूर्वी मला मूत्रपिंडाच्या दुर्मिळ आजाराचं निदान झालं आणि तिथूनच माझ्या आयुष्यातील संकटांच्या मालिकेला सुरूवात झाली. हा असा आजार होता जो १ कोटी लोकांमध्ये केवळ एखाद्याच व्यक्तीला होतो. अचानक एके दिवशी या आजाराचं निदान झालं आणि क्षणार्धात माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. मला माझी सिंगापूरमधली नोकरी सोडून उपचारांसाठी भारतात परतावं लागलं. त्यानंतरचे बरेचसे दिवस माझ्यासाठी आव्हानात्मक होते. कधी सकाळीच माझी हाडं आखडल्यासारखं व्हायचं तर काहीवेळा मला मळमळ आणि उलट्या व्हायच्या. कधी भयंकर तोंड यायचं तर कधी संसर्गामुळं भयंकर ताप यायचा, कधीकधी तर अनेक अवयव असहकार पुकारायचे आणि माझी मूत्रपिंडं काम करायची बंद व्हायची. तर काहीवेळा मात्र माझी मूत्रपिंडं व्यवस्थित काम करायची. अशा संमिश्र अनुभवांमधून मी माझ्या आयुष्यात उगवलेल्या सर्वोत्तम दिवसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकले. मी जिवंत आहे केवळ याच गोष्टीबद्दल मी कृतज्ञ रहायला हवं अशी शिकवण मला मिळाली….
….मला अगदी प्रामाणिकपणे आशा वाटते की हा नवा दृष्टीकोन तुमच्या जीवनातील स्वातंत्र्य, परमानंद, समाधान, यश आणि प्रेम या सर्वांसाठी मार्गदर्शक प्रकाश बनून राहील. -
एक सांज… मैत्रीतली… प्रेमातली
Sale!₹170.00₹0.00 -
एका कवीच्या दुःखाचे भाषांतर- भगवान निळे
Sale!₹60.00₹50.00गेली अडतीस- चाळीस वर्षांपासून मी सातत्याने कविता लिहितो आहे. कवितेनं मला नाव, प्रसिद्धी, महाराष्ट्र आणि राज्याबाहेर असंख्य मित्र – मैत्रिणी दिल्या. विशेष म्हणजे, माणूस म्हणून घडविण्यास कवितेनं मला खरोखर हात दिला. स्वतःशीच बोलण्याची, स्वतःवर रागावण्याची, स्वतःवर प्रेम करण्याची आणि स्वतःशीच लढण्याची प्रेरणा मला कवितेनं दिली. कवितेमुळेच मी स्वतःला दुरुस्त करू शकलो.माझ्या आयुष्यात कविता आली नसती तर माझं जीवन पातळ आणि अळणी झालं असतं हे कबूल करायला मला कसलीही कमीपणा वाटत नाही.
“सांगायलाच हवंय, असं नाही” या 2015 साली ‘ सृजन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेल्या माझ्या पहिल्याच काव्यसंग्रहाला आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे जवळ जवळ पंधरा पुरस्कार मिळाले आहेत. या संग्रहाची ” श्री भैरी भवानी प्रकाशन’ ने दुसरी आवृत्तीही काढली.
या संग्रहानंतर दुसऱ्याच वर्षी “एका कवीच्या दुःखाचे भाषांतर” या शीर्षकाचे काव्यनाट्याचे पुस्तकही प्रकाशित झाले. पुण्याच्या “संवेदना प्रकाशन”ने ते प्रकाशित केले. या पुस्तकाचीही बऱ्यापैकी चर्चा झाली. पुस्तकावर अभिवाचनाचे जाहीर कार्यक्रमही झाले.
त्यानंतर 2017 साली ” तलवारीच्या पात्यावर थरथरणारे फुलपाखरू” या दीर्घ कवितेचे छोटेखानी पुस्तक प्रकाशित झाले.
ही पुस्तके प्रकाशित होण्यापूर्वी मी पाच पुस्तकांचेही संपादन केले होते. आता ” चोळामोळा काळाचा आंधळा डोळा” “त्रेपन्न” “आरस्पानी डोळ्यातील बाईपणाचा सुरमा” “अनुक्रमणिका नसलेलं आयुष्य” व “गाळलेल्या जागी भरलेले शब्द” हे काव्यसंग्रह येऊ घातले आहेत.
विशेष म्हणजे, जग खूप झपाट्यानं बदलत चाललं आहे. विकसित माहिती तंत्रज्ञानानं सारं विश्व खूप जवळ आलं आहे. संपूर्ण जग एक कुटुंबं बनत चाललं आहे. या झपाट्यानं बदलत चाललेल्या जगासोबत आपण चाललो नाही तर आपण खूप मागे पडू ही रास्त धारणा होऊन बसली आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम असल्यानं या बदलाला सामोरं जाणं सगळ्यांनाच भाग पडत आहे. जगभर आमूलाग्र क्रान्ति घडत आहे. येणारी नवी नवी प्रसार माध्यमं आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. ” जुनं ते सोनं ” असलं तरी नवं हे हिऱ्यासारखं बहुमूल्य असू शकतं हेही समजून घ्यायला हवं.
सांगायचा मुद्दा हा की, माझ्या प्रकाशित तीनही पुस्तकांची आता ईपुस्तकं आली आहेत. शैलेश खडतरे या हुन्नरी मित्रानं जेंव्हा माझी पुस्तकं ईपुस्तक स्वरूपात काढण्याची कल्पना सविस्तरपणे माझ्यासमोर मांडली तेंव्हा मला नकार देणं जीवावर आलं. कारण त्यानं चर्चेत त्याच्या संस्थेबद्दल जे काही सविस्तरपणे, मनमोकळे, कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं. Bronato ही शैलेश आणि त्याच्या टीमची संस्था असून अल्पावधीतच ती लोकमान्य आणि परिचित झाली आहे. या संस्थेचा प्रचार आणि प्रसार झपाट्यानं वाढतो आहे. ईपुस्तक प्रकाशक, वितरक असलेल्या Bronato तर्फे माझी पुस्तकं किंडल व गुगल प्ले बुक्सवर झळकली याचा मला मनापासून आनंद झालेला आहे. या संस्थेतर्फे मराठी साहित्यातील उत्तमोत्तम पुस्तकं किंडलवर प्रकाशित व्हावीत आणि मराठी भाषेचा झेंडा जगभर लहरत राहावा, अशी मंगल कामना मी व्यक्त करतो.
– भगवान निळे -
किमया
-
कुमुदिनी- संतोष ठाकूर (राजवाडे)
Sale!₹250.00₹200.00 -
कॉफी- मकरंद सावंत
Sale!₹200.00₹150.00मनोगत
संपूर्ण पुस्तकच मनातलं बरंच काही उतरवून घेणारं असलं की त्यातल्या मनोगताला मिठाई वरच्या चांदीच्या वर्खाची चव येऊ लागते. तो तिला कॉफी का म्हणतो आणि ती त्याला हनी का? या प्रश्नासाठी शब्दांची चव आणि गुणधर्म चाखून घ्यावे लागतील आणि प्रश्न विचारावे लागतील स्वतःच स्वतःला. कॉफी कशी असते? tempting, हवीहवीशी..
कॉफी नशा चढवते पण पाय घसरू देत नाही. ही त्याची कॉफी म्हणजे अगदी कुणीही असू शकते का? तर उत्तर आहे नाही. ती एकंच आहे म्हणून ‘कॉफी’ आहे. तसाच तिचा ‘हनी’ तो सुद्धा तितकाच exclusive. थोडासा तुरट, थोडासा गोड, आवडेलच असा नाही पण, तितकाच गरजेचा.
या कॉफी आणि हनी च्या गप्पा, एखाद्या कॉफी शॉप मध्ये त्या दोघांच्या बाजूला बसून ऐकल्या सारख्या आहेत. यातले आपण कधीकधी कॉफी होतो आणि समजून घेतो कधी हनी होत समजूत काढतो. कधी स्वतः मधली कॉफी शोधतो आणि हनी सापडू लागला की आपोआप ओठांवर येतो .
ही त्याने तिला पाठवलेली पत्रं तिच्या पर्यंत पोहोचली असतील, नसतील, कसलीच शाश्वती नाही. शाश्वत रहातं ते नातं.
सोबतीला नात्याचं नाव देता येतं पण नातं देताच येईल याची खात्री नाही. दोन दिशेला निघून गेलेल्या किंवा विरून गेलेल्या पानांवरची ही अर्धी मुर्धी कविता शब्दांचं ओझं होऊ न देता उतरत जाते खोलवर, अचानक कोणतं ही पान उलगडून आपण आपल्याच आयुष्याच्या एखाद्या वळणावर उभं रहातो जिथे आपली कॉफी किंवा हनी आपली वाट बघत असतो.
शब्दांच्या दरम्यान लिहिल्या गेलेल्या ओळी, आयुष्याला चव देवोत ही अपेक्षा.
– मकरंद -
कॉर्पोरेट कविता- प्रथमेश किशोर पाठक
₹150.00कविता लेखन कधी सुरू केलं ते आठवतं, कविता सुचणं नाही! आजही कविता सुचल्याचाच आनंद जास्त होतो. बाबांच्या रूपाने आणि त्यांच्या पुण्याईने अनेक जिवंत कविता वाचल्या, भेटल्या, आशीर्वाद देऊन गेल्या, मांडीवर खेळवून गेल्या. त्यासगळ्यांच्या प्रति मनोभावे वंदन करतो.
पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई गाठली आणि माझं आयुष्य आणि कविता बदलली. मला समुद्र भेटला, मी प्रेमात पडलो. मला लोकल भेटली, मी जिवंत होत गेलो. मी चकचकीत ऑफिसमध्ये बसून इ एम आय चुकवत आयुष्य घालवणाऱ्या माणसांमध्ये रमू लागलो, मी अस्वस्थ होत गेलो. ही अस्वस्थता कधी कधी बाहेर उमटते. माझ्यासारख्याच दोन पाच पिचलेल्या (पण शर्टाची ईस्त्री न मोडलेल्या) व्यक्तींना ती कविता आपलीशी वाटते, यात मला समाधान मिळतं. ह्या कवितांमध्ये बहुतेकवेळा दिसेल तुम्हाला एक अशी चकचकीत व्यक्ती जी समोरून असेल टापटीप आणि पाठीला शर्ट पूर्णपणे घामाने थिजलेला, पण तरीही परफ्युम लावल्याने दुर्गंध न येणारा. त्या सगळ्या व्हाईट कॉलर जॉब’ करणाऱ्यांच्या या कविता.
एक अखंड भांडण सुरू असतं डाव्या आणि उजव्या मेंदूत. माझ्या कविता त्याचेच मी पडसाद समजतो. तर्क आणि भावना यांची जुगलबंदी तटस्थपणे बघणं यात मौज असते.
या पुस्तकासाठी ज्यांनी मला भरभरून शुभेच्छा दिल्या आणि चार हिताच्या गोष्टी सांगितल्या अशा काहींचा उख अनिवार्य आहे. ‘ग्रंथाली’चे श्री. सुदेश हिंगलासपूरकर आणि त्यांचे सहकारी ज्यांनी हे सुंदर पुस्तक जुळवून आणलं, ज्येष्ठ चित्रकार श्री. श्रीधर अंभोरे (माझा अंभोरे काका), माझी पत्नी तेजस्विनी जिने सुंदर मुखपृष्ठ केले, ज्येष्ठ कवयित्री डॉ. सिसिलिया कार्डालो ज्यांच्या प्रस्तावनेने हा संग्रह अजून वाचनीय झाला आणि ज्येष्ठ कवी श्री. प्रशांत असनारे ज्यांनी माझ्यावरच्या प्रेमाखातर दिलेले शब्दाशीर्वाद संग्रहाच्या मलपृष्ठावर आहेत.
बाबा वाढदिवसाला म्हणत, ‘तुझ्यातली अस्वस्थता वृद्धिंगत होवो!’ हाच आशीर्वाद तुम्ही रसिकही मला द्याल ही आशा.
Showing 11–20 of 93 results