कथासंग्रह

Showing 11–14 of 14 results

  • मालवणी कथा

    नमस्कार मंडळी

    आज हे मालवणी कथा साहित्यरुपी पुस्तक तुमच्यापर्यत पोहोचलय याचं खूप मोठं कौतुक वाटतंय, आपली माय मराठी भाषा अन तिची लेकरं म्हणजे महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषा, अन त्यात आपली जिवलग अशी ‘मालवणी’ भाषा .

    आज मालवणी भाषेतील साहित्य  सोशल मीडियाच्या माध्यमातून काही क्षणात जगापर्यंत पोचवू शकतो.पण त्या साहित्याला काही ठराविक वेळेपुरती प्रसिद्धी मिळत.फेसबुकवर अनेक मालवणी नवोदित लेखक ,लेखिका स्वतःहून मालवणी भाषेमध्ये नवनवीन कथा, इरसाल गजाली, कविता सादर करत असतात. काही कथा, कविता वर्तमानपत्र, मासिक मध्ये छापून येत असतात. मी जेव्हा फेसबुक सारख्या समाजमाध्यमावर आलो तेव्हा मालवणी भाषा एवढी वापरली वाजत नव्हती, एव्हाना ती नजरेत हि पडत नव्हती.पण गेले काही वर्षे सिंधुदुर्ग, कोकण मधला नेटप्रेमी तरुण वर्ग फेसबुक वर निःसंकोचपणे मालवणी भाषेतून व्यक्त होऊ लागला. आज मालवणी भाषा व त्या संलग्न फेसबुक ग्रुप वर २५०००+ ते १ लाखाहुन अधिक सभासद दिसून येतात.

    तर दुसरीकडे ट्विटर सारख्या नवख्या माध्यमातून मालवणी भाषेतून व्यक्त होण्याची संधी मला मिळाली, याच ट्विटर मला मराठी भाषा अन बोलीभाषा यासाठी झटत असलेल्या शैलेश खडतरे नावाच्या मित्राची ओळख झाली ..

    सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई,बीड, नगर सारख्या विविध विभागातील  मित्रांपर्यत मला मालवणी भाषा पोचवता आली. मराठी भाषा जतन करताना प्रथम बोलीभाषा जपली गेली पाहिजे याच उद्देशाने Bronato.कॉम यांच्या सहकार्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिली #मालवणी कथा स्पर्धा घ्यावी असं आम्ही ठरवलं अन  त्याला तुम्हा सगळ्यांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद ही लाभला

    मालवणी भाषेतल्या नवोदित लेखकांच्या चांगल्या गोष्टींचे असे रूपांतरीत ईबुक रुपी  साहित्य  वाचकांना नक्कीच आवडेल. मालवणी भाषेतील  एक अत्यंत महत्त्वाचा कथासंग्रह  ‘bronato.com ’तर्फे प्रकाशित केला जातोय ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.

    सदर पुस्तकातील कथांचे परीक्षण नामांकित मालवणी लेखक श्री- प्रभाकर भोगले यांनी केले आहे. तर शैलेश खडतरे यांच्या अमूल्य सहयोगाने हे गुगल प्ले बुक वर उपलब्ध असणार आहे ..

    मालवणी कथा संग्रह मी आमचे सगळ्यांचे लाडके ,ज्यांनी खऱ्या अर्थाने मालवणी जगप्रसिद्ध केली त्या मालवणी सम्राट श्री- मच्छिंद्र कांबळी यांच्या पुण्य चरणी अर्पण करतोय ..

    बापूजी तुम्ही होतास म्हणून आम्ही आज मालवणी हक्काने जगापर्यंत ओरडून सांगू शकताव.. देवा गणपती बाप्पा आणि रवळनाथा आमच्या हातून अशीच मालवणी ची सेवा होयत रव्हानंदेत हीच प्रार्थना …

    तुमचोच  मालवणी झिलगो
    नितीन नाईक

  • मेमरीस्ट्रा

    225.00

    मित्रहो… आणि मैत्रीणींनो…

    बालपणातच खरं तर आपण जीवन सत्यत्वाने पाहत असतो…जसं आहे तसंच…!
    नंतर त्यात अनेक रंग मिसळतात ज्ञानाचे… अनुभवांनी प्रदूषित दृष्टिकोनांचे…
    आणि हे मिसळ भेसळ असलेले रंग एका टप्प्यावर खोटे वाटू लागतात…

    तेव्हा पुन्हा आठवतं ते निर्मळ बालपण… ते तेच सत्य होतं… कारण त्या तरल
    अनुभवांची वीण घट्ट असते अजून मनात…

    लेखक – कवी म्हणजे आपल्यातलंच ते बालक असतं जे भरभरून उत्कटतेने जीवन
    जगताना कधीच कोणत्याच भूलथापांना बळी पडलेलं नसतं… ते त्या लाकूडतोड्या
    सारखं असतं… वनदेवीने दिलेल्या सोन्या-चांदीच्या कुऱ्हाडीत त्याला रस नसतो …
    तो जीवनरूपी वनाच्याच प्रेमात पडलेला असतो…!

    आपल्या शाळेच्या आपण सारेच प्रेमात होतो… तेच आपलं निर्मळ जीवन होतं…
    त्या जीवनात पुन्हा लॉंग इन झाल्याने सध्याच्या जीवनासाठी एक नवी ऊर्जा
    आणि एक सत्य दृष्टिकोन प्राप्त झाल्याने नक्कीच सुखी आणि शांत होऊ… आणि
    जुन्या सवंगड्यांच्या अधिक जवळ येऊ … वर्तमानात एक सुंदर भविष्य घडविण्याची
    ही नांदी या मेमरीस्ट्राच्या निमित्ताने आपल्या साऱ्यांना मिळाली आहे… तिचा पूर्ण
    उपयोग करून घेऊ…!

    हे नुसतेच भावमनोरंजन नसून…
    एक होडी आहे…
    शुध्द मनोभूमीवर पुन्हा एकदा नेणारी …!!!

    आपला
    बालक मित्र…

  • ललित

    या छोट्याशा पुस्तकात माझी मागची दहा वर्षं सामावली आहेत, असं म्हटलं तर काही वावगं नाही ठरणार. या पुस्तकातले लेख २००६ पासून ते २०१६ पर्यंतचे आहेत. प्रत्येक लेख कुठल्याशा अनुभवाचं प्रतिबिंब आहे. प्रत्येक लेखातला ‘मी’, मी स्वत: असेनच असं नाही, पण त्यात माझं मन गुंतलंय एवढं नक्की. हे सारे अनुभव खरेच असतील याची मी खात्री देऊ शकत नाही, इच्छित नाही. त्यातले काही कल्पनांचे तुकडे असतील, तर काही अगदी खरोखर घडलेल्या- बिघडलेल्या गोष्टींच्या तांत्रिक नोंदी असतील.

    पंजक कोपर्डे

  • स्मरणिका २०१८

    Sale! 150.00 0.00

    सप्रेम नमस्कार मंडळी,

    सलग तिसऱ्या वर्षी ट्विटरसंमेलनाच्या स्मरणिका प्रकाशनाचे काम हे आधीच्या दोन वर्षांपेक्षा अधिक व्यापक व आव्हानात्मक होते. या वेळी प्रथमच साहित्य व व्याख्याने थेट ईमेलने पाठवावे असे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाला. यंदा व्याख्यानांची संख्या जास्त आहे. आलेल्या साहित्यात मोठ्या प्रमाणात व्याकरणाच्या चुका होत्या. त्या दुरुस्त करून घेण्यात सर्वाधिक वेळ गेला. पुढील वर्षी प्रत्येकाने आपले साहित्य चोखंदळपणे तपासून त्यात सुधारणा करून पाठवावे ही विनंती. आलेल्या सर्व साहित्याची निवड करणे शक्य नव्हते म्हणून काही ठराविक निकष लागू करून साहित्य निवडले आहे.

    ट्विटरसंमेलन म्हणजे समाज माध्यमांवर होणारा भाषिक सोहळा आहे. या सोहळ्यात सर्वांचे स्वागत तर आहेच शिवाय व्यक्त होण्याची मुभा आणि प्रतिसाद मिळण्याची हमी देखील आहे.

    आपली ही स्मरणिका आकर्षक व वाचनीय व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. मागील वर्षांच्या स्मरणिका या अनेक देशांमध्ये वाचल्या गेल्या आहेत. २०१८ ची ही स्मरणिका देखील उजळ भाग्याने वाचकांच्या प्रेमाला पात्र ठरेल अशी आशा आहे.

    लिहिताना आपण जे लिहिले आहे त्यावर भाषिक व भावनिक संस्कार करून लिहिणाऱ्याने लिहित जावे आणि असेच प्रभावित करणारे लेखन करत राहावे.

    यावेळी स्मरणिका प्रकाशित करायला थोडा उशीर झालाय पण एक उत्तम ईपुस्तक प्रकाशनासाठी तयार करायला लागणारी सर्वोतोपरी काळजी व आवश्यक तांत्रिक बाबी साभाळून हे काम करण्यात आले आहे.

    ईपुस्तक उद्योग उभारणीच्या आमच्या या ध्येयात हल्लीच ब्रोनॅटो ने ३९ देशांमध्ये ९१,००० [एक्याण्णव हजार] मराठी ईपुस्तक डाउनलोड्सचा पल्ला गाठला आहे. हे काम अजून खूप मोठ्या प्रमाणात करायचे आहे. मराठीतील अनेक लेखक लेखिकांच्या साहित्याला जागतिक मागणी तर आहेच शिवाय त्यांच्या साहित्याचा पुरवठा थेट वाचकांच्या मोबाईलवर व आर्थिक मिळकत थेट त्यांच्या स्वतःच्या अकौंटवर पोचवण्याचे काम ब्रोनॅटो आनंदाने करतंय. आणि करत राहील.

    ट्विटरसंमेलनाचे आयोजक स्वप्नील शिंगोटे यांचे प्रोत्साहन व सहकार्य या वर्षी देखील लाभले, यासाठी त्यांचे खूप खूप धन्यवाद. शिवाय ट्विटरवर इतकी सुंदर संकल्पना यशस्वीपणे राबवण्यासाठी त्यांचे खूप कौतुक. पुढील वर्षी देखील इतक्याच जोमाने व उदंड उत्साहाने स्मरणिका सजवली व जगभर निःशुल्क वितरीत केली जाईल याचे प्रेमपूर्वक आश्वासन देतो आहोत.

    या स्मरणिकेबाबत तुमचा वाचनानुभव आम्हाला ईमेल किंवा WhatsApp [९९७००५१४१३] ने नक्की कळवा.

    [या ईपुस्तकातील मते व विचार ही लेखकांची वैयक्तिक मते व विचार आहेत. प्रत्येक मताशी व विचाराशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही.]

    लोभ असावा.
    शैलेश खडतरे

    @ShaileshBronato
    www.bronato.com

Showing 11–14 of 14 results