वैचारिक
Showing all 4 results
-
घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ- श्रीनिवास जोशी
-
जेपी’ज शो- जनार्दन पेडामकर
Sale!₹150.00₹100.00 -
टॉलस्टॉयचे कन्फेशन- श्रीनिवास जोशी
Sale!₹200.00₹150.00 -
यशपुष्प- डॉ. आशुतोष रारावीकर
Sale!₹150.00₹100.00मी लिहिलेल्या विचारपुष्पांचं हे पुस्तक आज आपल्यापुढे सादर करतांना मला विलक्षण आनंद होत आहे. सागरमंथनातून मोती निघाले असं म्हणतात. ह्या पुस्तकातील मोती माझ्या विचारमंथनातून वर आले आहेत. ते अंत:प्रेरणेतून स्फुरलेले आहेत, मुद्दाम बनवलेले नाहीत. विचार हा मोठा आनंद असतो आणि आनंदाची देवाणघेवाण तर झालीच पाहिजे. कारण तो दिल्याने वाढतो. याच उद्देशाने ह्या पुस्तकाचं सादरीकरण करतो आहे. हे वाचतांना प्रसन्नतेचे काही तरंग आणि तुषार जरी आपल्या चित्ती फुलले आणि काही स्मितरेषा आपल्या चेहेऱ्यावर उमटून गेल्या तरी त्याचं सार्थक झालं असं मी समजेन.
माझे वडील प्रा. डॉ. यशवंत रारावीकर हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ होते. ते सात्विकतेची आणि करुणेची मूर्तिमंत प्रतिमा होते. माझी आई प्रा. डॉ. सौ. अरुणा रारावीकर ही एक अध्यात्म मूर्ती, संस्कृततज्ज्ञ आणि साहित्यिक होती. ती साक्षात चालतीबोलती भगवद्गीता होती, शत-प्रतिशत सप्तशती होती. या जगात पाऊल टाकल्यानंतर तिनेच मला पहिल्यांदा बोलायला शिकवलं. माझ्या आई -दादांनी माझ्या जीवनाला ‘अर्थ’ही दिला आणि जीवनाचं ‘शास्त्र’ही शिकवलं. आयुष्याच्या अर्थशास्त्राची पारायणं मी त्याच्या कुशीत केली.अर्थशास्त्र हा माझा श्वास आहे तर अध्यात्म हा माझा प्राण आहे. इतकी वर्षे मी वडिलांची म्हणजे अर्थशास्त्राची भाषा बोललो. या पुस्तकातून आता मी आईची भाषा बोलतो आहे. माझ्या आई-वडिलांनी मला भाषा आणि विचार या दोन्हींची देणगी दिली. त्यांनी मला भाषा आणि जीवन या दोन्हींची शुद्धता शिकवली. आज हा छोटा ग्रंथोबा मी त्यांच्या चिरंतन स्मृतींना अर्पण करत आहे.
मी माझ्या आई-वडिलांच्या नावामागे कैलासवासी कधीही लावत नाही कारण माझ्या अंतकरणात त्यांचा सदैव वास असतो. पुस्तकावर एक औपचारिकता म्हणून लेखकाचा – म्हणजे माझा परिचय छापला गेला आहे. पण मी माझ्या आईवडिलांचा मुलगा आहे हीच माझी सर्वात मोठी ओळख. आणि तोच मला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार. माझ्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा. म्हणून या पुस्तकाचं नाव ‘यशपुष्प’.
लहानपणापासून आजोबा आणि शेजारी या दोन्ही नात्यांमधून कुसुमाग्रजांच्या प्रदीर्घ सहवासातून झालेला साहित्याचा परिसस्पर्श मला प्रकर्षाने आठवतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकल्यापासूनचे माझे दोन आध्यात्मिक भाग्यगुरू – गुरुवर्य परम पूजनीय श्री. नारायणकाका ढेकणे महाराज आणि माझे गुरुजी तसेच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्रजी (कुलपती, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान) यांच्या ईश्वरी छायेत सुरु झालेला माझा प्रवास आज एका विलक्षण वळणावर येऊन पोहोचला आहे. प्रसन्न चैतन्यमूर्ती आदरणीय विष्णूमहाराज पारनेरकर यांनाही माझी वंदना.
माझ्या वडिलांचे परममित्र आणि साहित्यपंढरीत विठोबाचं स्थान असलेल्या तसेच रामदास स्वामींच्या ‘उत्तम’ पुरुषलक्षणांमध्ये बसणाऱ्या पत्रमहर्षी उत्तमरावांनी प्रस्तावना लिहिली हा मोठा आनंद. माझी पत्नी वीणा हिची संसाराच्या मैफलीतली सुरेल साथ आणि चिरचैतन्य देणारा आमचा मुलगा मिहिर या माझ्या जीवनप्रवाहातल्या साथीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ब्रोनॅटो आणि किंडल, ज्यांच्यामुळे या कलाकृतीला सूर्यप्रकाश दिसला आहे, त्यांचे मन:पूर्वक आभार.ही माझी शब्दप्रार्थना आणि भाववंदना कुलस्वामिनी श्री यल्लम्माईच्या पवित्र चरणांवर कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो.
डॉ. आशुतोष रारावीकर
१६ जुलै, २०२०
मुंबई.
Showing all 4 results