मराठी

Showing 1–10 of 93 results

  • १०१ गोष्टींचा खजिना

    Sale! 70.00 50.00

    या कथा माझ्या नाहीत, तरी त्या माझ्याच आहेत…

    या पुस्तकातल्या कथा कोणा एकाच एका लेखकाच्या नाहीत,… एका कथकाच्या नाहीत.… त्या खरंतर सगळ्यांच्या आहेत…. जगाच्या सामूहिक सांस्कृतिक संचितात शेकडो वर्षांपासून समाविष्ट आहेत. कोणती कथा कोणत्या देशात उगम पावली आणि कुठून कुठे कशी पोहोचली, हे पाहणंही मनोरंजक ठरावं, असा तिचा चित्तथरारक प्रवास असतो. आज कोणी इसापची गोष्ट आपल्या नावावर खपवली, तर लोक ओळखून सांगतात- पण, मुळात इसापच्या गोष्टीच त्याने लुकमानकडून घेतल्या होत्या, त्याचं काय?

    माझ्या बाबतीत या गोष्टींची सुरुवात झाली ओशोमुळे. त्याच्या व्याख्यानांच्या (बुवाबापूमाँबाबा, डबलश्री आणि ट्रिपलवेडगळांच्या निरर्थक बरळण्यालाही प्रवचन म्हणतात, त्यामुळे तो कर्मकांडलिप्त शब्द ओशोच्या सुंदर व्याख्यानांना वापरवत नाही) एमपीथ्रींनी मॉर्निंग वॉकला सोबत करायला सुरुवात केली आणि या गोष्टीही मनात वस्तीला आल्या. ओशोने त्याच्या बहुतेक व्याख्यानांमध्ये पेरलेल्या या खुसखुशीत भाषेतल्या, सोप्या भासणाऱ्या पण गहन, बहुपेडी अर्थाकडे निर्देश करणाऱ्या गोष्टींनी मन वेधून घेतलं. मला लहानपणी गल्लीतली पोरंटोरं गोष्टीवाला दादा म्हणून ओळखत होती, याचीही आठवण झाली. लहानपणी मुलामुलींचं कोंडाळं गोळा करून तासन्तास हुकमी गोष्टी आठवून किंवा रचून सांगण्यात पटाईत होतो. ती उबळ ओशोने पुन्हा जागृत केली…..

    हे ईबुक वाचणाऱ्यांना त्यांच्या जगण्याच्या धामधुमीत चार विरंगुळ्याचे, निखळ मनोरंजनाचे क्षण मिळोत, एवढीच अपेक्षा.

    मुकेश माचकर

  • Aniket: अनिकेत

    0.00

    महाराष्ट्र राज्याचे पुरस्कार प्राप्त पुस्तक.
    हे पुस्तक वाचून हातावेगळे होते पण यातील कथा आपल्यापासून कधीच वेगळ्या होत नाहीत. नक्की वाचावे असे उत्तम पुस्तक.

  • Ghadavuya Swathala- Dipti Panhalkar

  • Manthan- Vishwash Londhe, Anant Velankar

    100.00

    गेली सुमारे 3 वर्षे quora.com सारखी समाजमाध्यमे किंवा वृत्तपत्रीय लेख आणि दूरदर्शनवर घडणाऱ्या चर्चा किंवा मूलभूत प्रश्नांचा नैमित्तिक आढावा यातून आम्ही काही दखलपात्र प्रश्नांवर आधी चर्चा आणि मग त्या चर्चेच्या निष्कर्षांवर स्वतंत्र विस्तृत विवेचन अशा पध्दतीने वेळोवेळी काही लेख लिहून काढले त्यांचं हे संकलन वाचकांसमोर ठेवण्यास आम्हाला आनंद वाटतो.
    या लेखांमधे कोणताही ठराविक असा विषय नाही किंवा स्पष्टच सांगायचं तर सुसूत्र अशी विषय संगतीही नाही. ज्या प्रश्नासंदर्भात ही चर्चा होते किंवा मुद्दाम घडवून आणली जाते ते बऱ्याच अंशी quora.com सारख्या समाजमाध्यमातूनच विचारलेले असतात आणि याच माध्यमातून त्यांना कमीअधिक सुसंगत उत्तरेही मिळालेली असतात. या उत्तरांचाही संदर्भ आणि उपयोग या चर्चांमध्ये आणि पर्यायाने लेखनात होता.
    श्रवण, वाचन, चिंतन, मनन, चर्चा याच्या पुढची पायरी ही लेखन असावी असा पूर्वसंकेत आहे. आणि त्या अर्थाने लेखन ही सर्वात कष्टप्रद, आणि सर्वात जास्त धोकादायक किंवा विध्वसंक कृती मानली पाहिजे. कारण एका व्यक्तीने कितीही तर्कशुध्द विचार करायचा ठरवला तरी मतभिन्नता निर्माण होतेच आणि लेखन हा तर्काच्या स्थितीशून्यतेचा पुरावाच असतो.
    वाचनाची पर्यायाने संदर्भांची किंवा संदर्भ ग्रंथाच्या परिशीलनाची विपुलता प्रत्येक लेखनाची प्राथमिकता आहे पण या बाबतीत इथे त्याची कमतरता मान्य करताना हे लेखन कुठल्याही तऱ्हेने किंवा कोणत्याही अंगाने पूर्वप्रसिध्द मतांना छेद देण्यासाठी नसून चर्चेत सहभागी असणाऱ्यांच्या मतांचा किंवा निष्कर्षांचा फक्त लेखी स्मरणठेवा आहे. स्वतंत्ररित्या यापैकी प्रत्येक लेख हा निबंध प्रकारातच मोडेल कारण हा लेखकांचा दृष्टिकोन असून त्याला अनेक पैलू असू शकतात किंवा निरनिराळ्या कोनातून किंवा अगदी भिन्न अशा अर्थाने ही त्या बद्दल लिहिता आणि बोलता येईल आणि हाच असे लेख किंवा निबंध लिहिण्याचा हेतू आहे. ढोबळ अर्थापासूनसुरूवात करुन जास्तीत जास्त आक्षेपांचे जास्तीत जास्त निराकारण व्हावे असा यात आशावाद आहे. हा वाद किंवा खंडन नसून ज्या निष्कर्षाकडे आपण जाणार आहोत त्याचे अनवधानाने किंवा हेतुपुरस्सर दुर्लक्षित असे स्वरुप स्पष्ट व्हावे आणि त्यातून चर्चाविषयालाच नव्हे तर आणखी काही विषयांवर चर्चेला किंवा लेखनाला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. बव्हंशी निरीक्षणातून असं लक्षात येतं की बऱ्याच वेळा मुळात विषयाचं किंवा प्रश्नांचच नीट आकलन न झाल्यामुळे अगदी स्वपातळीवर सुध्दा समाधानकारक अशा स्पष्टिकरणाचा उत्तरांमधे अभाव दिसून येतो. आमचा प्रयत्न हाच आहे की मुळात प्रश्न समजून घेण्यात आपण किती यशस्वी होतो याचं मोजमाप करावं याच विचारातून प्रत्येक प्रश्नावर आणखी उपप्रश्न आणि त्यावर आणखी आक्षेप आणि त्याची जास्तीतजास्त समाधानकारक (म्हणजे आमच्या मर्यादे पर्यंत) सोडवणूक हे चर्चेचे सूत्रच फक्त लेखांमधून पुढे नेले आहे.
    लेखन, वाचन ह्या चिकाटीच्या आणि व्यासंगाच्याच गोष्टी आहेत पण अशा प्रकारे चर्चा, लेखन यातून आपण ही थोडाफार तर्कसंगत आणि तर्कशुध्द विचार करु शकलो तर त्यातून अधिक तपशील मिळवण्याची इच्छा होईल त्यातून अधिक सुसंबध्द असं आचरण घडू शकेल का? खुद्द आपल्या आचारविचारातील विसंगती कमी होईल का? इतरांच्या वर्तनातील विसंगतीची कारणमीमांसा लक्षात घेता आली तर तिच्याकडे क्षमाशील वृत्तीने नाही तरी किमान दुर्लक्षित नजरेने तरी पाहता येईल का? पूर्वग्रहदूषितपणा हा किती खोल पोचला आहे याचं भान आपल्याला येईल का? प्रत्येक प्रश्नात प्रत्यक्ष सोडवण्याचा भाग किती आणि समज नीट न झालेला असंबद्ध भाग किती? आत्मपरिक्षणातून आलेल्या निष्कर्षांची टोचणी सहन करण्याची क्षमता किती? पूर्व कल्पना आणि संस्कृतीची तर्कविसंगत, काळी किंवा गैरसोयीची बाजू मान्य करण्याची तयारी किती? हे आणि असे अनेक बेचैन करणारे प्रश्न स्वतःला पडावेत हा ह्या चर्चेचा आणि लेखांचा हेतू होता तो किती सफल झाला याचा आढावा घेऊन पुढच्या लेखांचा प्रपंच करावा इतपत ही प्रस्तावना म्हणजे खरतर साधं सरळ मनोगत आहे.
    म्हणूनच ही लेखमाला म्हणजे कुणाचीही बाजू घेण्याचा किंवा कुणाच्याही मताचा उच्छेद करण्याचा आटापिटा नसून जो विचार आपण करु शकतो तो तसाच मांडू शकतो का? याची चाचपणी आहे.
    – विश्वास गोपाळ लोंढे आणि अनंत विष्णू वेलणकर

  • Sange kabir

    Sale! 150.00 100.00

    गुरुवर्य रविंद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली’ चा अनुवाद केल्या नंतर आणखीही असेच अध्यात्मिक काव्य अनुवादासाठी, अभ्यासासाठी मिळण्याची वाट पाहत असतांनाच श्री. पारसनाथ तिवारी यांचं ‘कबीर’ हे पुस्तक हाती आलं. शालेय जीवनातील हिंदी विषय आणि ‘राष्ट्रभाषा हिंदी’ च्या परिक्षांमधून कबीराचे दोहे आणि भजनांचा परिचय झालेलाच होता, तसेच संगीतामध्ये देखिल कबीराची भजने जास्त प्रमाणात आढळतात म्हणून कबीरांच्या भजनांचा अनुवाद करावासा वाटला. संत कबीरांच्या भजनांमधून योगविद्येचाही सखोल उल्लेख आढळल्यावर या संताबद्दलचा आदर आणिकच वाढला. त्याचप्रमाणे त्यांनी साधलेला हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमधील समन्वय वादातीत आहे.

    श्री. पारसनाथ तिवारी यांनी केलेल्या संत कबीरांच्या मगधी भाषेतील रचनांचा सुयोग्य हिंदी अनुवाद आणि सांगितलेला सुलभ अर्थ, यामुळेच त्यावरुन त्याचा मराठी अनुवाद करणे मला सोपे गेले. अनुवाद करतांना तो वाचून होणारा आनंद अवर्णनीय होता. पर्यायी शब्द सुचणं, यमकाशी जुळणी करणं या कसरतीमध्ये वेळ किती आणि कसा गेला कळत नव्हतं. कै. कांताकाका सप्रे यांना काव्यरचना वाचून दाखवल्यावर त्यांनी केलेल्या कौतुकाने उत्साह वाढत होता. अनुवाद पूर्ण झाल्यानंतर एक दिवस – श्री. सुहास बाक्रे यांची भेट झाली. त्यांनी वही वाचल्याबरोबर ‘श्रीकौपीनेश्वर ट्रस्ट’च्या माध्यमातून पुस्तक प्रकाशित करण्याबद्दल सुचवणं हा विलक्षण योगायोगच म्हणायला हवा. सौ. धनश्री लेले ह्या सुविद्य वागीश्वरीचे ‘‘संत कबीर’ विषयावरील व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांना माझ्या काव्यरचना पाठविल्या. त्यांच्याकडून कौतुकास्पद अभिप्राय आल्यानंतर पुस्तकासाठी त्यांनी लिहिलेली प्रस्तावना म्हणजे ह्या काव्यसंग्रहाची भरजरी झालरच शोभावी.

    त्याचप्रमाणे बंधुवर्य विलास धामणकर आणि सौ. ज्योती ह्या उभयतांनी केलेली मुखपृष्ठ सजावट, त्यावरील हळदीकुंकवाप्रमाणे शोभावी अशीच आहे. पुस्तक छपाईसाठी श्री. प्रभाकर केतकर आणि अनामिका एन्टरप्राईझेस यांनी घेतलेल्या परिश्रमांची भरपाई शब्दांमध्ये करणं अशक्य आहे. वाचकांनाही सहजपणे मराठीतून कबीराची ओळख व्हावी आणि त्यांच्या अभिप्रायातून मला असेच काव्यलेखन करण्याची स्फूर्ति मिळावी हीच सदिच्छा!

    – नरेंद्र शंकर घाटे

  • Susaat: सुसाट

    Rated 5.00 out of 5

    अजित तात्याबा देशमुख यांचे ‘ सुसाट ‘ हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर येणे ही मराठीतली एक अपवादात्मक विशेष घटना होती. हे नाटक, ज्याला ऍब्सर्ड वा व्यस्त रंगभूमीचे नाटक म्हणतात, तसे होते. अशा नाटकाच्या लेखनात नुसते कौशल्य असून भागत नाही. मानवी जगण्यातली व्यस्तता, निरर्थकता, हेतुशून्यता, अतार्किकता यांचे स्वतःचे आकलन आणि भान लेखकाला असावे लागते. या अर्थाने ते नाटक सर्जक असावे लागते. प्रेक्षकांच्या सवयींचे नुसते लाड करणारे असून चालत नाही. या नाटकाचा प्रयोग मी पाहिला तेव्हा त्यात असलेल्या या सर्व वैशिष्ट्यांमुळेच मला विशेष आनंद वाटला होता. अलिकडेच मी या नाटकाची संहिताही वाचली. एका अतार्किक परिस्थितीत माणसाचे डांबले जाणे हे या नाटकात अनेक आवर्तनांतून प्रभावीपणे आलेले आहे. देशमुखांचे संवादही नाटकाच्या आशयशी एकजीव झालेले आहेत. एका बाजूला हे सगळे पृष्ठस्तरावर विनोदी वाटत असतानाच आपल्याला त्यातला गंभीर आशयही जाणवत राहतो आणि त्यामुळे आपण अंतर्मुख होत जातो. एखादे नीतीतत्त्व सांगणे वा बोध देणे असा या नाटकाचा कोणताच उद्देश नाही. मानवी जगण्यातल्या एका अटळ कोंडीचे भान देण्याचे गंभीर काम हे नाटक करते.

    देशमुखांचे हे पहिलेच नाटक आहे. त्यात असा गंभीर आशय, हसतखेळत पद्धतीने, उत्तम रचना आणि उत्तम संवाद यांतून ते देतात. माझ्या मते, ‘सुसाट’ हे मराठीतले एक अपवादात्मक चांगले नाटक आहे. त्यांच्या पुढील नाट्यलेखनाबाबत खूप उत्सुकता निर्माण करणारे असे हे नाटक आहे.

    — चं. प्र. देशपांडे.

  • अनुपमा

    Sale! 100.00 0.00

    प्रस्तावना: मंगेश पाडगावकर

    ताज्या टवटवीत फुलांनी भरलेल्या परडीसारखा आपला पहिला कविता संग्रह घेऊन, श्री प्रसाद कुलकर्णी रसिकांच्या भेटीसाठी येत आहेत. फुललेल्या फुलांना आपला सुगंध जाहीर करण्यासाठी वेगळी निमंत्रण पत्रिका छापावी लागत नाही. श्री प्रसाद कुलकर्णी यांच्या कवितांचेही असेच आहे. त्यांना कसल्याही प्रस्तावनेची वास्तविक गरज नाही. पण तरीही हा संकेत पाळावा असा त्याचा आग्रहच असल्यामुळे मी हे चार शब्द लिहायला बसलो आहे.

    या फुलण्याचे रसिक वाचक स्वागत करतील असा मला विश्वास वाटतो. कवितेवर प्रेम करणारा एक रसिक म्हणून मी श्री प्रसाद कुलकर्णी यांना या प्रस्तावनेच्या निमित्ताने माझ्याही शुभेच्छा देत आहे.

  • अभिविनीत

    Sale! 70.00 50.00

    अनेक लेखकांच्या भाऊगर्दीत एक कुणीतरी आपल्या लक्षात रहातो. विनित वर्तक.

    विनयशीलपणे तो नग्न विषयांना कपडे घालतो. जिथे इतरांची लेखणी थरथरते तिथे तो मल्लखांबासारखा उभा राहून लीलया कसरती करून टाळ्या घेतो.

    तो हा विनित वर्तक माणूस म्हणून अत्यंत साधा वाटणारा पण लिहू लागला की मूलभूत प्रश्नांनाच नम्रतेने घाम फोडणारा. प्रगल्भ बुध्दीतून उत्पन्न सोप्या विचारांना ठाशीव चित्ररूप देऊन त्यांना एक स्वतंत्र विषयमहत्त्व देणारा हा लेखक खूप काही आवडाव्या अशा गोष्टी सांगून आपली वाहवा मिळवताना काही प्रसंगी सामाजिक कारूण्यही अधोरेखित करतो आणि अंतर्मुखतेची छाप सोडतो प्रत्येकाच्या मनात.

    जीवनाकडूनच्या आपल्या अपेक्षा आणि त्याकरिता समाजाकडून मिळणारी पोषकता यांचा समतोल साधण्याची कला शिकवताना तो कुठेही वैचारिक कडेलोट होऊ देत नाही हे विशेष.

    आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक आनंद पुरेपूर घेताना समाजाची घडी विस्कटू न देण्याच्या योजना दाखवताना कुठेही तो जुनाट वाटत तर नाहीच उलट नवविचारांतून उमललेला एक कल्पक इंजिनिअर आहे नक्कीच..

    जुन्याच प्रश्नांची
    सतत नाविन्याने उत्तरे शोधणाऱ्या प्रत्येक वाचकातील त्या
    स्फुल्लिंग चेतनेस..
    तो जागवतोय अभिव्यक्त होऊन..

    ‘अभिविनित’ हे शीर्षकही मला खूपच समर्पक वाटलं कारण खरोखरच त्याच्या नावाप्रमाणेच आत्यंतिक नम्रतेने व्यक्त होणं हा विनितचा स्वभावधर्म आहेच…

    विनितच्या या वाटचालीला माझ्या हृदयापासून खूप खूप शुभेच्छा.. आणि हो त्याने कमीतकमी शंभरभर पुस्तके तरी लिहावीत  हा माझा वेधक विश्वास मी त्याच्या प्रतिभेस सांगू इच्छितो..

    भूषण भन्साली.

  • अर्थ दिवाळी अंक

    0.00

    नमस्कार,
    अर्थ मराठी ई-दिवाळी अंक यंदा चैथ्या वर्षात पदार्पण करत आहे. वाचकांना सतत काही ना काही नवीन देता यावं यासाठी प्रत्येक वर्षी जे काही शक्य आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न केला आहे आणि म्हणूनच आपल्या ई-दिवाळी अंकाला आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेतर्फे सलग दोन वर्षे (2014 आणि 2015) सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पुरस्काराचं श्रेय माझ्या सादरीकरणापेक्षा नेहमी माझ्या पाठीशी उभ्या असलेल्या पत्नीला, माझ्यामध्ये साहित्याची बीज पेरणाऱ्या माझ्या वडीलांना, माणूस म्हणून जग दाखवणाऱ्या माझ्या आज्जीला जातं. आणि अर्थातच दिवाळी अंकामध्ये लेख आणि काव्य सादर केलेल्या सर्व नवोदित आणि दिग्गज साहित्यीकांना जातं. दिवाळी अंकावर आपलं प्रेम असंच असु द्या.

    आपलाच,
    अभिषेक ज्ञानेश्वर ठमके
    (संपादक)

  • आमचा बाप आन् आम्ही- डॉ नरेंद्र जाधव

    Sale! 200.00 100.00

    डॉ. नरेंद्र जाधव –
    आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ, नामवंत शिक्षणतज्ज्ञ, देशी-विदेशी अग्रगण्य विद्यापीठांतील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, सामाजिक बांधिलकीचा वसा घेतलेले प्रभावी वक्ते, मराठी-हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांतून तब्बल 41 पुस्तकांचे लेखन-संपादन करणारे सिध्दहस्त लेखक; तसेच एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. नरेंद्र जाधव सर्वदूर सुपरिचित आहेत.
    डॉ. नरेंद्र जाधव सध्या राज्यसभेचे राष्ट्रपती-नियुक्त खासदार म्हणून कार्यरत आहेत. सत्ताधारी पक्षाचे सदस्यत्व न स्वीकारता आपला स्वतंत्र बाणा त्यांनी कसोशीने जपला आहे. प्रत्यक्षात संसदेत तसेच विविध स्थायी समित्यांमध्ये (वित्त, व्यापार आणि आता माहिती-तंत्रज्ञान) आणि परराष्ट्र व्यवहाराच्या सल्लागार समिती मध्ये अभ्यासू आणि सक्रिय सहभागातून डॉ. नरेंद्र जाधव यांनी संसदपटू म्हणून आपला एक वेगळा मानदंड निर्माण केला आहे. खासदारकी शिवाय अशोका युनिव्हर्सीटी सारख्या नावाजलेल्या विद्यापीठासह एकूण तीन विद्यापीठात ज्येष्ठ प्राध्यापक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत ते देशाच्या युवापिढीच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्याच बरोबर, टाटा उद्योग समूहासह विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर ‘स्वतंत्र संचालक’ म्हणून देखील डॉ. जाधव कार्यरत आहेत. त्यांची ज्ञानसाधना आणि लेखनकार्य तर अखंडपणे निरंतर चालूच असते.
    डॉ. नरेंद्र जाधव यांनी गेली 45 वर्षे सार्वजनिक जीवनात अनेकानेक उच्चतम पदांना आपल्या कर्तृत्वाने नवीन झळाळी मिळवून दिली आहे. केंद्रीय नियोजन आयोग (अध्यक्ष : डॉ. मनमोहन सिंग) तसेच राष्ट्रीय सल्लागार परिषद (अध्यक्षा : श्रीमती सोनिया गांधी) या दोन भूतपूर्व शिखर संस्थांमध्ये केंद्रीय राज्य-मंत्री समकक्ष पातळीवरील सदस्य म्हणून देशाची 12 वी पंचवार्षिक योजना तयार करण्यात आणि एकूणच देशाच्या आर्थिक विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. तत्पूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आणि त्याही पूर्वी भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान सल्लागार आणि प्रमुख अर्थतज्ज्ञ म्हणून देखील डॉ. नरेंद्र जाधव यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे.

Showing 1–10 of 93 results