प्रेरणादायी

Showing all 5 results

 • Ghadavuya Swathala- Dipti Panhalkar

 • आमचा बाप आन् आम्ही- डॉ नरेंद्र जाधव

  Sale! 200.00 100.00

  डॉ. नरेंद्र जाधव –
  आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, देशी-विदेशी अग्रगण्य विद्यापीठांतील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले प्रभावी वक्ते, मराठी-हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून तब्बल 41 पुस्तकांचे लेखन-संपादन करणारे सिध्दहस्त लेखक; तसेच एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. नरेंद्र जाधव सर्वदूर सुपरिचित आहेत.
  डॉ. नरेंद्र जाधव सध्या राज्यसभेचे राष्ट्रपती-नियुक्त खासदार म्हणून कार्यरत आहेत. सत्ताधारी पक्षाचे सदस्यत्व न स्वीकारता आपला स्वतंत्र बाणा त्यांनी कसोशीने जपला आहे. प्रत्यक्षात संसदेत तसेच विविध स्थायी समित्यांमध्ये (वित्त, व्यापार आणि आता माहिती-तंत्रज्ञान) आणि परराष्ट्र व्यवहाराच्या सल्लागार समिती मध्ये अभ्यासू आणि सक्रिय सहभागातून डॉ. नरेंद्र जाधव यांनी संसदपटू म्हणून आपला एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे. खासदारकी शिवाय अशोका युनिव्हर्सीटी सारख्या नावाजलेल्या विद्यापीठासह एकूण तीन विद्यापीठात ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत ते देशाच्या युवापिढीच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्याच बरोबर, टाटा उद्योग समूहासह विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर ‘स्वतंत्र संचालक’ म्हणून देखील डॉ. जाधव कार्यरत आहेत. त्यांची ज्ञानसाधना आणि लेखनकार्य तर अखंडपणे निरंतर चालूच असते.
  डॉ. नरेंद्र जाधव यांनी गेली 45 वर्षे सार्वजनिक जीवनात अनेकानेक उच्चतम पदांना आपल्या कर्तृत्वाने नवीन झळाळी मिळवून दिली आहे. केंद्रीय नियोजन आयोग (अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग) तसेच राष्ट्रीय सल्लागार परिषद (अध्यक्षा : श्रीमती सोनिया गांधी) या दोन भूतपूर्व शिखर संस्थांमध्ये केंद्रीय राज्य-मंत्री समकक्ष पातळीवरील सदस्य म्हणून देशाची 12 वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आणि एकूणच देशाच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्याही पूर्वी भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून देखील डॉ. नरेंद्र जाधव यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे.

 • एक प्रियदर्शिनी भेट

  Sale! 200.00 115.00

  दृष्टीकोन! आयुष्य जगणं हे सर्वस्वी आपल्या दृष्टीकोनावर अवलंबून असतं. जर आपला जीवनाकडं पाहण्याचा दृष्टीकोन मर्यादीत असेल तर आपल्याला आयुष्यदेखिल मर्यादीत स्वरूपातच दिसतं. पण जर आपण जीवनातील दृष्टीकोन विशाल केला तर आपल्या आयुष्याला एक नविन विस्तारीत आयाम मिळतो. जीवनाकडं विशाल दृष्टीकोनातून पाहून आपण भरभरून आयुष्य जगावं हीच तर ‘माईंड ट्रान्सफॉर्मर’ सुरू करण्यामागची मूळ प्रेरणा होती. “आपलं मन ही केवळ एक स्मृती आहे आणि आपण आपल्या तिचं कशाप्रकारे आकलन करतो आणि अंमलात आणतो हा खरा समंजसपणा आहे.” यावर माझा विश्वास आहे.
  माझं आयुष्य नेहमीच अस्थिर आणि आव्हानात्मक राहिलं आहे. आणि त्यामुळंच मला माझ्या श्रद्धांबद्दल, दृष्टीकोनांबद्दल स्वत:लाच प्रश्न करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. का? आणि कसं? या प्रश्नांची उत्तरं शोधत असतानाच मी आयुष्यातील मूलतत्वांचा धांडोळा घ्यायला सुरूवात केली. मी माझ्या जीवनातील समस्यांवर उत्तर शोधण्यासाठी आयुष्याकडं नव्या दृष्टीकोनातून पहायला सुरूवात केली. सुमारे ३ वर्षांपूर्वी मला मूत्रपिंडाच्या दुर्मिळ आजाराचं निदान झालं आणि तिथूनच माझ्या आयुष्यातील संकटांच्या मालिकेला सुरूवात झाली. हा असा आजार होता जो १ कोटी लोकांमध्ये केवळ एखाद्याच व्यक्तीला होतो. अचानक एके दिवशी या आजाराचं निदान झालं आणि क्षणार्धात माझं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. मला माझी सिंगापूरमधली नोकरी सोडून उपचारांसाठी भारतात परतावं लागलं. त्यानंतरचे बरेचसे दिवस माझ्यासाठी आव्हानात्मक होते. कधी सकाळीच माझी हाडं आखडल्यासारखं व्हायचं तर काहीवेळा मला मळमळ आणि उलट्या व्हायच्या. कधी भयंकर तोंड यायचं तर कधी संसर्गामुळं भयंकर ताप यायचा, कधीकधी तर अनेक अवयव असहकार पुकारायचे आणि माझी मूत्रपिंडं काम करायची बंद व्हायची. तर काहीवेळा मात्र माझी मूत्रपिंडं व्यवस्थित काम करायची. अशा संमिश्र अनुभवांमधून मी माझ्या आयुष्यात उगवलेल्या सर्वोत्तम दिवसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शिकले. मी जिवंत आहे केवळ याच गोष्टीबद्दल मी कृतज्ञ रहायला हवं अशी शिकवण मला मिळाली….
  ….मला अगदी प्रामाणिकपणे आशा वाटते की हा नवा दृष्टीकोन तुमच्या जीवनातील स्वातंत्र्य, परमानंद, समाधान, यश आणि प्रेम या सर्वांसाठी मार्गदर्शक प्रकाश बनून राहील.

 • जेपी’ज शो- जनार्दन पेडामकर

  Sale! 150.00 100.00
 • यशपुष्प- डॉ. आशुतोष रारावीकर

  Sale! 150.00 100.00

  मी लिहिलेल्या विचारपुष्पांचं हे पुस्तक आज आपल्यापुढे सादर करतांना मला विलक्षण आनंद होत आहे. सागरमंथनातून मोती निघाले असं म्हणतात. ह्या पुस्तकातील मोती माझ्या विचारमंथनातून वर आले आहेत. ते अंत:प्रेरणेतून स्फुरलेले आहेत, मुद्दाम बनवलेले नाहीत. विचार हा मोठा आनंद असतो आणि आनंदाची देवाणघेवाण तर झालीच पाहिजे. कारण तो दिल्याने वाढतो. याच उद्देशाने ह्या पुस्तकाचं सादरीकरण करतो आहे. हे वाचतांना प्रसन्नतेचे काही तरंग आणि तुषार जरी आपल्या चित्ती फुलले आणि काही स्मितरेषा आपल्या चेहेऱ्यावर उमटून गेल्या तरी त्याचं सार्थक झालं असं मी समजेन.
  माझे वडील प्रा. डॉ. यशवंत रारावीकर हे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ होते. ते सात्विकतेची आणि करुणेची मूर्तिमंत प्रतिमा होते. माझी आई प्रा. डॉ. सौ. अरुणा रारावीकर ही एक अध्यात्म मूर्ती, संस्कृततज्ज्ञ आणि साहित्यिक होती. ती साक्षात चालतीबोलती भगवद्गीता होती, शत-प्रतिशत सप्तशती होती. या जगात पाऊल टाकल्यानंतर तिनेच मला पहिल्यांदा बोलायला शिकवलं. माझ्या आई -दादांनी माझ्या जीवनाला ‘अर्थ’ही दिला आणि जीवनाचं ‘शास्त्र’ही शिकवलं. आयुष्याच्या अर्थशास्त्राची पारायणं मी त्याच्या कुशीत केली.

  अर्थशास्त्र हा माझा श्वास आहे तर अध्यात्म हा माझा प्राण आहे. इतकी वर्षे मी वडिलांची म्हणजे अर्थशास्त्राची भाषा बोललो. या पुस्तकातून आता मी आईची भाषा बोलतो आहे. माझ्या आई-वडिलांनी मला भाषा आणि विचार या दोन्हींची देणगी दिली. त्यांनी मला भाषा आणि जीवन या दोन्हींची शुद्धता शिकवली. आज हा छोटा ग्रंथोबा मी त्यांच्या चिरंतन स्मृतींना अर्पण करत आहे.

  मी माझ्या आई-वडिलांच्या नावामागे कैलासवासी कधीही लावत नाही कारण माझ्या अंतकरणात त्यांचा सदैव वास असतो. पुस्तकावर एक औपचारिकता म्हणून लेखकाचा – म्हणजे माझा परिचय छापला गेला आहे. पण मी माझ्या आईवडिलांचा मुलगा आहे हीच माझी सर्वात मोठी ओळख. आणि तोच मला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार. माझ्या वडिलांचं नाव यशवंत आणि आईचं माहेरचं नाव पुष्पा. म्हणून या पुस्तकाचं नाव ‘यशपुष्प’.

  लहानपणापासून आजोबा आणि शेजारी या दोन्ही नात्यांमधून कुसुमाग्रजांच्या प्रदीर्घ सहवासातून झालेला साहित्याचा परिसस्पर्श मला प्रकर्षाने आठवतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल टाकल्यापासूनचे माझे दोन आध्यात्मिक भाग्यगुरू – गुरुवर्य परम पूजनीय श्री. नारायणकाका ढेकणे महाराज आणि माझे गुरुजी तसेच पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांचे योगगुरू डॉ. एच. आर. नागेंद्रजी (कुलपती, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्थान) यांच्या ईश्वरी छायेत सुरु झालेला माझा प्रवास आज एका विलक्षण वळणावर येऊन पोहोचला आहे. प्रसन्न चैतन्यमूर्ती आदरणीय विष्णूमहाराज पारनेरकर यांनाही माझी वंदना.
  माझ्या वडिलांचे परममित्र आणि साहित्यपंढरीत विठोबाचं स्थान असलेल्या तसेच रामदास स्वामींच्या ‘उत्तम’ पुरुषलक्षणांमध्ये बसणाऱ्या पत्रमहर्षी उत्तमरावांनी प्रस्तावना लिहिली हा मोठा आनंद. माझी पत्नी वीणा हिची संसाराच्या मैफलीतली सुरेल साथ आणि चिरचैतन्य देणारा आमचा मुलगा मिहिर या माझ्या जीवनप्रवाहातल्या साथीदारांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. ब्रोनॅटो आणि किंडल, ज्यांच्यामुळे या कलाकृतीला सूर्यप्रकाश दिसला आहे, त्यांचे मन:पूर्वक आभार.

  ही माझी शब्दप्रार्थना आणि भाववंदना कुलस्वामिनी श्री यल्लम्माईच्या पवित्र चरणांवर कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो.
  डॉ. आशुतोष रारावीकर
  १६ जुलै, २०२०
  मुंबई.

Showing all 5 results