लेखसंग्रह

Showing 11–19 of 19 results

 • मनातलं काही- नितीन साळुंखे

  Sale! 200.00 120.00

  ‘मनातलं काही’ हे माझं पहिलंच ई-बुक..! माझ्या मनात, त्या त्या वेळी एखादा प्रसंग अनुभवताना जे जे उलट-सुलट विचार आले, ते सांगणाऱ्या लेखांचं हे पुस्तक.
  गेल्या चार पांच वर्षातलं मी वेळोवेळी केलेलं लिखाणापैकी काही निवडक लेखन आता डिजिटल साहित्य क्षेत्रातील अग्रगण्य ‘ब्रोनॅटो’ तर्फे प्रसिद्ध होतं आहे, ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाचीही गोष्ट आहे. आनंदाची यासाठी की, ई-बुकच्या माध्यमातून आता माझं लेखन अधिक जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आणि अभिमान एवढ्यासाठी की, ‘ब्रोनॅटो’सारख्या प्रतिष्ठीत संस्थेला माझं ई-पुस्तक प्रकाशित करावसं वाटलं म्हणून..!
  आज पुस्तकं विकत घेऊन किंवा वाचनालयातून आणून वाचण्याचं प्रमाण कमी झालंय. याला अनेक कारणं आहेत व त्यापैकी एक म्हणजे तंत्रज्ञानाचा अविष्कार. आज आपल्या हातातला स्मार्ट फोन बसल्याजागी आपल्यासमोर जगातली हवी ती चीज काही सेकंदात हजर करत आहे. यात, अर्थातच, पुस्तकंही आलीच.
  आजच्या तरुणाईचं आयुष्य पूर्वीच्या मानाने खुपच जास्त व्यस्त झालंय. नोकरी-व्यवसायामुळे त्यांची भटकंतीही वाढलीय. जगही स्पर्धेच आहे आणि या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी आजच्या तरुण पिढीला सतत कार्यरत राहावं लागतं. यातून तिला स्वत:साठी खुप कमी वेळ उरतो, पण जो काही वेळ या पिढीला मिळतो, त्यातला बराचसा वेळ ही पिढी स्मार्टफोनवर आलेलं किंवा किंडल सारख्या मुद्दाम विकत घेतलेल्या उपकरणावर डाऊनलोड करुन घेदलेलं बरं-वाईट साहित्य वाचनात घालवत असते. म्हणजे ‘वाचन कमी झालेलं नाही, तर वाचनाचं माध्यम फक्त बदललंय’. वाचनाची भुक अजुनही आहे याचं हे लक्षण आहे. सोशल मिडीया, मोबाईल वरील विविध ऍप किंवा किंडलसारखी साधनं किंवा ई बुक ही साधनं पुस्तकांपेक्षा तुलनेने स्वस्त तर आहेतच, परंतु एकावेळी अनेक प्रकारची पुस्तक स्टोअर करण्याची सुविधा देणारीही आहेत. पुस्तक एका वेळी एकच वाचता येतं किंवा प्रवासात नेता येतं. तसं याचं नाही. या ईलेक्ट्राॅनिक माध्यमात असलेली अक्षरक्ष: शेकडो पुस्तकं, या उपकरणांच्या माध्यमातून खिशातून कुठेही घेऊन जाता येतात व आपल्या त्या त्या वेळच्या मूडप्रमाणे वाचता येतात. हा या माध्यमाचा फायदा.
  अशा या वाचनवेड्या मुलांना चांगल्या व सकस वाचनाची गोडी लागावी या उद्देशाने शैलेश खडतरे या तरुण तंत्रज्ञाने ‘ब्रोनॅटो’ ही ई-बुक प्रकाशन संस्था युरू केली आहे. आणि असा काही उद्देश घेऊन कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे आपलं पुस्तक प्रसिद्ध होतंय, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
  कोणत्याही गोष्टीच्या पहिलेपणा’चं कौतुक कुणालाही असतंच. ‘मनातलं काही’ हे माझं पहिलं ‘ई-बुक’..! मलाही याचं कौतुक आहेच. त्यात माझ्या पहिल्याच ई बुकाचं बाळंतपण जर शैलेश खडतरेंसारख्या निष्णात आणि सर्जनशील ‘सर्जन’च्या हातून होतंय, ह्यातं कौतुक मला अंमळ जास्तच वाटतंय..
  आपणही या माझ्या बाळाचं कौतुक कराल अशी अपेक्षा आहे.
  -नितीन साळुंखे

 • मनातली पत्रंं

  99.00

  जीवातून भेटलेल्या सर्वच सुहृदांना. नाती गोती, ओळख पार करून आपण भेटलो इथे. सोशल मीडियावर. काहीतरी छान करण्याच्या माझ्या कल्पनेला उचलून घेतलेले तुम्ही सारेच शिलेदार झालात. या कामाला खूप सुरेख वृत्तीची साथ लागते ती तुम्हा सर्वांकडे भरपूर आहे. एक से एक दुर्मिळ रत्ने या समूहात सुंदर नांदतात हे पाहणेच स्वर्गसुख देते.

  हे रेशमी ऋणानुबंध आता मनातली पत्रे. साकार करत आहेत. पुस्तक रूपात हे तयार होतच आहे शिवाय. हा उपक्रम ब्रोनॅटो डॉट कॉम तर्फे जगभर जाणार ई बुक माध्यमातून. नवोदितांना ही कायमची सुरेख आठवण होतेय जपायला आणि मुरलेल्यांना एक अधिक पुस्तक रूप. हे रूप चिरंतन राहील किंडल आणि गुगलवर. ही छान गोष्ट. नातेवाईक, ओळखीच्यांना मानाने देऊ शकाल असे एक प्रतीक साकार करू आणि गुंफत राहू. जाणिवांचे आकाश. शब्दांतून.

  भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे.

  तुमची
  संगीता शेंबेकर

 • माझे अंतरंग

  लेखकाच मनोगत 

  म्हणतात ना लोणचं जेवढ जुन तेवढ ते जास्त मुरत आणि जास्त चवदार होत. कदाचित लिखानाच्या बाबतीतही तसच असाव. २००३ पासुन लिखानाला सुरुवात केली. वही, डायरी,Orkut Community, ब्लॅाग, फेसबुक पेज, गृप असा प्रवास आता तब्बल १४ वर्षानंतर येवुन पोहोचलाय ई बुक पर्यंत. पहिल पुस्तक प्रकाशित करताना कल्पना नव्हती नेमक पुस्तक कस असावं, डिजाईन कशी तयार करावी. विषय अगोदरच ठरला होता दुर्गवीर प्रतिष्ठान सोबतचे दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन बाबतचे सर्व हसरे, हळवे, मनाला चटके देणारे सर्व अनुभव मांडायचे. समिर शिंदे सारख्या मित्राने डिजाईन पासुन प्रिंट पर्यंत सर्व जबाबदारी अंगावर घेतली त्यामुळे मला लिखान, संपादन या गोंष्टिंवर लक्ष देवु शकलो. ब-याच जुन्या गोष्टिंची उजळणी करुन नव्याने मांडल्या. नुसती पान वाढविण्यापेक्षा थोडक्यात मुद्दा मांडायचा होता. प्रत्येक लेखातुन फक्त मी व्यक्त होण आवश्यक नव्हत तर तर वाचकाला काहि ना कहि द्यायचा प्रयत्न होता. प्रत्येक लेखातुन एक तर खळखळुन हसवायच किंवा गडाची किंवा समाजातील व्यवस्था मांडुन जागरुकता निर्माण करायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक शब्द आजबाजुच्या घटनेला धरुन होता कुठेही अतिशयोक्ति नव्हती.

  जे जमल जितक जमल ते मांडल. उगाचच मोठ मोठ्या उपमांचा वापर करुन अलंकारीत पुस्तकापेक्षा जे मनात आल ते तुमच्या मनापर्यंत पोहोचविण्याचा माझा हा “चिंटुकला” प्रयत्न कसा वाटला ते नक्कि कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी एक शिकवण असेल पुढच्या माझ्या इतर विषयांवरील प्रयत्नांसाठी.
  धन्यवाद
  जय शिवराय

  धिरज विजय लोके (दुर्गवीर चा धिरु)

 • मुंबईतील आद्य शक्तिपीठे

  Sale! 150.00 100.00
 • मुंबईतील पुरातन शिवमंदिरे

  Sale! 150.00 100.00
 • रश प्रिंट- विनय बहुलेकर

  Sale! 201.00 151.00

  चित्रपट विश्वाच्या पार्श्वभूमीवर लिहीलेल्या माझ्या ह्या नव्या पुस्तकाचे नाव आहे ‘रश प्रिंट.’
  कुठलाही चित्रपट सलग चित्रित होत नाही. तो तुकड्या-तुकड्यांनी चित्रित होत असतो. चित्रपटातील एखाद्या सीनचा जरी विचार केला तरी तो सलग चित्रित होत नाही. कथेच्या प्रवाहातील काही नंतरचे शॉट्स आधी चित्रित होतात काही आधीचे शॉट्स नंतर … त्या नंतर चित्रित झालेले सर्व शॉट्स पटकथे बरहुकूम जोडतात. त्यावेळी त्यावर एडिटिंग, डबिंग आणि साऊंड मिक्सिंग आदी प्रक्रिया केल्या जातात व नंतर जी काही प्रिंट मिळते ती ‘फायनल प्रिंट’. त्यावरुन ‘मास्टर प्रिंट’ काढतात आणि त्यावरुन आणखी प्रती काढल्या जातात ज्या आपण सिनेमा गृहात चित्रपट रुपाने पहातो…
  परंतु चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्याच्या आगोदर चित्रित झालेले हे शॉट्स, ज्यांना कुठलाही सिक्वेन्स नसतो आणि ज्याच्यावरुन चित्रपटाचे कथानक समजू शकत नाही; अशा ह्या शॉट्सच्या फिल्मवर केवळ रासायनिक प्रक्रिया झालेल्या असतात. त्यावर अन्य कुठलेही संस्कार झालेले नसतात. ह्या विस्कळीत शॉट्स चा एकत्र संग्रह म्हणजे ‘रशेस’. आणि हे ‘रशेस’ पहाण्यासाठी त्याची एकत्रित प्रिंट काढली जाते त्याला ‘रश प्रिंट’ म्हणतात. जी चित्रपट निर्मितीत अपरिहार्य असते. ह्या वरुन त्यानिर्माणाधीन चित्रपटाचा दर्जा लक्षात येतो. प्रत्येक शॉट वाईज त्याचा बारकाईने अभ्यास होतो…
  हल्ली उत्तम दर्जाचे व्हिडीओ कॅमेरे चित्रीकरणासाठी वापरले जातात. त्यावरच्या मॉनिटर वरुन काय आणि कसं चित्रित झालं आहे रंग-संगती कशी जमली आहे इ. गोष्टी साऱ्या चित्रीकरण स्थळीच तपासल्या जातात.
  ‘रश प्रिंट’ म्हणजे चित्रपट नव्हे आणि ट्रेलर तर नव्हेच नव्हे. ट्रेलर म्हणजे जाहिरातीचा भाग, तर ‘रश प्रिंट’ म्हणजे अभ्यासाचा भाग. माझ्या ह्या चित्रपट पार्श्वभूमीच्या ह्या लेख मालिकेला सिक्वेन्स नाही. …चित्रपट क्षेत्रातील माझ्या निकटच्या श्रेष्ठ व्यक्तींवर मी हे लेख लिहिले. –पण माझं किंवा त्या सेलिब्रेटीजची ही आत्मचरित्रे नव्हेत. त्यांचे अल्प-स्वल्प अनमोल सहवास मला मिळाले, काही दुर्मिळ प्रसंग अनुभवायला मिळाले ते पुस्तकातून आपल्या बरोबर शेअर करावेसे वाटले म्हणून ते ह्या लेख मालिकेतून आपल्या समोर मांडले. एखाद्या सुंदर चित्रपटाच्या सुंदर रशेस सारखे मी ते अनुभवले. …
  …तेव्हा ही ‘रश प्रिंट’ सर्व वाचकांनी पहावी आणि ह्या वेगळ्या प्रकारच्या ‘रश प्रिंट’चा भरपूर आनंद लुटावा, ही मनापासूनची इच्छा!…
  आभार!
  -विनय बहुलेकर.

 • सलणारा सलाम- अनुराधा नेरुरकर

 • साखरबिटकी- श्रीनिवास चितळे

  Sale! 300.00 202.00

  रसिक मित्रानो मी श्रीनिवास केशव चितळे राहणार ठाणे. नुकतीच साठी ओलांडली. मूळ कोकणातील, थोडक्यात माझी नाळ कोकणात पुरलेली आहे, देहाने मी ठाण्यात असलो तरी मनाच्या ओसरीवर कायम कोकणातील कंदील लटकत असतो, प्राथमिक शिक्षण चिपळूणला, माध्यमिक जोगेश्वरी मुंबई येथे आणि कॉलेज पार्ले म्हणजे सध्याचे साठे कॉलेज,घरात वातावरण धार्मिक आणि तसच शिक्षणालाहि प्राधान्य, आमचे चुलते म्हणायचे तस देवळातील आणि शाळेतील घंटा तेवढ्याच ताकदीने वाजवणे महत्वाचे, बालपणी गुरगुट्या, मेतकुट, दही भात यावर पिंड पोसलेला. घरात सकाळचे सूर्यनमस्कार घातल्या खेरीज दुधाचा कप पुढे आला नाही आणि संध्याकाळचा झोपाळ्यावर बसून परवचा म्हटल्याशिवाय समोर जेवणाच ताट आल नाही. नोकरी भारत पेट्रोलियम मध्ये केली, ३४ वर्षाच्या नोकरीनंतर निवृत्त झालो. पत्नी कर सल्लागार आणि एकुलती एक मुलगी कमर्शियल आर्ट शिकते आहे. व्यसन म्हणाल तर माणस जोडणे आणि वाचणे. पुस्तक वाचन, नाट्य अभिनय, भरपूर केल. लिखाण देखील बर जमत असे लोक म्हणतात. नोकरी निमित्त भरपूर प्रवास देखील केला. अनुभव गोळा केले आणि ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न देखील केला. कविता विशेषतः कुसुमाग्रज, बोरकर, करंदीकर हे त्रिदेव मनात पुजलेले आणि गद्य लेखनात भाई म्हणजे पु.ल. हे दैवत. गोनीदा, पेंडसे, जयवंत दळवी हे अत्यंत आवडते लेखक. आमच्या पिढीचे अनुभव त्या कालचे वातावरण पुढील पिढीला समजावे हि लिखाणा मागची प्रेरणा. मी अत्यंद आनंदी आणि सुखी प्राणी आहे. देवाने खूप काही दिल आणि जे दिल नाही त्याची मला आवश्यकताच नव्हती अशा वृत्तीचा, लोकसंग्रह मात्र अफाट आहे, “जिथे पहावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत “अशी स्थिती आहे, राजकीय म्हणाल तर नमस्ते सदा वत्सले मातृभूमे या बाळकडूवर मोठा झालो आणि ती विचारसरणी बदलावी अस कधीही वाटल नाही. असो माझ्या लिखाणातून माझा अधिक परिचय होईलच आणि आता माझ हे मैत्र तुमच्यामुळे अधिक वृद्धिगत होईल हि खात्री आहे.

  आपला मित्र,

  श्रीनिवास केशव चितळे.

 • स्मरणिका: ट्विटरसंमेलन २०१७

  नमस्कार,

  यंदाचे दुसरे ट्विटर मराठी भाषा संमेलन अतिशय थाटात पार पडले. हजारोंनी ट्विट्स संमेलनात पडल्या आणि मराठी ट्विटरकर मनसोक्त व्यक्त झाले.यंदाच्या संमेलनात विशेष असे बारा हॅश टॅग निवडले होते.ट्विटरकरांनी बाराही हॅशटॅग वापरून आपले विचार संमेलनात मांडले.

  मराठी भाषेत ट्विटरवर काहीतरी सकस लिहिले जावे म्हणुन गेल्या वर्षी पहिले ट्विटर संमेलन भरले.

  गतवर्षीचा उत्साह यंदाही पहायला मिळाला.स्वप्निल जोशी,सोनाली कुलकर्णी ,कौशल इनामदार सारख्या सिने कलाकारांपासुन धनंजय मुंडे,पंकजा मुंडे,सुप्रिया सुळे यांच्या सारख्या राजकारणींपर्यंत सर्वांना उत्साहाने सहभाग घेतला.

  नेहमी प्रमाणेच यंदाही #माझीकविता हा लोकप्रिय हॅशटॅग होता.वेगवेगळ्या विषयांवरील कविता संमेलनात वाचायला मिळाल्या . ट्विटरकरांनी आपले छंद ,कथा,कविता,पाककृती,मराठी साहित्य ह्या आणि अशा अनेक विषयांवर मराठीतून ट्विटरवर लिहिले.मराठीतुन लिहण्यासाठी एक कारण मिळावं म्हणुनच तर हा संमेलन उद्योग थाटला आहे,ट्विटरकरांच्या समर्थनामुळे हे शक्य झाले.

  मराठी शाळेतील आपले अनुभव,महाराष्ट्रातील बोलीभाषा,मराठीसाठी तंत्रज्ञान या विषयांवरही मौलीक चर्चा झाली.यंदाच्या संमेलनात ट्विटर व्याख्यानाचा प्रयोग झाला.मराठी भाषेशी संबंधी अनेक विषयांवर व्याख्याने झाले.संमेलनाला यंदा मिळालेले बौद्धिक अधिष्ठान हे ट्विट व्याख्यानाचेच फळ आहे,हे आम्ही आनंदाने नमूद करू इच्छितो.

  मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर तिला कुठल्याही माध्यमाचे वावडे असण्याचे कारण,ट्विटर संमेलनामुळे ट्विटरचे माध्यम मराठीमय होण्यासाठी हातभार लागेल ही अपेक्षा करतो.

  ईबु पब्लिकेशन्सचे शैलेश खडतरे संमेलनात आलेल्या साहित्याचे ई-पुस्तक करत आहेत,त्यांचे व त्यांच्या चमूचे विशेष आभार. पुढील संमेलनातही तुमचे पाठबळ मिळाले तर संमेलन यशाची अधिक उंची गाठेल यात शंका नाही.

  आभार,

  आयोजक
  स्वप्निल शिंगोटे
  @MarathiWord

Showing 11–19 of 19 results