लेखसंग्रह

Showing 1–10 of 17 results

 • Manthan- Vishwash Londhe, Anant Velankar

  100.00

  गेली सुमारे 3 वर्षे quora.com सारखी समाजमाध्यमे किंवा वृत्तपत्रीय लेख आणि दूरदर्शनवर घडणाऱ्या चर्चा किंवा मूलभूत प्रश्नांचा नैमित्तिक आढावा यातून आम्ही काही दखलपात्र प्रश्नांवर आधी चर्चा आणि मग त्या चर्चेच्या निष्कर्षांवर स्वतंत्र विस्तृत विवेचन अशा पध्दतीने वेळोवेळी काही लेख लिहून काढले त्यांचं हे संकलन वाचकांसमोर ठेवण्यास आम्हाला आनंद वाटतो.
  या लेखांमधे कोणताही ठराविक असा विषय नाही किंवा स्पष्टच सांगायचं तर सुसूत्र अशी विषय संगतीही नाही. ज्या प्रश्नासंदर्भात ही चर्चा होते किंवा मुद्दाम घडवून आणली जाते ते बऱ्याच अंशी quora.com सारख्या समाजमाध्यमातूनच विचारलेले असतात आणि याच माध्यमातून त्यांना कमीअधिक सुसंगत उत्तरेही मिळालेली असतात. या उत्तरांचाही संदर्भ आणि उपयोग या चर्चांमध्ये आणि पर्यायाने लेखनात होता.
  श्रवण, वाचन, चिंतन, मनन, चर्चा याच्या पुढची पायरी ही लेखन असावी असा पूर्वसंकेत आहे. आणि त्या अर्थाने लेखन ही सर्वात कष्टप्रद, आणि सर्वात जास्त धोकादायक किंवा विध्वसंक कृती मानली पाहिजे. कारण एका व्यक्तीने कितीही तर्कशुध्द विचार करायचा ठरवला तरी मतभिन्नता निर्माण होतेच आणि लेखन हा तर्काच्या स्थितीशून्यतेचा पुरावाच असतो.
  वाचनाची पर्यायाने संदर्भांची किंवा संदर्भ ग्रंथाच्या परिशीलनाची विपुलता प्रत्येक लेखनाची प्राथमिकता आहे पण या बाबतीत इथे त्याची कमतरता मान्य करताना हे लेखन कुठल्याही तऱ्हेने किंवा कोणत्याही अंगाने पूर्वप्रसिध्द मतांना छेद देण्यासाठी नसून चर्चेत सहभागी असणाऱ्यांच्या मतांचा किंवा निष्कर्षांचा फक्त लेखी स्मरणठेवा आहे. स्वतंत्ररित्या यापैकी प्रत्येक लेख हा निबंध प्रकारातच मोडेल कारण हा लेखकांचा दृष्टिकोन असून त्याला अनेक पैलू असू शकतात किंवा निरनिराळ्या कोनातून किंवा अगदी भिन्न अशा अर्थाने ही त्या बद्दल लिहिता आणि बोलता येईल आणि हाच असे लेख किंवा निबंध लिहिण्याचा हेतू आहे. ढोबळ अर्थापासूनसुरूवात करुन जास्तीत जास्त आक्षेपांचे जास्तीत जास्त निराकारण व्हावे असा यात आशावाद आहे. हा वाद किंवा खंडन नसून ज्या निष्कर्षाकडे आपण जाणार आहोत त्याचे अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्षित असे स्वरुप स्पष्ट व्हावे आणि त्यातून चर्चाविषयालाच नव्हे तर आणखी काही विषयांवर चर्चेला किंवा लेखनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. बव्हंशी निरीक्षणातून असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा मुळात विषयाचं किंवा प्रश्नांचच नीट आकलन न झाल्यामुळे अगदी स्वपातळीवर सुध्दा समाधानकारक अशा स्पष्टिकरणाचा उत्तरांमधे अभाव दिसून येतो. आमचा प्रयत्न हाच आहे की मुळात प्रश्न समजून घेण्यात आपण किती यशस्वी होतो याचं मोजमाप करावं याच विचारातून प्रत्येक प्रश्नावर आणखी उपप्रश्न आणि त्यावर आणखी आक्षेप आणि त्याची जास्तीतजास्त समाधानकारक (म्हणजे आमच्या मर्यादे पर्यंत) सोडवणूक हे चर्चेचे सूत्रच फक्त लेखांमधून पुढे नेले आहे.
  लेखन, वाचन ह्या चिकाटीच्या आणि व्यासंगाच्याच गोष्टी आहेत पण अशा प्रकारे चर्चा, लेखन यातून आपण ही थोडाफार तर्कसंगत आणि तर्कशुध्द विचार करु शकलो तर त्यातून अधिक तपशील मिळवण्याची इच्छा होईल त्यातून अधिक सुसंबध्द असं आचरण घडू शकेल का? खुद्द आपल्या आचारविचारातील विसंगती कमी होईल का? इतरांच्या वर्तनातील विसंगतीची कारणमीमांसा लक्षात घेता आली तर तिच्याकडे क्षमाशील वृत्तीने नाही तरी किमान दुर्लक्षित नजरेने तरी पाहता येईल का? पूर्वग्रहदूषितपणा हा किती खोल पोचला आहे याचं भान आपल्याला येईल का? प्रत्येक प्रश्नात प्रत्यक्ष सोडवण्याचा भाग किती आणि समज नीट न झालेला असंबद्ध भाग किती? आत्मपरिक्षणातून आलेल्या निष्कर्षांची टोचणी सहन करण्याची क्षमता किती? पूर्व कल्पना आणि संस्कृतीची तर्कविसंगत, काळी किंवा गैरसोयीची बाजू मान्य करण्याची तयारी किती? हे आणि असे अनेक बेचैन करणारे प्रश्न स्वतःला पडावेत हा ह्या चर्चेचा आणि लेखांचा हेतू होता तो किती सफल झाला याचा आढावा घेऊन पुढच्या लेखांचा प्रपंच करावा इतपत ही प्रस्तावना म्हणजे खरतर साधं सरळ मनोगत आहे.
  म्हणूनच ही लेखमाला म्हणजे कुणाचीही बाजू घेण्याचा किंवा कुणाच्याही मताचा उच्छेद करण्याचा आटापिटा नसून जो विचार आपण करु शकतो तो तसाच मांडू शकतो का? याची चाचपणी आहे.
  – विश्वास गोपाळ लोंढे आणि अनंत विष्णू वेलणकर

 • अभिविनीत

  Sale! 70.00 50.00

  अनेक लेखकांच्या भाऊगर्दीत एक कुणीतरी आपल्या लक्षात रहातो. विनित वर्तक.

  विनयशीलपणे तो नग्न विषयांना कपडे घालतो. जिथे इतरांची लेखणी थरथरते तिथे तो मल्लखांबासारखा उभा राहून लीलया कसरती करून टाळ्या घेतो.

  तो हा विनित वर्तक माणूस म्हणून अत्यंत साधा वाटणारा पण लिहू लागला की मूलभूत प्रश्नांनाच नम्रतेने घाम फोडणारा. प्रगल्भ बुध्दीतून उत्पन्न सोप्या विचारांना ठाशीव चित्ररूप देऊन त्यांना एक स्वतंत्र विषयमहत्त्व देणारा हा लेखक खूप काही आवडाव्या अशा गोष्टी सांगून आपली वाहवा मिळवताना काही प्रसंगी सामाजिक कारूण्यही अधोरेखित करतो आणि अंतर्मुखतेची छाप सोडतो प्रत्येकाच्या मनात.

  जीवनाकडूनच्या आपल्या अपेक्षा आणि त्याकरिता समाजाकडून मिळणारी पोषकता यांचा समतोल साधण्याची कला शिकवताना तो कुठेही वैचारिक कडेलोट होऊ देत नाही हे विशेष.

  आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक आनंद पुरेपूर घेताना समाजाची घडी विस्कटू न देण्याच्या योजना दाखवताना कुठेही तो जुनाट वाटत तर नाहीच उलट नवविचारांतून उमललेला एक कल्पक इंजिनिअर आहे नक्कीच..

  जुन्याच प्रश्नांची
  सतत नाविन्याने उत्तरे शोधणाऱ्या प्रत्येक वाचकातील त्या
  स्फुल्लिंग चेतनेस..
  तो जागवतोय अभिव्यक्त होऊन..

  ‘अभिविनित’ हे शीर्षकही मला खूपच समर्पक वाटलं कारण खरोखरच त्याच्या नावाप्रमाणेच आत्यंतिक नम्रतेने व्यक्त होणं हा विनितचा स्वभावधर्म आहेच…

  विनितच्या या वाटचालीला माझ्या हृदयापासून खूप खूप शुभेच्छा.. आणि हो त्याने कमीतकमी शंभरभर पुस्तके तरी लिहावीत  हा माझा वेधक विश्वास मी त्याच्या प्रतिभेस सांगू इच्छितो..

  भूषण भन्साली.

 • अर्थ दिवाळी अंक

  0.00

  नमस्कार,
  अर्थ मराठी ई-दिवाळी अंक यंदा चैथ्या वर्षात पदार्पण करत आहे. वाचकांना सतत काही ना काही नवीन देता यावं यासाठी प्रत्येक वर्षी जे काही शक्य आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आपल्या ई-दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेतर्फे सलग दोन वर्षे (2014 आणि 2015) सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचं श्रेय माझ्या सादरीकरणापेक्षा नेहमी माझ्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नीला, माझ्यामध्ये साहित्याची बीज पेरणाऱ्या माझ्या वडीलांना, माणूस म्हणून जग दाखवणाऱ्या माझ्या आज्जीला जातं. आणि अर्थातच दिवाळी अंकामध्ये लेख आणि काव्य सादर केलेल्या सर्व नवोदित आणि दिग्गज साहित्यीकांना जातं. दिवाळी अंकावर आपलं प्रेम असंच असु द्या.

  आपलाच,
  अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
  (संपादक)

 • खिडकी

  Sale! 150.00 118.00

  मी लिहिलेल्या ‘खिडकी’ या ललित पुस्तकाच्या ‘ईआवृत्ती’च्या निमित्ताने माझ्या वाचकांशी संवाद साधताना खूप आनंद होतोय.

  कालानुरूप होणाऱ्या चांगल्या बदलाला सामोरं जाणं हा माझ्या मते मानवधर्म असला पाहिजे. ‘वाचाल… तर वाचाल!’ असं माझ्या लहानपणी मोठी माणसं नेहमी सांगत. परंतु हल्ली मोबाईल, इंटरनेटच्या काळात वाचन संस्कृती कमी होताना जाणवत असताना ‘ई-पुस्तक’ ही नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे पुन्हा वळवेल अशी खात्री वाटते.

  ‘किंडल’ किंवा ‘गुगल प्ले बुक’ अॅपवर आता छान छान पुस्तके वाचायला मिळत आहेत.

  लेखकांसाठी तर पुस्तक प्रकाशनाचे हे जणू नवं दालन खुलं झालं आहे. पुस्तक छपाई करून प्रकाशन करण्याच्या खर्चापेक्षा ई-पुस्तक प्रकाशनाचा खर्च अत्यंत माफक आहे. शिवाय तुमचं पुस्तक जगभरात वाचनासाठी उपलब्ध होतं. मी याचं मनःपूर्वक स्वागत करतो.

  माझ्या ‘खिडकी’ हे ललित पुस्तक तुम्हाला ब्रोनॅटो डॉट कॉम या वेबसाईटने वाचनासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.

  प्रदीप कबरे
  २६/१/२०१७

 • दिल से…संग्रह स्पंदनांचा- अमरजीत आमले

  Sale! 250.00 200.00

  मनात येणारे विचार, खोलवर दडून राहिलेला भावनांचा उद्रेक, भवताल अनुभवत असताना निरंतर जाणवणारी असहायता, प्रतिक्षण विदीर्ण होत जाणारी सत्यमेव जयते ची ललकार आणि त्याच क्षणी या सगळ्यांशी समरस होत असताना स्वतःशी उलगडत गेलेलो मी..
  प्रत्येक लेखागणिक मी स्वतःला नव्यानं जाणून घेत होतो.. जाणिवेतुन नेणिवेच्या पातळीवर प्रवास करत असताना, शब्दांचे मूल्य, त्याचं शाश्वत रूप सतत जिवंत ठेवत होतं मला.. नश्वर देहापेक्षा शब्दांचे चिरंतन रूप अमरत्वाचं सामर्थ्य देत होतं मला.. आणि अस्वस्थ वर्तमानाचा दाहक वास्तव प्रखर समाजभान देत होतं मला..
  संवेदना बोथट झाल्या की वेदना नाहीशा होतात, स्पंदनं थांबतात आणि मृत आत्मा घेऊन माणसं जिवंत असल्याचा आभास निर्माण करतात.. स्वतःभोवती ती जगत असतात लौकिक अर्थाने.. उपभोगत असतात सगळ्या लालसा.. मिरवत असतात त्यांचा क्रूरपणा कलेच्या मुखवट्याआड.. निरागसतेचा बळी देऊन ही मंडळी अखंड प्रज्वलित ठेवत असतात स्वतःचा वखवखलेला अहम रुपी यज्ञ..
  पण कधी ना कधी ज्वाला थंड होतात आणि या निरागसतेच्या राखेतूनच उभं रहातं माणुसकीचं अधिष्ठान. लागते चाहूल उद्याच्या उन्नत उज्वल भविष्याची… आणि त्या क्षणी डोळे भरून येतात… कृतार्थतेची भावना उचंबळून येते.. माणूस असण्याचा सार्थ अभिमान चराचरात ओसंडून वाहू लागतो.
  या जाणीवा प्रवाही असतात, त्यांना साठवावे असे वाटते आणि त्यांना बांध घालणे शक्य हि नसते. म्हणून मग मनात प्रफुल्लीत झालेल्या भावना आणि वेदना माणसाने शब्दांच्या रूपाने साठवल्या. माझे देखील तसेच झाले.
  सकाळ दैनिकात आलेले माझे लेख संकलित करून एकत्रितपणे ईपुस्तक स्वरुपात तुमच्या समोर ठेवताना मला आनंद होतो आहे. आपल्यातील भावनानुबंध अजून दृढ व सशक्त होतील अशीच कामना करतो.
  -अमरजीत आमले

 • पण: महाराष्ट्रदिन विशेषांक

 • पु. ल. देशपांडे पुलोत्सव लेखनस्पर्धा २०१९

  Sale! 200.00 150.00

  Bronato आयोजित पुलोत्सव लेखनस्पर्धा २०१९ अंतर्गत आलेल्या निवडक साहित्याचे ईपुस्तक प्रकाशित करताना आम्हाला आनंद होत आहे. पु. ल. हे महाराष्ट्राचे आवडते लेखक. मराठी भाषेचे एक गोंडस, गुणी, लोभस असे बाळ. हो बाळ. कारण लहान मुलं ज्या प्रमाणे लाघवी असतात तसेच पु. ल. होते. त्यांच्यातलं बालपण हे त्यांच्या तारुण्यावर आणि वृद्धपकाळात देखील  त्यांच्यातील ऊर्जेचा स्रोत राहिले असावे.

  त्यांनी लोकांना नुसतं क्षणभर हसवलं नाही तर  आयुष्यभर नुसतं आठवणून आठवून स्मित सहज एखाद्या कळीसारखं फुलवत राहील इतकं दिलं.

  पु. ल. देशपांडे यांच्यावर प्रेम करणारे असंख्य आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्या साहित्याचे अनेक पैलू आपल्याला आपल्या जगण्याचेच भाग होऊन गेले आहेत…. मराठी साहित्याचं रांजन आनंदाने सदैव भरलेले असेल ह्याचे खूप मोठे श्रेय पु. ल देशपांडे ह्यांना जाते ह्यावर कुणाचेही दुमत नसावे.

  पुलंवर प्रेम करणारी नवी पिढी तयार होत राहील. ह्या दृष्टीने Bronato ने या लेखन स्पर्धेचे आयोजन केले. भाग घेणाऱ्या प्रत्येक लेखक/लेखिकेचे धन्यवाद. लिहीत राहा.

  सहभागी लेखक/लेखिका: 
  नितीन साळुंखे, डॉ. गौतम पंगू , वृषाली बोरावके, विशाखा कुलकर्णी, अतुल काटदरे, वर्षा चोबे, शशी त्रिभुवन, अभिजित शिंदे, अरुणा टोपरे, नूतन शेटे, किरण बोरकर, सुवर्णा कुळकर्णी- पावडे, स्मिता वैद्य, अशोक दरेकर, विनायक आनिखिंडी, शर्वरी जोशी, रामदास टेकाळे, मोहित केळकर, ऋता पंडित, प्रज्वल नरवडे, संयुक्ता परचुरे, तुषार म्हात्रे, स्वाती भट, सुवर्ण कुळकर्णी- पावडे, विनय वरणगांवकर , अनिता शिंदे , स्मिता वैद्य, अमेय अलाटे, विनय वरणगांवकर,

 • पुलंची बाग

 • भंडारी समाजाचा इतिहास

  Sale! 150.00 100.00
 • मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे

  Sale! 100.00 60.00

  गेली छत्तीस वर्ष दऱ्याडोंगरांनी, रानावनांनी, पक्ष्यांच्या पहाटकुजितांनी, गर्द रानाच्या आसऱ्यानं धावणाऱ्या नाजूकशा पायवाटांनी, त्या वाटांवरच्या इतिहासाच्या पाऊलखुणांनी, कोसळत्या पावसानं न्हाऊन सुस्नात झालेल्या गिरिदुर्गांच्या काळ्याभोर तटांनी जणू वेड लावलं आहे…

  तीनही ऋतुचक्रं छत्तीस वेळा गरगरताना मनसोक्त अनुभवली आहेत. चैत्र- वैशाखाच्या कळकळत्या कहारात निष्पर्ण वृक्षाखाली सावली अनुभवत थांबलो आहे. त्या निष्पर्ण फांदोऱ्यांच्या टोकाशी तरारलेले ते तांबूस ठोंब पाहून डोळ्यांसोबत मनही निवलं आहे. मार्गशीष पौषातल्या थंडीतलं, चालता चालता नाकाच्या शेंड्यावर नकळत जमणारं, पहाटेचं दहिवरसुद्धा अनुभवलं आहे. त्या नुसत्या दहिवरावर वाढणाऱ्या हरभऱ्याच्या कोवळ्या दाण्यांच्या चवीच्या केवळ आठवणीनंही अंग शहारा उमटतो आहे…

  मधमाशांच्या पोळ्यात एकाएका माशीसाठी एक एका घर असतं. माझ्या मनाचं पोळं हे अशा अनेक आठवणींनी अन् इतिहासाच्या विचारांनी दाटलेलं आहे. आज कधी मी त्रयस्थासारखा स्वतःकडे पाहातो, तेंव्हा तेंव्हा मला जाणवतं की, माझ्या रुक्ष अशा बाह्य आवरणात असलेलं माझं मन मात्र भलं कोवळं आहे…

  ज्ञानेश्वरीच्या पंधराव्या अध्यायात माऊली म्हणतात: कोणे एके अवसरी, रिघोनी नेत्राच्या द्वारी, मग रूपाच्या डोंगरी सैरा हिंडे.
  दुर्गांच्या वाटा भटकताना जे जे काही दिसलं, जे जे काही भावलं, जे जे काही अंतरी उमटलं… ते ते शब्दात बसलं आहे.

  – डॉ. मिलिंद पराडकर

Showing 1–10 of 17 results